हुतात्मा भगतसिंग – Bhagat Singh Information / Nibandh in Marathi

  • जन्म : २८ सप्टेंबर १९०७.
  • मृत्यू : २३ मार्च १९३१
  • पूर्ण नाव : सरदार भगतसिंग किशनसिंग.
  • वडील : किशनसिंग
  • आई : विद्यावती
  • जन्मस्थान : बंगा (जि. लायलपूर सध्या पाकिस्तानात)
  • शिक्षण : इ. स. १९२३ मध्ये इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण
  • विवाह : अविवाहित

कार्य

इ.स. १९२४ मध्ये भगतसिंग कानपूरला गेले. तिथं पहिल्यांदा वर्तमानपत्र विकुन त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागला. नंतर एक क्रांतिकारी गणेश शंकर विद्यार्थी याच्या संपर्कात ते आले. त्यांच्या ‘प्रताप’ वर्तमानपत्राच्या कार्यालयात भगतसिगांना जागा मिळाली.

इ.स. १९२५ मध्ये भगतसिंग व त्यांच्या सहकारी मित्रांनी ‘नवजवान भारत सभे ची स्थापना केली.

दसऱ्याला निघालेल्या मिरवणुकीवर काही उपद्रवी लोकांनी बॉम्ब टाकला होता.

त्यामुळे काही लोक प्राणासही मुकले होते. या पाठीमागे क्रांतिकारकांचाच हात असावा, अशी पोलिसांना शंका होती. त्यासाठीच त्यांनी भगतसिंगाना पकडून त्यांची रवानगी तुरुंगात केली होती. परंतु न्यायालयातून नंतर ते निर्दोष सुटले. .

‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारी संघटनेचे भगतसिंग सक्रिय कार्यकर्ता झाले.

कीर्ती’ आणि ‘अकाली’ नावाच्या वर्तमानपत्रासाठी भगतसिंग लेख लिहू लागले

समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणानी देशव्यापी क्रांतिकारी संघटना आझाद, शव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरविले, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू सुखदेव आदी तरण मध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते.

१९२८ साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोपणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उदहिष्ट होते.

त्याचबरोबर शेतकरी-कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक-आर्थिक स्वस्था उलथवून ऐकायची होती. संघटनेच्या नावात ‘सोशलिस्ट’ या शब्दाचा अत्भाव करण्याची सूचना भगतसिंगांनी मांडली व ती सर्वानुमते मंजूर झाली.

शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. या विभागाचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ‘ होते आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद.

इ.स. १९२७ मध्ये भारतात काही सुधारणा देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने सायमन कमिशनची नियुक्ती केली पण सायमन कमिशन मध्ये सातहि सदस्य हे इंग्रज होते.

त्यात एकही भारतीय नव्हता. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सायमन मिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जेव्हा सायमन कमिशन लाहोरला आले.

तेव्हा पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निषेधासाठी मोटी मिरवणूक निघाली होती. पोलिसांनी केलेल्या निर्दवी लाटीहल्ल्यात लाला लजपतराव जखमी झाले आणि दोन आठवड्यांनंतर रुणालयात ते मरण पावले.

लालाजींच्या निधनाने देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने तर लालाजी च्या हत्येचा बदला येण्याचा निश्चय केला.

लालाजींच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्कॉट या अधिकान्यास ठार केल्याची योजना आखण्यात आली. या कामासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, जयगोपाल यांची निवड झाली.

त्यांनी १७ डिसेंबर १९२८ रोडी स्कॉटला मारण्याची तयारी केली परंतु या प्रयत्नात स्कॉट ऐवजी संडर्स हा दुसरा अधिकारी ठार झाला.

या घटनेनंतर भगतसिग वेशांतर करून कलकत्याला गेले त्या ठिकाणी त्याची जतींद्रनाथ दास यांच्याशी ओळख झाली. जतींद्रनाथ दास यांना बॉम्ब बनविण्याची कला अवगत होती. भगतसिंग व जतींद्रनाथ यानी बॉम्ब बनविण्याचा कारखाना आग्रा येथे सुरू केला.

याच सुमारास इंग्रज सरकारने ‘ट्रेड डिस्प्युट बिल’ (औद्योगिक कलह कायदा) आणि पब्लिक सेस्टी बिल’ (लोकसंरक्षण कायदा) अशी दोन विधेयके केदीय कायदेमडळात मांडण्याचा निर्णय येतला.

या दोन विधेयकामुळे सरकारच्या हाती अमर्याद सत्ता येणार होती आणि तिच्या जोरावर देशभक्तांचा आवाज आणि चळवळी दडपता येणे सरकारला शक्य होणार होते. या विधेयकाचा हिंदुस्थान साबिर रिपब्लिकन असोसिएशनने क्रांतिकारी मार्गाने निषेध करण्याचे ठरविले.

त्यानुसार वरील विधेयके कायदेमंडळात मांडली जात असतानाच सरदार भगतसिंग बटुकेश्वर दत्त यानी सभागृहात बॉम्बस्फोट घडवून आणला. या प्रसंगी क्रांतिकारकांनी सभागृहात लाल रंगाची पत्रके टाकली. संपूर्ण सभागृह धुराने भरून गेले. सर्वत्र गोधळ उडाला. लोकांची धावपळ सुरू झाली.

ते दोन तरुण प्रेक्षकांच्या कक्षेत उभे होते. ‘इंकलाब जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत होते. ते निर्भयपणे हसत होते. नंतर ते स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले.

त्यानंतर भगतसिंग व त्यांचे सहकारी यांच्यावर सरकारने निरनिराळ्या आरोपाखाली खटले भरले. पहिल्या खटल्यात त्यांच्यावर कायदेमंडळाच्या सभागृहात बॉम्बफेक केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

या खटल्यात भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. परंतु संडर्सच्या खून खटल्यात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली.

मृत्यू

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघा महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आले. ‘इन्कलाब जिंदाबाद’ च्या घोषणा देत ते हसत – हसत मृत्यूला सामोरे गेले.