राष्ट्र संत तुकडोजी महाराज माहिती Tukdoji Maharaj Information in Marathi

Rashtra Sant Tukdoji Maharaj information in Marathi : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पूर्ण माहिती मराठी मध्ये , या नोट्स मध्ये आपण बघणार आहात तुकडोजी महाराजांची पूर्ण माहिती , त्यांचे पूर्ण नाव , भजन , विचार , स्वाध्याय , कविता व बरेच काही .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती – Tukdoji Maharaj Information

तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रील १९०९ रोजी अमरावती जिल्हयातील ” यावली ‘ या गावी झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय ” माणिक बंडोजी इंगळे ” असे आहे.

  • जन्म : २७ एप्रील १९०९
  • मृत्यू :११ ऑक्टोबर,१९६८
  • पूर्ण नाव : माणिक बंडोजी इंगळे
  • वडील :बंडोजी इंगळे
  • आई : मंजुळाबाई इंगळे

तुकडोजी महाराज यांच्या बद्दल महत्वाचे

  • महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील आधुनिक राष्ट्र संत, भक्त. कवी समाजसुधारक म्हणुन यांना ओळखले जाते.
  • तुकडोजी सहाराजांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा हे होते.
  • “खंजिरी भजने हे तुकडोजीच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
  • १९३५ मध्ये तुकडोजी महाराजानी अमरावती जिल्हयातील मोझरी येथे “गुरुकुंज आश्रम” ची स्थापना केली.
  • आडकुजी महाराज हे तुकडोजी महाराजांचे गुरु होते.
  • अखिल भारतीय पातळीवर त्यांनी “साधु संघटना” ची स्थापना केली.
  • अनिष्ठ रुढी परंपरा. जातीभेद व अंधश्रद्धा इत्यादी समाज विघातक गोष्टी बर तुकडोजी टीका केली.
  • राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करन देशभक्ती दर्शविण्याकरीता तुकडोजीनी १९३० सालच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता. याच कालावधीत १९३६ साली गांधीजीच्या सहवासामध्ये असताना तुकडोजीचा डॉ.राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, मौलाना आझाद इत्यादी राष्ट्रीय नेत्यांशी संबंध आला.
  • “भारत सेवक समाज” संघटनेचे काम करताना त्यानी गुलजारीलाल नंदा यांचे सोबत काम केले.
  • तुकडोजी महाराजाची “किर्तन’“खजिरी भजने” प्रसिद्ध होती.
  • व्यायामाचे महत्व सांगण्याकरीता तुकडोजीनी “आदेश रचना” हा ग्रंथ लिहीला.
  • ४१ अध्यायांचे ४६७५ ओवींचे असलेले “ग्रामगंथ” हा प्रसिद्ध काव्यसंग्रह त्यांनी लिहीला.
  • विवोध प्रकारची ४० पुस्तके लिहीली. त्यांची काव्य रचना हिंदी व मराठी होती.
  • १९४२ मधील चलेजाव चळवळीमध्ये तुकडोजी महराजांनी तुरुंगवास भोगला. हा तुरुंगवास भोगताना तुकडोजी महाराजांनी “सुविचार स्मरणी” हा ग्रंथ लिहिला.
  • १९५५ मध्ये तुकडोजी महाराज विश्वधर्म व विश्व शांती परीषदेसाठी जपानला गेले.
  • १९६६ मध्ये प्रयाग येथे भरविण्यात आलेल्या विश्व हिंदु परीषदेचे अध्यक्षस्थान तुकडोजी महाराजांनी भुषविले.
  • राष्ट्रपती भवनामध्ये तुकडोजी महाराजांनी म्हणटलेल्या “खनजिरी भजने ऐकुन देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना “राष्ट्रसंत” ही पदवी बहाल केली.
  • ११ ऑक्टोबर १९६८ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथील “गुरुकुंज” या आश्रमामध्ये त्याचा देहबसन झाले. त्यांचे समाधीस्थळ मोझरी, जि.अमरावती येथे आहे.
  • त्यांच्या स्मृतीपृत्यार्थ १९२५ मध्ये स्थापन झालेल्या नागपुर विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे.

तुम्हाला वरील Tukdoji Maharaj Marathi Information आवडली असल्यास कँमेन्ट करून नक्की कळवा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा