फिरोजशहा मेहता माहिती मराठी मध्ये

फिरोजशहा मेहता यांची पूर्ण माहिती मराठी : Firoz Shah Mehta information in Marathi.

फिरोजशहा मेहता माहिती

  • जन्म : ४ ऑगस्ट १९४५ मुंबई.
  • मृत्यू : ५ नोव्हेंबर १९१५
  • पूर्ण नाव : फिरोजशहा मेहरवानजी मेहता.
  • वडील :मेहरवानजी
  • जन्मस्थान : मुंबई
  • शिक्षण : इ. स. १८६४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी. ए. आणि सहा महिन्यानंतर एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण. इ. स. १८६८ मध्ये बॅरिस्टरची पदवी संपादन केली.
  • ओळख : मुंबईचा सिंह भारतातील सर्वोत्तम वादपटू मुंबईचा चारवेळा महापौर

फिरोजशहा मेहता बालपण आणि शिक्षण FirozShah Mehta information in Marathi

फिरोजशहा मेहता यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४५ मध्ये मुंबई येथे झाला. ते एका पारशी कुटुंबात जन्मले होते त्यांच्या वडिलांचे नाव मेहरवानजी असे होते .

सुखवस्तू पारशी कुटुंबात जन्मलेले फिरोजशहा १८६४ मध्ये पदवीधर झाले. १८६५ मध्ये रुस्तमजी जमशेदजी जिजिभॉय यांनी पाच भारतीयांना इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होण्यासाठी दीड लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. या पाच जणांत फिरोजशहा होते. पण या मदतीचा फायदा त्यांना फार काळ मिळाला नाही. रुस्तमजी यांना व्यापारात मोठी खोट आली आणि फिरोजशहा यांना मिळणारी मदत बंद झाली.

इंग्लंडमध्ये फिरोजशहा चार वष्रे होते. त्या काळी, दादाभाई नौरोजी यांच्याबरोबरचा परिचय त्यांना फार उपयुक्त ठरला. ब्रिटिश वसाहतवादामुळे भारतीय भांडवलाचे (नैसर्गिक साधनसामग्री आणि श्रमाचे) कसे शोषण होते, अशी वैचारिक मांडणी करून

फिरोजशहा हे स्वत:ला पूर्णपणे आपण भारताचे पुत्र आहोत, असे मानत. पारशी समाज हा परकीय असून या समाजाला भारताच्या जडणघडणीत स्थान नाही, ही कल्पना त्यांनी कधीच बाळगली नाही.

एका विशिष्ट प्रसंगी त्यांच्या काही मित्रांनी वेगळे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फिरोजशहा यांनी ऐतिहासिक निवेदन करून मित्रांच्या निदर्शनास त्यांची चूक आणून दिली : ‘पारशी समाजाने आपले अस्तित्व आणि हितसंबंध या देशातील इतर लोकांपेक्षा वेगळे आहेत, असे समजणे केवळ स्वार्थी व संकुचितच ठरणार नाही, तर आत्मघातकी ठरेल.

आपला समाज लहान असला, तरी समंजस व कल्पक आहे. सबब, आपण या देशातील इतरांपासून अलग न राहता, समान हितसंबंध आणि परस्पर सहकार्याच्या दृष्टीने पाठपुरावा करायला हवा. तसे झाले नाही, तर या देशाच्या उभारणीत आपली रास्त भागीदारी राहणार नाही. मी प्रथम भारतीय व नंतर पारशी आहे.’

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्येही फिरोजशहा यांनी बरेच कार्य केले. तरुणपणापासूनच शिक्षण हा त्यांचा आवडता विषय होता. मुंबई विद्यापीठाशिवाय प्रांतिक कायदे मंडळे आणि मध्यवर्ती कायदे मंडळांमार्फत सरकारने शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे, यावर फिरोजशाह यांचा भर होता.

फिरोजशहा मेहता हे मला हिमालयाप्रमाणे, लोकमान्य हे महासागराप्रमाणे आणि गोपाळकृष्ण गोखले हे गंगा नदीप्रमाणे भासले,’ असे महात्मा गांधींनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

फिरोजशहा यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे निर्भयता. एकदा त्यांनी एखाद्या प्रश्नाबद्दल मत बनविले आणि त्यानुसार धोरण आखले की, ते ठामपणे त्याचा पुरस्कार करीत आणि त्यापासून कोणीही त्यांना परावृत्त करू शकत नसे.’ ..वैचारिक निष्ठा बावनकशी असल्याखेरीज हे साध्य होऊ शकत नाही!

फिरोजशहा मेहता कार्य

इ. स. १८६८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ने बकिली करू लागले.

इ.स १८७२ मध्ये ते मुबई महापालिकेचे सदस्य बनले. तीन वेळा ते अध्यक्षही बनले. त्याचे ३८ वर्षे मुंबई महापालिकेवर वर्चस्य होते.

इ. स. १८८५ मध्ये ‘बॉम्बे प्रेसीडेंसी असोसिएशन’ ची स्थापना यांनी केली ते त्याचे सचिव झाले.

इ. स. १८८६ मध्ये ‘मुंबई लेजिस्लेटिव्ह काउंसिल’ चे ते सदश बनले.

इ. स. १८८९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य झाले तसेच मुबईमधमे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वागत समितीचे अध्यक्ष झाले.

इ.स. १८९० (कलकता) व १९०१ (लाहोर) येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले,

इ.स. १८९२ मध्ये पाचव्या मुंबई प्रातिक सम्मेलनाचे त्यांनी अध्यक्षा ान भूशविले

इ. स. १९११ मध्ये ‘सेंट्रल बैंक ऑफ इंडिया’ घ्या स्थापनेत त्याचे महत्वपूर्ण योगदान होते.

इ.स. १९१३ मध्ये ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ नावाच्या वृक्तयाचे प्रकाशन त्यानी केले.