महर्षी धोंडो केशव कर्वे | Dhondo Keshav Karve Marathi MPSC Notes

0
56

महाराष्ट्रातील समाज सुधारक- महर्षी धोंडो केशव कर्वे

  • जन्म : १८ एप्रिल १८५८
  • मृत्यू : ९ नोव्हेंबर १९६२
  • पूर्ण नाव : महर्षी धोंडो केशव कर्वे
  • वडील :केशव बापूराव कर्वे
  • आई : राधाबाई कर्वे
  • पत्नी :  राधाबाई कर्वे,आनंदीबाई कर्व

महर्षी धोंडो केशव कर्वे बालपण आणि शिक्षण

महर्षी धोंडो (आण्णासाहेब) केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रील १८५८ रोजी रत्नागिरी जिल्हयातील मुरुड तालुक्यातील “शेरवली” या गावी झाला. चेरवली गाव मुरुड पासुन २४ किमी एवढ्या अंतरावर आहे.

कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण हे “मुरुड” येथे झाले. कर्वेयाचे शिक्षक सोमण गुरुजी हे होते.

१८७३ मध्ये कर्वे यांचा विवाह “राधाबाई यांच्याशी झाला.

१८७६ मध्ये कबैनी इयत्ता ०६ वी ची परीक्षा देण्यासाठी कुंभाली घाटातुन १२५ मैलांचे अंतर ०३ दिवस पायो चालुन पार केले व सातारा येथे पोहचले. पुढील शिक्षण कानी रत्नागिरीला पुर्ण केले. रत्नगिरीमध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. १८८१ मध्ये कवं हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

१८८४ मध्ये मुंबई येथील विल्सन कॉलेज मधुन कबेनी गणित विषयात बी.ए.चे शिक्षण पुर्ण केले.

१८८६ मध्ये कर्वेनी “मुरुड फंड” ची स्थापना केली. १८८७ मध्ये का हे एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

१८९१ मध्ये त्यांच्या पत्नी राधाबाई यांचे निधन झाले. याच वर्षो फर्ग्युसन कॉलेज मध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणुन रुजू झाले. यासाठी गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना मोलाची मदत केली.

१८९२ मध्ये महर्षी कर्वे हे “डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ चे आजिवन सदस्य बनले. कर्वेनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत “स्टुडंट फंड” ची स्थापना केला. का हे त्यांच्या पगारातील ७५ रु पैकी १० रु स्टुडंट फंड साठी देत होते.

३१ डिसेंबर १८९३ रोजी कर्वे यांनी पुणे येथे “विधवा उत्तेजक मंडळी’ या नावाने संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत विवाहांचे मेळावे घेण्यात आले.

१८६५ साली विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाचीच संस्था ही महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली होती.

१८९३ मध्ये महर्षी कर्वे यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी पंडीता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील व कर्वेचे मित्र नरहरपंत जोशी यांच्या बहीण “गोंदुबाई’ यांच्याशी पुर्नविवाह केला. गोंदुबाई / गोदावरी यांचे लग्नानंरचे नाव “आनंदीबाई” असे झाले.

१४ जुन १८९६ रोजी पुण्यातील सदाशिव पेठ येथे महषी कर्वे यांनी “अनाथ बालिकाश्रम” ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या प्रत्यक्ष कार्यास सुरुवात ०१ जानेवारी १८९९ रोजी सुरु झाले. प्लेग च्या साथीमुळे हि संस्था पुण्यातुन “हिंगणे” येथे स्थलांतरीत करण्यात आली. या संस्थेसाठी गोबिंद गणेश जोशी यांनी त्यांची हिंगणे येथील ०६ एकर जमीन दान केली. प्रारंभिक काळामध्ये फक्त ०८ मुली या आश्रमामध्ये शिकत होत्या.

१९०७ मध्ये महर्षी कर्वे यांनी “हिंगणे” येथे “महीला विद्यालय स्थापन केले.

१९१० मध्ये महर्षी कर्वे यांनी लोकसेवसाठी तन, मन, धन अरपण करणारे कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने “निष्काम कर्ममठ” ही संस्था स्थापन केली.

१९१५ मध्ये पुणे येथे पार पडलेल्या सामाजिक परीषदेचे अध्यक्षपद कर्वे यांनी भूषविले.

१९१५ मध्ये कवेच्या बाचनामध्ये “जपान वुमेन्स युनिवर्सिटी” हे पुस्तक आले. या पुस्तकातुनच प्रेरणा घेवुन महर्षी कर्वे यांनी ०३ जुन १९१६ रोजी भारतातील पहीले महीला विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठाचे नामांकरण प्रथम “भारत वर्षीय महीला विद्यापीठ” असे करण्यात आले. या विद्यापीठाचे पहीले प्राचार्य रा. गो. भांडारकर हे होते. या विद्यापीठामध्ये महीलांसाठी प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला.

चित्रकला व गायनकला इत्यादी विषय शिकवले जात असत.

१९२० मध्ये सर विठ्ठल ठाकरसी यांनी त्यांच्या आई श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ कवेच्या विद्यापीठास १५ लाख रुपये देणगी दिली. म्हणूनच या विद्यापीअचे नामकरण “श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महीला विद्यापीठ /SNDT महीला विद्यापीठ” असे करण्यात आले.

१९४९ च्या विद्यापीठ अनुदान काद्यानुसार या विद्यापीठस विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.

१९२९ ते १९३२ दरम्यान विदेशात जावून आले. त्यांनी जपान, अमेरीका. ज्मनी, इंग्लंड, आफ्रका इत्यादी देशांचा दौरा केला. जपान व स्विझलँडच्या येथील शिक्षण परीषदांना कर्व हे प्रत्यक्ष हजर होते. जागतीक ख्याती असलेले “अलबर्ट आईन्स्टाईन” या शास्त्रज्ञाची प्रत्यक्ष भेट महर्षी कर्वे यांनी घेतली होती.

१९३६ मध्ये कबेनी “महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ” या संस्थेची स्थापना केली.

०१ जानेवारी १९४४ रोजी जातीभेद व अस्पृश्यता निर्मुलनासाठी महर्षी कर्वे यांनी “समता मंच” या संस्थेची स्थापना केली. याद्वारे “मानवी समता” हे मासिक कवँनी सुरु केले.

१९४८ मध्ये समाजातील जातीभेद दुर करण्यासाठी त्यांनी “जाती निमुलन संस्था” स्थापन केली.

१८ एप्रील १९५३ रोजी सामाजिक परीषदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य है अर्थहीन आहे असे मत कवी यांनी मांडले. महलों कर्वे यांनी शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना केली.

महषी कर्वे यांना ०४ मुले होती. त्यापैकी रघुनाथ थोडो कर्वे हे राधाबाई या पहिल्या पत्नीचा मुलगा होत..

र.धों.कर्वे हे “समाज स्वास्थ” या मासिकाचे संस्थापक होते. रघुनाथ कर्वे यांच्या पत्नी ईरावती कर्वे या जेल समाज सेविका होत्या.

१८ एप्रील १९२८ रोजी च्या गांधीजींच्या “यंग इंडिया” या वृत्तमान पत्रामध्ये कर्वेचा गौरव करण्यात आला.

“आण्णासाहेब क्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत” असे उद्गार आचार्य अत्रे यांनी काढले होते. जनतेने स्वयं प्रेरणेने कर्वे यांना “महर्षी ही पदवी दिल्ली.

१९३६ मध्ये महर्षी कर्वे यांनी “आत्मवृत्त” हे आत्मचरीत्र्य लिहीले.

महर्षी कर्वे यांचा मृत्यु वयाच्या १०५ व्या वर्षी ०९ नोव्हेंबर १९६२ रोजी झाले. त्यांच्या स्मरणार्थ हिंगणे या गावास “कर्वेनगर” हे नाव देण्यात आले.

भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी महीला विद्यापीठे काढून त्यास एक पुर्ण कॉलेज व जिल्हा निहाथ हायस्कुल त्यास जोडली जावीत असे कवेचे स्वप्न होते.

महषी कर्वे यांनी सातारा येथे “बाल मनोहर मंदीर’ सुरु केले.

कर्नाटकातील बाल विधवा श्रीमती सीताबाई आण्णीगिरी यांना हिंगणे येथे मॅट्रोक पर्यंतचे शिक्षण दिले.

१९५१ मध्ये “पुणे” विद्यापीठाने कर्वेना डि.लीट ही पदवी दिली.

१९५२ मध्ये “बनारस” विद्यापीठाने कवेना डि.लीट ही पदवी दिली.

१९५४ मध्ये SNDT विद्यापीठाने कवना डि.लीट ही पदवी दिली.

१९५५ मध्यो भारत सरकारने कर्वेना “पद्मभुषण” हा सन्मान देवुन भुषांवले.

१९५७ मध्ये “मुंबई विद्यापीठाने करवेना L.LD ही पदवी दिली.

१९५८ मध्ये कवेंच्या जन्मशताब्दी निमीतने भारत सरकारने कवेना “भारतरत्न” या देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरविले. जिवतीषणी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे पहीले भारतीय व पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती म्हणजे महर्षी कर्वे होय.

महर्षी कर्वे कार्य

महिलांना शिक्षण मिळावे, त्यांच्या हक्काची त्यांना जाणीव व्हावी, विधवांना पुर्नविवाह करता यावा यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आपल्या वयाची 104 वर्ष अविरत संघर्ष केला. महर्षी कर्वे यांना धोंडो केशव आणि अण्णासाहेब या टोपण नावाने देखील ओळखले जायचे.

1900 साली अण्णांनी अनाथ बालिकाश्रमाचे स्थानांतर पुण्यातील हिंगणा (आताचे कर्वेनगर ) येथे केले. येथे विधवांकरता वसतीगृहाची त्यांनी निर्मीती केली त्यामुळे विधवा महिलांना हक्काचे छत मिळाले.

या ठिकाणी 1907 साली महिला विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयात महर्षी कर्वेंची 20 वर्ष वयाची विधवा मेहुणी ’पार्वतीबाई आठवले’ पहिली विद्यार्थिनी होती. आश्रमाच्या आणि शाळेच्या कार्याकरता कौशल्यपुर्ण मनुष्यबळाची आवश्यकता होती त्याकरता कर्वेंनी 1910 साली ’निष्काम कर्ममठा’ची स्थापना केली.

या संस्थांचे कार्य पुढे वाढत गेल्याने या संस्थांना एकत्र करण्यात आले त्याचे नामकरण सुरूवातीस ’हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ’ व पुढे ’महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ असे करण्यात आले. जपान येथे कर्वेंनी भेट दिल्यानंतर तेथील महिला विद्यापीठ पाहुन ते अत्यंत प्रभावीत झाले आणि पुणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना केली.

विðलदास ठाकरसी यांनी भरीव असे 15 लक्ष रूपयांचे त्याकाळी अनुदान दिल्यामुळे विद्यापीठाला ’श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले. विधवा महिलांचे प्रश्न त्यांचे शिक्षण याकरीता कर्वेंनी भरीव कार्य केलं. अस्पृश्यता, जातीभेद, जातीव्यवस्था या विरोधात देखील त्यांनी आवाज उचचला.

महर्षी कर्वेंची 4 मुलं रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनी देखील अनेक क्षेत्रांमध्ये मोलाचे कार्य केले आहे. महर्षी धोंडो केशव केर्वे यांचे मराठी (आत्मवृत्त 1928) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक 1936) अश्या दोनही भाषांमध्ये आत्मचरित्र लिहीण्यात आले आहे. महर्षी कर्वेंनी स्त्रीला सन्मानाची वागणुक मिळावी याकरीता व स्त्रीयांच्या शिक्षणाकरता मोलाचं कार्य केलं आहे.

महर्षी कर्वे यांच्या इतर महत्वाच्या संस्था :

१) महीला अध्यापन शाळा – १९१७

२) पुणे कन्याशाळा – १९१८

३) सातारा कन्याशाळा – १९३५

४) बाई कन्याशाळा-१९४९

५) पुणे येथे महीला निवास – १९६०

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा