Gramsevak Bharti 2023 – १३ हजार ग्रामसेवक पदे भरणार, जाहिरात व पात्रता बघा

महाराष्ट्रात लवकरच ग्रामसेवक पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण १३ हजार पदे भरण्यात येणार आहे. विविध जिल्हा परिषद मार्फत या महिन्यात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात येऊ शकते, या अंतर्गत २०२३ ची ग्रामसेवक भरती होणार असे ग्रामविकास मंत्री यांनी अधिवेशनात सांगितले होते. त्यासाठी आपण जाहिरात , शैक्षणिक पात्रता बघूया.

ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत सचिव (Village Development Officer) असे म्हणतात, राज्यात १३,००० अधिक ग्राम सचिव च्या जागा रिक्त आहे, त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे एका पेक्षा अधिक गावांचे भार पडते, यासाठी राज्य सरकारने ग्रामसेवक भरती २०२३ जाहीर केली होती परंतु काही कारणामुळे ती पुढे ढकनल्यात येत आहे. परंतु आता भरतीचे काम शेवटच्या टप्प्यात असून लवकरच जाहिरात निघेल असे विविध जिल्हा परिषद द्वारे सांगण्यात येत आहे.

ग्रामसेवक भरती २०२३ पात्रता : Gramsevak Eligibility Criteria

  • तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर कमीत कमी १२वी पास असणे आवश्यक आहे आणि १२वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील,
  • तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी, पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता,
  • जसे की BA, BCom, BSC, BE, BCA किंवा इतर कोणतीहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
  • त्याच बîरोबर तुम्हाला संगणक ज्ञान किंवा MSCIT सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

ग्रामसेवक भरती २०२३ चा अभ्यासक्रम बघा .

वयोमर्यादा :

तुमचे कमीत कमी वय १८ वर्ष व जास्तीत जास्त ३८ वर्ष या दरम्यान असावे.

ग्रामसेवक वेतन :

ग्रामसेवकास सुधारित वेतनश्रेणी नुसार 8023 – 23150 Grade Pay 2% म्हणजेच in hand ३० ते ४० हजार पगार पडतो.

निवड प्रक्रिया :

ग्रामसेवक भरती हि सरळ सेवे पद्धतीने होते, म्हणजेच तुमची जिल्हा परिषद ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते.

ग्रामसेवक जाहिरात हि येणार एप्रिल महिन्यात निघणार, जाहिरात निघाल्या नंतर इतर माहिती उपडेट केली जाईल.

1 thought on “Gramsevak Bharti 2023 – १३ हजार ग्रामसेवक पदे भरणार, जाहिरात व पात्रता बघा”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा