क्रियापदविचार-क्रियापदाचे अर्थ व
आख्यातविकार

0
59

काळांचे विशेष उपयोग


मराठीत एकंदर तीन काळ आहेत :-

  • (१) वर्तमानकाळ
  • (२) भूतकाळ
  • (३) भविष्यकाळ.

● एखाद्या काळाचा वापर दुसऱ्याच काळातील क्रियेबद्दल केलेला आढळून येतो. शिवाय त्यांतही विविध सूक्ष्म छटा आढळतात. भाषेचा अभ्यास करताना काळाचे हे विशेष उपयोग माहीत असणे आवश्यक आहे.

अ) वर्तमानकाळ

● सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले विधान करताना. (स्थिर सत्य).
उदा. सूर्य पूर्वेस उगवतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
● भूतकाळातील घटना वर्तमानात सांगताना. (ऐतिहासिक वर्तमानकाळ)
उदा. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो. (म्हणाला)
● लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शविताना. (संनिहित भविष्यकाळ)
उदा. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. (मी येईन)
● अवतरण देताना. उदा. समर्थ रामदास म्हणतात, ‘जगी सर्व सूखी असा कोण आहे ?’
●लगतचा भूतकाळ सांगताना. (संनिहित भूतकाळ)
मी बसतो (बसलो), तोच तुम्ही हजर !
● एखादी क्रिया सतत घडते अशा अर्थी. (रीति वर्तमानकाळ)
उदा. तो नेहमीच उशिरा येतो. (येत असतो.)

(आ) भूतकाळ


● ताबडतोब घडणाऱ्या क्रियेबाबत. (संनिहित भविष्यकाळ).
उदा. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. (येईन).
●एखादी क्रिया भविष्यकाळी खात्रीने होणार या अर्थी. (निःसंशय भविष्यकाळ).
उदा. जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज. (खात्री).
●संकेतार्थ असल्यास. (संभव).
पाऊस आला, (येईल) तर ठीक.
●वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे, अशा अर्थी. तो पाहा तुझा
(येत आहे).

(इ) भविष्यकाळ

●संकेतार्थ असल्यास – तू मदत देशील, तर मी आभारी होईन.
●अशक्यता दर्शविताना – सगळेच मूर्ख कसे असतील ? (अशक्यता).
●संभव असताना – गुरुजी आत शाळेत असतील. (असण्याचा संभव).
●इच्छा व्यक्त करताना – मला दोन रुपये हवे होते. (आहेत).

क्रियापदाचा अर्थ

क्रियापदाच्या रूपांवरून निरनिराळ्या काळांचा बोध होतो, हे आपण पाहिले; पण कधी-कधी क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत वगैरे बोलणाऱ्याच्या
मनातील हेतू, उद्देश किंवा प्रयोजन समजते. ह्यालाच व्याकरणात क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात.


हे अर्थ चार मानतात

  • (१) स्वार्थ
  • (२) आज्ञार्थ
  • (३) विध्यर्थ
  • (४) संकेतार्थ.

अर्थ व त्यांचे विविध उपयोग


स्वार्थ
स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ होय. क्रियेचे विधान तोच त्याचा अर्थ होय. ज्या वाक्यातील
क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो व आज्ञा, विधी, किंवा संकेत वगैरे अर्थाचा बोध न होता
क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो, तेव्हा त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची सर्व काळांतील रूपे ही ‘स्वार्थी’ होत. जसे

(१) मुले अभ्यास करतात.
(२) तो घरी गेला.
(३) मी खात्रीने पास होईन.


आज्ञार्थ
क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश
करणे या गोष्टींचा बोध होतो, तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. जसे(१) मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. (आज्ञा).


(२) देवा, सर्वांना सुखी ठेव. (प्रार्थना).
(३) एवढे आमचे काम कराच. (विनंती).
(४) मी हे काम करू? (अनुमोदन प्रश्न).
(५) तेवढी खिडकी लाव पाहू. (सौम्य आज्ञा).


● विध्यर्थ
जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध
होतो, तेव्हा यास विध्यर्थी क्रियापद असे म्हणतात. जसे

(१) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (कर्तव्य).
(२) अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. (योग्यता).
(३) परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. (शक्यता).
(४) आता पाऊस थांबावा. (इच्छा).
(५) कृपया, उत्तर पाठवावे. (विनंती).
(६) तो बहुधा घरी असावा. (शक्यता).


संकेतार्थ
संकेत म्हणजे अट. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले असते,तर अमुक झाले असते असे समजते ,तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात . जसे

(१) मला जर बरे असते, तर मी भाग घेतला असता. (२)निमंत्रण आले, तर मी येईन. (३) पाऊस आला , तरी सहल जाणारच

आख्यातविकार

संस्कृतात क्रियापदाला ‘आख्यात’ असे म्हणतात. लिंग, वचन व विभक्ती यांमुळे नामाच्या रूपात जसा बदल होतो. तसाच लिंग, वचन व पुरुष यांमुळे क्रियापदाच्या रूपातही बदल (=विकार) होतो. उदा. बसतो (पुल्लिंगी),बसते (स्त्रीलिंगी), बसतात (अनेकवचन), बसतोस (द्वितीय पुरुष). धातूला प्रत्यय लागून क्रियापदांची रूपे बनतात हे आपण पाहिले. उदा बस-तो, बस-ला, बसे, बसेल, बसू, बसा-वा, बस-ता. ही रूपे म्हणजे काळांची व अर्थांची रूपे आहेत. क्रियापदांना म्हणजेच आख्यातांना ‘तो, ला, ई, ईल, ऊ, वा’ वगैरे प्रत्यय लागून विविध काळ व
अर्थ यांची रूपे तयार होतात. त्यांना आख्यात प्रत्यय असे म्हणतात.काळ व अर्थ क्रियापदांना होणारे हे विकार असल्यामुळे यांनाच आख्यातविकार असे म्हणतात. ‘आख्यात’ या शब्दाऐवजी काळ व अर्थ हे शब्द अधिक सोपे व रूढ आहेत. त्याच शब्दांचा वापर सर्वत्र केलेला आहे.
तरीपण चार काळ व तीन अर्थ यांना आख्यातांची जी नावे देण्यात आली आहेत, ती अधिक सूक्ष्म वशास्त्रीय असल्यामुळे त्या नावांचा परिचय पुढे थोडक्यात करून देण्यात येत आहे.

काळ/ अर्थ क्रियापदाचे रूपे
वर्तमानकाळ बसतो भूतकाळ बसला
आख्याताचे नाव
प्रथम-ताख्यात
लाख्यात

आख्यातांना दिलेली नावे अधिक चांगली व शास्त्रीय आहेत, असे म्हणायचे कारण वर्तमान, भूत,
भविष्य ही काळांची नावे तितकीशी काटेकोर नाहीत. वर्तमानकाळाच्या रूपावरून कधी भविष्यकाळाचा (मी येतोच = येईन) व भूतकाळाच्या रूपावरून कधी भविष्यकाळाचा (मी आलोच = येईन) वगैरे आशय व्यक्त होत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here