पत्र लेखन मराठी – Marathi Patra Lekhan [विषय, प्रकार, नमुना, मायना, उदाहरण]

मित्रांनो आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये मराठी पत्र लेखन कसे करायचे हे बघणार आहोत मराठी पत्र लेखन (Marathi Patra Lekhan ) करत असताना त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे महत्त्वाच्या आहेत यावर सुद्धा आपण भर देणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पत्र लेखन मराठी – Marathi Patra Lekhan

Marathi Patra Lekhan: पत्र हे एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क केला जातो. काही लोकांना वाटते की पत्र लेखनात काहीही मेहनत लागत नाही. परंतु वास्तविकतेत आदर्श पत्र लिहिणे ही एक कला आहे. पत्र लेखनात व्याकरणाचे महत्त्व भरपूर असते. पत्र लेखनासाठी वापरली जाणारी भाषा वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची असते.

आजही, दूरसंचार क्रांतीमुळे मोबाईल डिव्हाइसेसमुळे तथापि, पत्रांचे महत्त्व कमी झाले नाही. आजही, घनिष्ठ संबंध जतन करण्यासाठी सरकारी आणि व्यवसायासाठी पत्र आवश्यक आहेत. म्हणूनच पत्र हे अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ माध्यम आहे.

पत्रलेखनाचे दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

1) औपचारिक पत्रे | Formal Letters In Marathi

कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते . काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरुपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय.

हे पत्र मुख्याध्यापक, पदाधिकारी, व्यापारी, ग्राहक, पुस्तक विक्रेता, संपादक इत्यादी लोकांना लिहिले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर औपचारिक पत्र हे वैयक्तिक ओळख व नातेसंबंधांमध्ये नसणाऱ्या लोकांना लिहिले जाते. या पत्रातील भाषा सभ्य असते.

सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींसाठी लिहून ठेवलेले असे पत्र औपचारिक पत्रांच्या श्रेणीमध्ये येतात.

औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार्‍्याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी.

औपचारिक पत्रलेखन कसे करावे ?

पत्राच्या सुरुपातीला उजव्या कोपऱ्यामध्येस्वतःचे नाव, पत्ता आणि त्याखाली दिनांक लिहावा. पत्रातील मजकूर विषयाला धरूनच लिहावा. पत्राची भाषा साधी सरळ आणि औपचारिक असावी. अनावश्यक गोष्टी टाळाव्यात . या प्रत्राची भाषा औपचारिक असली तरीही , ती वाचणाऱ्याला पत्राचे महत्व वाटेल अशी भारदस्त असावी.त्या खाली उजव्या कोपऱ्यामध्ये प्रति असे लिहून ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचा पत्ता आणि पद लिहावे . यानंतर विषय आणि संदर्भ लिहून . पुढे पत्राच्या मजकुराला सुरुवात करावी. औपचारिक पत्राचा सविस्तर आराखडा पुढे दिला आहे. त्यानुसारच पत्राची मांडणी करावी.

ओपचारिक पत्रांचे स्थूलमानाने काही उपप्रकार मानले जातात. ते पुढीलप्रमाणे आहेत :

  1. मागणीपत्र
  2. बिनंतिपत्र
  3. तक्रारपत्र 

औपचारिक पत्राचा नमुना | | Formal Letter Format in Marathi

___________x_____________

[ पत्रलेखकाचे स्वतःचे नाव
पत्रलेखकाचा स्वतःचा
पत्ता व नंबर.]  

दिनांक: __________

प्रति,
[ स्वीकार करणाऱ्याचे नाव,
पदाचे नाव, संस्तेचा पत्ता
इत्यादी तपशील येथे लिहावी.]

                विषय : [पत्राचा विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट करा.]   
                संदर्भ : [ पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]

महोदय/महोदया,

                      [ येथे पात्राच्या मजकुराला सुरुवात होते. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. या मजकुरात पाल्हाद, अलंकारिक्त,वैयक्तिक भावभावनांचे दर्शन नसावे.तक्रार सुद्धा सौम्य भाषेत असावी.]

[___________________________________________________________________________________________________________________________________________]

आपला/आपली,
सही

______________x__________

 

2) अनौपचारिक पत्रे | Informal Letters In Marathi

अनौपचारिक पत्र

अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते. या पत्रात सुखदुःख, उत्साह, प्रेम, अभिनंदन व शुभेच्छा इत्यादींचा समावेश असतो. अनौपचारिक पत्राची भाषा सौम्य हृदयस्पर्शी व प्रेमळ असते.

जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, इत्यादींसाठी लिहिलेले असे पत्र अनौपचारिक पत्र असे म्हणतात. यांना वैयक्तिक पत्र असेही म्हटले जाते.

आई, वडील, भाऊ, बहीण आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली मोबाईल व इंटरनेट यांमुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली होत नाही.

अनौपचारिक पत्रलेखन कसे करावे ?

पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःचे नाव, पत्ता व त्याखाली दिनांक लिहावा. अनौपचारिक पत्रांमध्ये स्वतःचे नाव लिहिले नाही तरी चालते. पत्रातील मजकूर सविस्तर विषयाला धरूनच असावा. या पत्राची भाषा साधी आणि सरळ आणि जिव्हाळ्याची असावी. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या व्यक्तींना पत्र लिहित असताना त्यातून नम्रता व्यक्त व्हायला हवी. घरगुती पत्रांचा प्रारंभ आणि शेवट हा अनौपचारिक  मजकूर व घरगुती चौकशी यांनी करावा.

अनौपचारिक पत्राचा नमुना | Informal Letter in Marathi

______________x__________

२३२, गांधी नगर,
मुंबई

प्रिय मित्र रमेश

सप्रेम नमस्कार,

अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा

आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

कळावे,
तुझाच मित्र

______________x__________

पत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या संक्षेपांचे अर्थ :

  • शि.सा.न.वि.वि. – शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष .
  • सा.न.वि.वि. – साष्टांग नमस्कार विनंती विशेष
  • स.न.वि.वि. – सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
  • चि. – चिरंजीव
  • श्री. – श्रीयुत ; सौ. – सौभाग्यवती ; श्रीम. – श्रीमती
  • ती. – तीर्थरूप
  • ती.स्व. – तीर्थस्वरूप
  • अ. आ. – अनेक आशीर्वाद
  • ता.क. – ताजा कलम
  • दि. – दिनांक ; ता. – तारीख
  • मा. / मान. – माननीय

औपचारिक पत्रलेखनाचे नियम (Rules Of Formal Letter In Marathi)

  • ‘सेवेमध्ये, असे लिहून पत्र प्राप्तकर्त्याचे पदनाम आणि पत्ता लिहून पत्र सुरू करा.
  • विषय – ज्या विषयी पत्र लिहिले जात आहे, ते केवळ एका वाक्यात आणि एका शब्दात लिहा.
  • संबोधन – ज्याचे पत्र लिहिले जात आहे – महोदय/महोदया, सर / मॅडम, आदरणीय, इत्यादी सौजन्याने शब्द वापरा.
  • स्वाक्षरी आणि नाव – धन्यवाद म्हणून किंवा दु: खाबद्दल क्षमा असा शब्द वापरला पाहिजे आणि शेवटी, प्रामाणिकपणे, तुमचा विश्वासू, अर्जदाराला लिहून आपली स्वाक्षरी तयार करा आणि त्या खाली आपले नाव लिहा.
  • प्रेषकाचा पत्ता – शहर परिसर / परिसर, शहर, पिनकोड इ.
  • दिनांक – पत्रात दिनांक नमूद करणे सर्वात महत्वाचे असते.

पत्र लेखनाच्या रचनेत पुढील पाच मुद्दे येतात

  • शीर्षक (Heading)
  • अभिवादन (Saluation)
  • गाभा (Content)
  • समारोप (Conclusion)
  • सही (Signature)

Patra Lekhan In Marathi Examples / Namuna

1) शुल्क माफी साठी प्रिंसिपल पत्र

सेवेमध्ये,

शाळेचे नाव

विषयः शुल्क माफीसाठी प्रधानाचार्य पत्र.

सर,

मी आपल्या शाळेच्या 10 व्या वर्गाच्या विद्यार्थ्यासाठी विनंती करतो. माझ्या वडिलांनी त्यांच्या लहान व्यवसायाद्वारे कुटुंबास कठोर परिश्रम केले. वाढत्या चलनवाढीमुळे अनेक समस्या येत आहेत. घरात आवश्यक वस्तूंची कमतरता आहे. माझे चार भाऊबंद वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकत आहेत, त्यांची शिक्षण – खर्चाचा भार इ. वडिलांच्या डोक्यावर भरलेला आहे.

मी माझ्या वर्गाचे परिश्रमपूर्वक विद्यार्थी आहे आणि नेहमीच प्रथम श्रेणीत येतो. मला खेळामध्येही खूप रस आहे.

म्हणून तुम्ही विनंती करता की कृपया माझ्या शाळेची फी क्षमा करा जेणेकरुन मी अभ्यास करू शकेन. माझे स्वागतकर्ते तुम्हाला खूप आभारी असतील.

तारीख: ………………….. तुमचा आज्ञाधारक शिष्य

जय प्रताप

वर्ग 10


2) बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

अ ब क शाळा / कॉलेज,

आ ब रोड,

पिनकोड

विषय : बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्याबाबत

महोदय,

मी विनंती करतो की मी आपल्या शाळेच्या __________ कक्षातील विद्यार्थी आहे. मला बँकेमध्ये बचत खाते उघडण्याची गरज आहे, त्यासाठी मला वास्तविक प्रमाणपत्र आवश्यक आहे. कारण माझ्याकडे अद्याप प्रमाणपत्र नाही.म्हणून मला वास्तविक प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी. कळावे!

धन्यवाद !

आपला विश्वासू विद्यार्थी

(नाव)


3) शाळेतून रजा मिळवण्यासाठी प्राध्यापकांना विनंती अर्ज

दिनांक ०८/१२/२०२३

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

शाळेचे नाव विद्यालय,

महोदय,

मी आपल्या  शाळेचा  इयत्ता १० वी क, मध्ये शिकणारा विद्यार्थि आहे. या पत्राद्वारे मी आपणास अर्ज करतो की, मी पुढच्या  आठवड्यात माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी गावी  जाणार आहे. तरी मी, दिनांक ५ जानेवारी ते १० जानेवारी पर्यन्त उपस्थित  राहु शकणार नाही. तरी आपणास विनंती आहे की मला ६ दिवसांची रजा मिळावी. यासाठी मी आपला सदैव आभारी राहीन. मी माझा उर्वरित अभ्यास रजेवरून आल्यावर पूर्ण करेन.

आभारी आहे.

आपला आज्ञाधारक विद्यार्थि

तुमचे नाव

१० क

1 thought on “पत्र लेखन मराठी – Marathi Patra Lekhan [विषय, प्रकार, नमुना, मायना, उदाहरण]”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा