मराठी भाषेतील म्हणी : Marathi Mhani in marathi

0
63

मराठी भाषेतील म्हणी : Marathi Mhani in marathi

 • अडला हरी गाढवाचे पाय धरी : शहाण्या व्यक्तीला अडचणीच्या वेळी मूर्ख व्यक्तीची मदत घ्यावी लागते.
 • अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी : लटक्या आधाराने आपली फजिती
 • आगीतून फुफाट्यात : एका संकटातून दुसऱ्या संकटात पडणलपविण्याचा प्रयत्न करणे.
 • आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी: आधी स्वत:च अविचार करतात, मग भीक मागायची पाळी येते.
 • आपला हात, जगन्नाथ : संधी साधली, की हवा तेवढा फायदा करून घेणे.
 • आपली पाठ आपणास दिसत नाही :आपले दोष आपणास दिसत नाहीत.
 • आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून : दुसऱ्याचे भले होऊ नये, म्हणून स्वत:चेच नुकसान करून घेणे,
 • आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कारटे :आपल्या माणसाची स्तुती व इतरांची निंदा करणे
 • आभाळास ठिगळ कोण लावील : मोठया आपत्तीचे निवारण करणे शक्य नसते.
 • आयत्या बिळात नागोबा : दुसऱ्याने स्वत:करिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती,
 • इकडे आड तिकडे विहीर : दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
 • इच्छा तेथे मार्ग : काम करायची इच्छा असली, तर ते कसे करायचे, ते आपोआप समजते.
 • उथळ पाण्याला खळखळाट फार : अंगी थोडेसे गुण असणाऱ्या माणसाला आढयता जास्त असते.
 • उठता लाथ, बसता बुक्की : दोन्हीकडून दोष मिळणे
 • उपट सूळ घे खांद्यावर : नसते लचांड पाठीमागे लावून घेणे,
 • एक घाव दोन तुकडे : उगाच चर्चा न करता झटपट निकाल लावणे.
 • एक ना धड भाराभर चिंध्या : कोणतेही एक काम पूर्ण न करता सर्व कामे अर्धवट सोडून देणे.
 • एकाच माळेचे मणी : सगळेच सारखे असणे.
 • औषधावाचून खोकला गेला : काहीही उपाय न करता संकट टळले.
 • आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे : अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.
 • आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते : एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
 • उंदराला मांजर साक्ष : ज्या गोष्टीत हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ.
 • कधी तुपाशी तर कधी उपाशी : संसारात कधी चांगली परिस्थिती येते, तर कधी वाईट.
 • काखेत कळसा गावाला वळसा : भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे.
 • कानामागून आली आणि तिखट झाली : मागून येऊन वरचढ होणे.
 • कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत : दुष्ट लोकांनी निंदा केल्याने भल्या माणसांचे वाईट होत नाही.
 • काळ आला होता, पण वेळ आली नव्हती : नाश होण्याची वेळ आली होती, पण थोडक्यात बचावले.
 • कुडी तशी पुडी : देहाप्रमाणे आहार
 • कोल्हा काकडीला राजी
 • क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूध होतात.
 • कोळसा उगाळावा तितका काळाच : वाईट ते वाईटच.
 • कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येणारच : एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला, तरी प्रसंगी ती उघड होतेच.
 • क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे : काहीही काम न करता बडबड करणे व्यर्थ होय.
 • खटाशी खट, उद्घटाशी उवट : या जगात जशास तसे वागावे.
 • खाई त्याला खवखवे : जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
 • खाण तशी माती :आईबापाप्रमाणेच त्यांची मुले.
 • खायला काळ भुईला भार : निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच त्रासदायक होतो
 • गरज सरो, वैद्य मरो : गरजू मनुष्य अगतिक बनतो व वाटेल ते ऐकून घेतो.
 • गुरूची विद्या गुरूला : एखाद्या माणसाची गरज संपली की त्याला ओळखही न देणे.
 • घर ना दार देवळी बि-हाड : बायकापोरे नसणारा एकटा व्यक्ती.
 • घरोघरी मातीच्या चुली : सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असते.
 • चणे खावे लोखंडाचे, तर ब्रह्मपदा नाचे : खूप कष्ट केल्यास थोरपणा प्राप्त होतो.
 • बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल : तुमच्या म्हणण्याला प्रत्यक्ष आधार दाखवा नाही तर हार पत्कर.
 • बाबा वाक्यं प्रमाणम् : थोर माणसांचा शब्द प्रमाण मानला जातो.
 • बावळी मुद्रा देवळी निद्रा : दिसण्यात बावळट पण व्यवहारचतुर.
 • बुडत्याचा पाय खोलात : अवनतीच्या काळात वाईट गोष्टींकडे आपोआप प्रवृत्ती होणे.
 • बुडत्याला काडीचा आधार : घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेले थोडेसे साहाय्यदेखील महत्त्वाचे वाटते.
 • बैल गेला अन् झोपी केला : एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्याची व्यवस्था करण .
 • बोलाचीच कढी, बोलाचाच भात : नुसते बोलून गार करून वाटेला लावणे.
 • बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले : बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला मान द्यावा.
 • भरवशाच्या म्हशीला टोणगा : खूप आशा वाटणाऱ्या बाबतीत संपूर्ण निराशा.
 • भुकेचे कोल्हे, काकडीला राजी : पोटात भूक मावत नसली, तर काहीही खाल्ले जाते.
 • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात : लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुणदोषांचे दर्शन होते.
 • मेल्या म्हशीला मणभर दूध : मनुष्य मेल्यावर त्याचे गुणगान करणे.
 • यथा राजा तथा प्रजा : राजा जसा बरा-वाईट असतो तशीच त्याची प्रजा बरी-वाईट असते.
 • रात्र थोडी सोंगे फार : कामे भरपूर पण वेळ थोडा.
 • रिकामे मन सैतानाचे घन : मन रिकामे असले, की कुविचार त्यात थैमान घालतात.
 • लहान तोंडी मोठा घास : आपल्या योग्यतेपेक्षा अवघड काम हाती घेणे.
 • लेकी बोले सुने लागे : एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
 • वडाची साल पिंपळाला : ज्यांचा एकमेकांशी संबंध नाही, अशा गोष्टी एकत्र जुळविणे.
 • वरातीमागून घोडे : एखादी गोष्ट घडल्यानंतर मागाहून त्यासंबंधाची साधने जुळविणे व्यर्थ.
 • विनाशकाले विपरीत बुद्धी : संकटकाळात बुद्धीही भलत्याच गोष्टीकडे वळणे.
 • विशी विद्या तिशी धन : लहान वयात आधी विद्या संपादन करावी म्हणजे नंतर धनप्राप्ती होते.
 • शक्तीपेक्षा युक्ती बरी : शक्तीने काम करण्यापेक्षा युक्तीने काम करणे अधिक चांगले.
 • शहाण्याला शब्दांचा मार : शहाण्या माणसाला एक शब्द बोलल्यानेही तो ताळ्यावर येतो.
 • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र : दुसऱ्याची वस्तू परस्पर तिसऱ्याला देणे, स्वत:ला झीज लागू न देणे.
 • हत्ती गेला, शेपूट राहिले : कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला.
 • हात दाखवून अवलक्षण : स्वत:हून एखादी पीडा मागे लावून घेणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here