संधी – मराठी व्याकरण

0
276

संधी – मराठी व्याकरण Sandhi Marathi Grammer

जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

संधी म्हणजे सांधणे, जोडणे.

संधीचे प्रकार
१) स्वरसंधी
२)व्यंजनसंधी
३) विसर्गसंधा

स्वरसंधी :
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडलेले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.
स्वर + स्वर असे त्यांचे स्वरूप असते.
उदा : सूर्य + सूर्य= (अ + अ = आ) सूर्यास्त

स्वरसंधीचे प्रकार :
अ) सजातीय स्वरसंधी :
-हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर -हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन
सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर होतो. यालाच
सजातीय स्वरसंधी असे म्हणतात.

उदा :
पोटशब्द एकत्र – येणारे स्वर व संधी = जोडशब्द
सूर्य + अस्त अ + अ = आ सूर्यास्त
देव + आलय. अ + आ = आ देवालय

ब) गुणादेश स्वरसंधी ः
अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहोंऐवजी ए येतो.
अ किंवा आ यांच्यापुढे उ किंवा उ आल्यास ओ येतो, आणि अ किंवा आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्या दोहोंऐवजी अर् येतो.
उदा ः
पोटशब्द एकत्र येणारे – स्वर व संधी = जोडशब्द
ईश्वर + इच्छा अ + इ = ए ईश्वरेच्छा
गण + ईश अ + ई = ए गणेश

क) वृद्ध्यादेश स्वरसंधी ः
अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोबद्दल ऐ येतो आणि अ किंवा आ
या स्वरापुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल औ हा स्वर येतो. याला वृद्ध्यादेश असे म्हणतातû
उदा ः
पोटशब्द एकत्र येणारे – स्वर व संधी = जोडशब्द
एक + एक अ + अ = ऐ एकैक
मत + ऐक्य अ + ऐ = ऐ मतैक्य

ड) यणादेश स्वरसंधी ः
इ, उ, ऋ (-हस्व किंवा दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास ः इ- ई बददल य हा वर्ण येउन पुढील स्वर त्यात मिसळतो. उ-ऊ बद्दल व
हा वर्ण येउन पुढील स्वर त्यात मिसळतो आणि ऋ बद्दल र हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो व संधी होतो.

य, व, र यांच्याबद्दल अनुवŠ्रमे इ, उ, ऋ आल्यास संप्रसारण म्हणतातû
उदा ः
पोटशब्द एकत्र येणारे स्वर व संधी जोडशब्द
प्रीती + अर्थ इ+ अ = य् + अ = य प्रीत्यर्थ
इति + आदि इ + आ = य् + आ = या इत्यादि

इ) उर्वरित स्वरसंधी ः
ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्यांबद्दल अनुवŠ्रमे अय, आय, अवी,
आवि असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.

उदा :
पोटशब्द एकत्र येणारे स्वर व संधी जोडशब्द
ने + अन ए + अ = अय् + अ = अय नयन
गै + अन ऐ + अ = आय् + अ = आय गायन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here