Talathi Bharti 2023 : महाराष्ट्रात लवकरच 4122+ अधिक रिक्त जागांसाठी तलाठी भरती होणार आहे . राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे व ५१८ मंडळ पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तरी या भरती बद्दल सर्व माहिती म्हणजेच, परीक्षा रिक्त जागा , शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, खालीलप्रमाणे.
तलाठी भरती माहिती – Talathi Recruitment 2023 Information
महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 4000 + पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 4000+ रिक्त पदे भरण्यास तलाठी भरती 2023 अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे.
तलाठी भरती पात्रता : Eligibility Criteria
- मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
तलाठी भरती वयोमर्यादा :
- सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
- मागास प्रवर्ग: 19 ते 43
महाराष्ट्र तलाठी वेतन : Talathi Salary
नवीन GR नुसार तलाठी वेतन श्रेणी – २५५०० ते ८११०० रुपये /- असेल . म्हणजेच प्रथम वर्षी In Hand 30,000 – 35000 एवढी सॅलरी पडते.
जिल्हानिहाय रिक्त पदे – Talathi Bharti Vacancy 2023
तलाठी विभाग | रिक्त पदे |
नाशिक | 1035 |
औरंगाबाद | 847 |
कोकण | 731 |
नागपूर | 580 |
अमरावती | 183 |
पुणे विभाग | 746 |
एकूण | 4122 |
ऑफिसिअल जाहिरात निघाल्यानंतर जागांमध्ये बदल होऊ शकतो.
तलाठी भरती परीक्षा स्वरूप : Talathi Exam 2023 Pattern
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
Detailed Syllabus of Talathi Recruitment Here
तलाठी भरती अर्ज कसा करावा : Talathi Online Application
या वर्षी तलाठी भरती हि IBPS किंवा TCS Ion या दोन कंपन्या द्वारे घेणार येणार आहेत, जाहिरात निघाल्या नंतर लगेच त्यांच्या ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक वरती अर्ज सादर करावा लागणार.
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज – लिंक आली नाही अपेक्षित फेब्रुवारी २०२३
परीक्षा दिनांक – Talathi Bharti 2023 Exam Date
तलाठी भरती २०२३ जाहीर झाल्यानंतर एक महिना किंवा त्या आधीच विविध टप्प्या मध्ये तलाठी भरती चा पेपर ऑनलाईन पद्धतिने घेतला जाईल.
तलाठी भरती साठी मोक टेस्ट – Free Talathi Test Series 2023
तलाठी भरती चे जुने पेपर्स – Talathi Previous Year Papers
1 thought on “Talathi Bharti 2023 : तलाठी भरती जाहिरात लवकरच – संपूर्ण माहिती बघा”