Talathi Bharti Update : तलाठी भरती लवकरच, या कारणांमुळे भरती लांबली

राज्यातील साडे चार हजार तलाठी पदे रिकामी आहेत, व ती भरण्यासाठी शासन लवकरच भरती करणार आहेत , परंतु काही कारणांमुळे भरती तीन महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत आहेत. राज्यात ३६ जिल्यांत ४५०० हुन अधिक महसूल विभागाचे तलाठी पदे रिकामी आहेत, व ते भरण्यासाठी शासकीय कामकाज सुरु आहे.

तलाठी भरती लवकरच लांबली गेली आहे कारण की अनेक मुद्दे त्यावर चर्चा होत आहेत. या मुद्दांमध्ये आदिवासी आरक्षणाची मागणी, बिनविरोध अंतर्जिल्ल्यात तलाठी पदाची भरती करण्याची मागणी यांचा समावेश आहे. तसेच विविध अन्य मुद्दे यांची संदर्भात समितीच्या रिपोर्ट आणि सरकारच्या निर्णयांची अपेक्षा आहे. यामुळे भरती लांबली गेली आहे.

काही न्यूज माध्यमानुसार ही पदे भरण्यासाठी राज्यातील 11 आदिवासी जिल्ह्यातील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नियमावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे तलाठी भरतीस उशीर होतांना दिसतोय.

पदे भरताना आदिवासी क्षेत्रातील स्थानिक तरूणांना वाव देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.

आदिवासी बहुल क्षेत्रात दोन ते तीन गावांना मिळून एक तलाठी कार्यरत असतो. त्यानुसारच कामकाज चालत असते. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त आहे. या जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील बिंदू नामावलीनुसार पद भरतीबाबत चर्चा सुरू आहे. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत. याबाबत मार्गदर्शन शासनाने मागविले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत कार्यवाही होईल, असे भूमि अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा