तलाठी भरतीची तारीख जाहीर, पुढील ३ महिन्यात चार हजार पदे भरणार

Talathi Bharti 2023 : कित्येक दिवसापासून प्रतीक्षेत असलेली तलाठी भरती अखेर लवकरच जाहीर होणार अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी नाशिक मधील सभेत सांगितले आहे व सर्व पदे तीन महिन्यात सर्व पदे भरण्याचे सांगितले आहे . येणाऱ्या १५ ऑगस्ट पर्यंत शासनाने अमृत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तलाठी भरती २०२३

या पदांम‌ध्ये साधारणत: ४,२०० तलाठी पदांचा समावेश आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात भरती प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा होती. पण पेसा क्षेत्रातील पदांमुळे ही भरती रखडली होती. त्यामुळे शासनाने नव्याने आदेश काढत भरती राबविण्यास सांगितले आहे.

तलाठी भरतीचे संपूर्ण माहिती बघा

तलाठी भरतीच्या नवीन उपडेट नुसार ४ एप्रिल सर्व भरती अधिकाऱ्यांची व TCS अधिकारी यांची बैठक झाली असून, येणाऱ्या काही दिवसातच तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्व सरळसेवा पदे भरण्याचे आदेश दिले असल्यामुळे लवकरच जाहिरात व परीक्षा त्यापूर्वी घेण्यात येईल असे वाटते .

संदर्भ : पुढारी

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा