अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) ने नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. AIIMS NORCET 2025 (Nursing Officer Recruitment Common Eligibility Test) च्या माध्यमातून देशभरातील AIIMS संस्थांमध्ये सुमारे 3500 नर्सिंग ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
एम्स नर्सिंग ऑफिसर भरती 2025 माहिती
भरतीचा तपशील:
- पदांची संख्या: 3500 पदे (सर्व AIIMS व संबधित संस्था )
- पदांचे प्रकार: Nursing Officer
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc. (नर्सिंग) किंवा B.Sc. (पोस्ट बेसिक नर्सिंग) पदवी प्राप्त केलेली असावी.
किंवा
डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM) आणि वैध नर्सिंग कौन्सिल नोंदणी असणे आवश्यक आहे. आणि २ वर्ष 50 बेड हॉस्पिटल मधील अनुभव
वय मर्यादा: 18-30 वर्षे इतर नियमानुसार सूट….
अर्ज प्रक्रिया:
- ऑनलाइन अर्ज: AIIMS च्या अधिकृत वेबसाइटवर (rrp.aiimsexams.ac.in) अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज फी: जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 3000 रुपये, एससी/एसटी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 2400 रुपये, तर दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे.
- अर्ज प्रक्रिया: अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी आपला वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरणे, फोटो आणि सही अपलोड करणे आणि शुल्क भरणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा: कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT)
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन: निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025
फायदे:
- चांगले वेतन आणि भत्ते: पे लेव्हल 4, 5, 6, 7 नुसार वेतनमान.
- नोकरीची स्थिरता: केंद्रीय सरकारी नोकरी म्हणून व्यावसायिक सुरक्षितता.
- कार्यक्षमता विकासाची संधी: AIIMS मध्ये काम करणे म्हणजेच आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी.
AIIMS NORCET Recruitment 2025 | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
होम पेज | येथे बघा |