अवयव आणि मूळ अवयव

● (१) 12 ही संख्या 2 आणि 6 या संख्यांच्या गुणाकाराने बनली आहे; म्हणून 2 आणि 6 हे 12 अवयव आहेत.12 = 2×6
● (२) 12 ही संख्या 3 आणि 4 या संख्यांच्या गुणाकाराने बनली आहे; म्हणून 3 आणि 4 हे 12 चे अवयव आहेत. 12 = 3×4
● (३) 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत आणि त्या 12 चे अवयवसुद्धा आहेत; म्हणून 2 आणि 3 हे 12 चे मूळ अवयव आहेत.
● (४) 6 ही संख्या 12 चा अवयव आहे; पण मूळ अवयव नाही; कारण 6 चे पुन्हा अवयव पडतात. 6 = 2 x 3
● (५) 2 ही संख्या 7 चा अवयव नाही; कारण 2 ने 7 ला पूर्ण भाग जात नाही.