मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) लिपिक (Clerk), लघुलेखक (Stenographer), शिपाई (Peon) आणि चालक (Driver) यांसारख्या विविध पदांसाठी २,३८१ हून अधिक जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवत आहे. ही भरती मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या तिन्ही खंडपीठांसाठी आहे.
| तपशील | माहिती |
| संस्थेचे नाव | मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) |
| पदांची नावे | लिपिक, लघुलेखक (उच्च/निम्न श्रेणी), वाहनचालक, शिपाई/हमाल/फरश |
| एकूण रिक्त जागा | २,३८१ (अंदाजित) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | १५ डिसेंबर २०२५ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | ०५ जानेवारी २०२६ |
| अधिकृत वेबसाइट | bombayhighcourt.nic.in |
उच्च न्यायालय भरती २०२५: पदांनुसार रिक्त जागा
| पदाचे नाव (Post Name) | रिक्त जागांची संख्या (Number of Vacancies) |
| लिपिक (Clerk) | १,३८२ |
| लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer – Lower Grade) | ५६ |
| लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer – Higher Grade) | १९ |
| शिपाई / हमाल / फरश (Peon / Hamal / Farash) | ८८७ |
| स्टाफ कार चालक (Staff Car Driver) | ३७ |
| एकूण (Total) | २,३८१ |
आवश्यक पात्रता काय? (पात्रता निकष)
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे. काही प्रमुख पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- लिपिक (Clerk):
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree).
- टायपिंग/कौशल्य: इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (WPM) किंवा समकक्ष. MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र आवश्यक.
लघुलेखक (Stenographer):
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
- कौशल्य: शॉर्टहँड (Stenography) ८०/१०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.
शिपाई (Peon/Hamal/Farash):
- शैक्षणिक पात्रता: किमान ७ वी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता व वाचता येणे आवश्यक.
वयोमर्यादा: किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार सूट).
अर्ज कसा करावा :
- मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “भरती” या विभागात जा.
- “High Court 2025 ” साठी भरती जाहिराती निवडा.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करा.
निवड प्रक्रिया (Selection Process):
🎯 निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड प्रामुख्याने खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
- लेखी परीक्षा/स्क्रीनिंग टेस्ट (Written Exam/Screening Test): यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणित आणि संगणक ज्ञान यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न (Objective Questions) असतील. लिपिक पदासाठी ही परीक्षा ९० गुणांची असेल आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ गुण आवश्यक आहेत.
- कौशल्य चाचणी (Skill Test): लिपिक आणि लघुलेखक पदांसाठी टायपिंग/शॉर्टहँड चाचणी घेतली जाईल.
- मुलाखत (Viva-voce/Interview): काही पदांसाठी मुलाखत घेतली जाईल.
- कागदपत्र पडताळणी (Document Verification).
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php ला भेट द्या…






