PCMC Bharti : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नवीन राष्ट्रीय आरोग्य अभियनाअंतर्गत आशा स्वयंसेविका (ASHA Workers) पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका (ASHA) पदे खालील प्रमाणे भरावयाची आहेत. सदर पदाची शैक्षणिक अर्हता, पदसंख्या, तपशिल व अटी-शर्ती खालील प्रमाणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३
पदाचे नाव: आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता:
- किमान १० (दहावी) उत्तीर्ण अथवा उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य
- विवाहित महिलांना प्राधान्य
- उमेदवार जाहिरातीमधील नमूद स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवासी असणे आवश्यक
कामाचे स्वरूप:
- आशा स्वयंसेविकांनी मनपाच्या रुग्णालय / दवाखाना कार्यक्षेत्रात रुग्णांना शासना कडील निर्देशांकानुसार संदर्भ सेवा पुरवावयाच्या आहेत व त्यानुसार त्यांना शासन नियमानुसार फक्त कामावर आधारीत मोबदला अदा केला जाईल.
अनुभव:
- संबंधित लोकसंख्येमध्ये यापूर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणून निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
(अनुभवाचे बाबतीत अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक)
वय : किमान २० ते कमाल ४५ वर्षे .
अर्ज कसा करावा:
उमेदवारांचे अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास व विहित कालावधीत व विहीत ठिकाणी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या कालावधीत स्वीकारण्यात येतील व त्याच दिवशी दुपारी २.०० वाजता पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. )
उपरोक्त नमुद करणेत आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास सकाळी ९ ते (१२ दु. १२ या वेळेत जेवले उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील. त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करण्यात येणार नाही व याबाबतचा अंतिम निर्णय आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक पि.चि.म.न.पा. यांचा राहील.
अधिक मा https://www.pcmcindia.gov.in/index.php ला भेट द्या..




![[Updated] Talathi Bharti Syllabus 2025 – तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Talathi Bharti Syllabus](https://www.mahasarav.com/wp-content/uploads/2022/11/talathi-bharti-syallbus.png)



