भगिनी निवेदिता ( मार्गारेट एलिझाबेथ ) माहिती मराठी

भगिनी निवेदिता माहिती मराठी ( Bhagini Navedita Marathi Information) : भगिनी निवेदिता म्हणजेच मार्गारेट एलिझाबेथ त्यांना सामाजिक कार्यकर्त्यां, लेखिका, हाडाच्या शिक्षिका असलेल्या मार्गारेट नोबल, ‘भगिनी निवेदिता’ या नावाने आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या म्हणून भारतात ओळखल्या जातात.
- जन्म: २८ ऑक्टोबर १८६७.
- मृत्यू : १३ ऑक्टोम्बर १९११
- पूर्ण नाव : मार्गारेट एलिजाबेथ सैम्युअल नोबल
- वडील : सैमुअल रिचमंड नोबल.
- आई : मेरी इसाबेल नोबल.
- जन्मस्थान : डंगनॉन टायरान (आयलंड).
- शिक्षण : हॅलीफॅक्स महाविद्यालय त्यांचे शिक्षण झाले.
- विवाह : अविवाहित
मार्गारेट एलिझाबेथ यांचे बालपण, शिक्षण आणि कार्य .
मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचा जन्म १८६७ सालचा, उत्तर आर्यलडमधील काऊंटी टिरोन इथला. मूळच्या आर्यलडच्या राहणाऱ्या.
भारतात राहून ज्या परकीय व्यक्तींनी भारतीय प्रदेश हीच आपली कर्मभूमी मानली आणि योगदान दिलं त्या आदरणीय व्यक्तींमध्ये मार्गारेट आग्रणी आहेत. त्यांनी महिला शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रात तर मोठं कार्य केलंच, पण एक ब्रिटिश नागरिक असूनही भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील कार्यकर्त्यांना उघडपणे मदत करून ब्रिटिश सरकारचा रोष ओढवून घेतला.
वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर त्या लंडन येथे आल्या आणि शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. या काळात ‘हसतखेळत बालशिक्षण’ या नव्या प्रयोगाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं.
त्याचा सखोल अभ्यास करून मार्गारेट यांनी जागतिक शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती आणि प्रगती कळावी म्हणून ‘सिसेम’ मंडळाचे सदस्यत्व घेतले. १८९४ साली आर्यलडमधील क्रांतिकारकांनी ‘सिल्केन’ हा पक्ष स्थापन केला.
मार्गारेट त्याच्याही सदस्य झाल्या. लंडनमध्ये मार्गारेट यांनी नवीन शिक्षण पद्धतीवर आधारित लहान शाळाही सुरू केली. याच काळात त्यांचा विवाह एका वेल्श तरुणाशी ठरला. परंतु साखरपुडय़ानंतर महिनाभराच्या काळात त्या तरुणाचे निधन झाले आणि मार्गारेट अविवाहित राहिल्या त्या आयुष्यभरासाठी! आणि त्यामुळेच त्या त्यांच्या आयुष्यात पुढे होऊ घातलेल्या मोठय़ा बदलांना सामोरे जाऊ शकल्या.
भगिनी निवेदिता कार्य
इ. स. १८८४ मध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी धरली आणि अध्यापनाचे कार्य करू लागल्या.
इ. स. १८९२ मध्ये त्यांनी विम्बल्डन येथे ‘रस्किन स्कूल’ या नावाने शाळेची स्थापना केली. तेथे नवीन शिक्षण पद्धतीप्रमाणे शिक्षण मिळत असे.
इ. स. १८९५ मध्ये स्वामी विवेकानंद इंग्लंडला गेले असता त्यांच्या सखोल चिंतनाने व नव्या युगाला अत्यंत उपयुक्त अशा विचारांनी भरलेल्या व्याख्यानांनी मागरिट नोबल प्रभावित झाल्या.
२८ जानेवारी १८९८ रोजी मागरिट नोबल भारतात आल्या. पुढे २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदानी त्यांना विधिपूर्वक ‘ब्रह्मचारिणी’ व्रताची दीक्षा देऊन त्यांचे नाव ‘निवेदिता’ (निवेदिता म्हणजे जिने आपले जीवन समर्पित केले आहे अशी) असे ठेवले आणि ते पुढे चालून मागरिट नोबल यांनी आपले बदलले नाव खरे करून दाखविले. याच वर्षी कलकत्ता येथे ‘निवेदिता बालिका विद्यालया’ची स्थापना त्यांनी केली.
इ.स. १८९९ मध्ये कलकत्त्यात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांची सेवा केली.
रामकृष्ण मिशनला मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांचा दौरा केला.
इ.स. १९०२ मध्ये पुण्यास जाऊन देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या चाफेकर बंधूंच्या आईच्या चरणांना स्पर्श करून तिच्या चरणाची धूळ त्यांनी आपल्या मस्तकी लावली.
इ. स.१९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला.
भगिनी निवेदिता ग्रंथसंपदा
द मदर, हिंट्स ऑन नॅशनल एज्युकेशन इन इंडिया, वेब ऑफ द इंडियन लाईफ, रिलीजिएन अॅण्ड धर्मा, सिव्हिल अॅण्ड नॅशनल आइडियल्स इत्यादी.
Resources: