English Grammar – Degree of comparison

Positive degree, comparative degree आणि superlative degree हे तुम्ही ऐकलेलेच शब्द आहेत. ही विशेषणांच्या रूपांची नावे आहेत. यापैकी positive degree चे रूप विशेषणाचे सर्वात साधे रूप असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एखाद्या नामाबद्दल सर्वसाधारण माहिती सांगण्यासाठी – त्या नामात असलेल्या गुणाचे निव्वळ अस्तित्व दर्शवण्यासाठी विशेषणाचे positive रूप वापरतात.

उदा : This is a useful book.
(useful हे विशेषणाचे Positive degree चे रूप आहे).

विशेषणाचा उपयोग तुलना करण्यासाठी करताना विशेषणाच्या comparative रूपाचा उपयोग करतात.
उदा. You have become taller than your father.
(या वाक्यातील taller हे विशेषणाचे comparative रूप आहे.)

एखाद्या गोष्टीत एखादे गुण सर्वोच्च दर्जाचे आहे असे दर्शवण्यासाठी विशेषणाचा उपयोग करताना विशेषणाचे superlative रूप वापरतात.
• उदा: This is the best book I have ever read.
(best हे विशेषणाचे superlative रूप आहे.)

मुख्य म्हणजे विशेषणाची ही रूपे वाक्यात कशी वापरली जातात आपण ते बगूया.

positive degree च्या विशेषणाचे comparative व superlative करताना अनुक्रमे er व est जोडतात किंवा more व most वापरतात. जसे,
tall- taller – tallest
intelligent – more intelligent – most intelligent

आता er, est केव्हा जोडतात व more, most केव्हा वापरतात ते आपण पाहू.

हे पाहताना मधे मधे syllable या शब्दाचा उल्लेख होईल. म्हणून syllable चा अर्थ आधी पाहून घ्या :- syllable म्हणजे मराठीत एका शब्दात – शब्दावयव. आणि ‘शब्दावयव’ म्हणजे काय ते खालील उदाहरणांवरून लक्षात येईल.

पहा – great, rich, tall आणि fat या शब्दांमधे प्रत्येकी एकच अवयव आहे. कारण उच्चाराच्या दृष्टीने या शब्दांचे एकापेक्षा जास्त तुकडे पाडता येत नाहीत. पण fat ness आणि joy ful यांचे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी दोन तुकडे पडतात. म्हणून fatness आणि joyful मधे दोन-दोन syllable आहेत. आणि im por tant a joy ful ness मधे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी तीन syllable आहेत.

● आता er/est a more/most मधील फरक पहा:

• १) एका syllable च्या विशेषणाचे CD (=Comparative degree चे रूप) व SD (=Superlative degree चे रूप) करताना साधारणपणे अनुक्रमे er/est लावतात.
जसे, great – greater – greatest long – longer – longest
short – shorter – shortest bright – brighter – brightest

अपवाद:- real, right आणि wrong ची रूपे मात्र more/most वापरून होतात.

er/est लावताना विशेषणाच्या शेवटी-e असल्यास फक्त r -व-st लावतात.
उदा. wise -wiser-wisest, brave – braver – bravest

• शेवटी y असल्यास ‘चे i करून er, est लावतात. (उदा. dry – drier – driest.)

• शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करून er/est लावतात .
उदा. fat – fatter- fattest, big-bigger – biggest.

• २) दोन किंवा दोनपेक्षा जास्त syllable असलेल्या विशेषणाचे CD व SD करताना साधारणपणे more, most वापरतात.
उदा. useful
more useful
most useful

काही अपवाद :

• पुढील शब्द दोन syllable चे असूनही त्यांचे CD व SD करताना -er, -est लागते :pleasant (सुखावह, आनंददायक), common (सामान्य), handsome (देखणा), polite (सभ्य), wicked (दुष्ट), cruel (क्रूर).

• तीन syllable असलेल्या विशेषणांचे comparative a superlative फक्त more/most वापरून करतात. जसे,
important ,more important, most important

• पण -un सुरुवातीला व शेवटी -y असलेल्या काही (तीन syllable च्या) विशेषणांचे comparative / superlative ‘er/est’ लावून सुद्धा केले जाऊ शकते.

उदा : uneasy (अस्वस्थ, बेचैन), ungainly (बेढब, बेडौल), uncanny (विचित्र, रहस्यमय, गूढ), unhealthy (आरोग्याला अपायकारक), unlucky (दुर्दैवी), unruly (नियंत्रणात ठेवायला कठीण), unsightly (कुरूप), untidy (अव्यवस्थित), unhappy (दु:खी)

• वर PD. च्या विशेषणाचे CD व SD कसे करावे ते आपण पाहिले आहे. पण काही विशेषणांचे CD व SD वरीलपैकी कोणत्याही नियमानुसार होत नाहीत. असे अपवाद खाली दिले आहेत.
● उदा.good – better – best
little-less – least
bad – worse – worst
much – more. most
many-more-most
far – farther – farthest

टीप :- बऱ्याच विशेषणांची comparative व superlative रूपे होतात. पण काही विशेषणे Total (एकूण), lunar (चंद्राचा), mathematical (गणितीय), medical (वैद्यकीय), (गोल), unique (एकमेव), complete (संपूर्ण), chief (प्रमुख), इत्यादी.
अशा विशेषणांची comparative / superlative रूपे होत नाहीत.

वर शिकलेली वेगवेगळ्या degree ची रूपे वाक्यात कशी वापरायची ते आपण आता पहायला सुरुवात करू.

पहा – पुढील वाक्य कोणत्या degree चे आहे :
America is the richest country.

● हे वाक्य SD (=superlative degree) चे आहे. कारण या वाक्यात richest हा शब्द आहे. आता या वाक्याचा जो अर्थ आहे तोच अर्थ आपण CD व SD वापरून सुद्धा व्यक्त करू शकतो. म्हणजे आपण एकच अर्थ तिन्ही degree वापरून व्यक्त करू शकतो.

● या वाक्याचे CD करताना सुरुवात America पासूनच होईल. आणि America नंतर is येईल आणि the richest चे richer होईल. CD च्या विशेषणासोबत साधारणपणे the वापरत नाहीत. richer नंतर लगेच than any other येईल. than any other नंतर उरलेला भाग.

तर CD चे वाक्य होईल :- America is richer than any other country.

या वाक्यात any ऐवजी,all सुद्धा वापरता येईल. पण तेव्हा country ऐवजी countries येईल. पहा – America is richer than all other countries.

● आता P.D. चे वाक्य करताना अर्थ सारखा ठेवण्यासाठी वाक्याची सुरुवात No other पासून करतात. No other नंतर ‘अमेरिका’ काय आहे ते लिहितात. अमेरिका country आहे. आणि country नंतर S.D. च्या वाक्यात शेवटी काही जास्तीचा भाग असेल जसे in
The world वगैरे तर तो भाग साधारणपणे इथे लिहितात.

● पण सध्या आपल्या वाक्यात तसं काहीच नाही. म्हणून आता No other country नंतर सरळ is, आणि is नंतर P.D. चे रूप म्हणजे rich, आणि rich च्या मागे पुढे as वापरतात (म्हणजे as rich as).आणि शेवटी America.

तर PD.चे वाक्य असे होईल:-
No other countryis as rich as America.

अशा प्रकारे सुरू होणारे P.D. चे वाक्य as – as ऐवजी so – as वापरून सुद्धा करता येईल. so-as वापरून हे वाक्य असे होईल :

No other country is so rich as America.

आता या तिन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे का ते पहा :
S.D. च्या वाक्याचा अर्थ :- अमेरिका सर्वात श्रीमंत देश आहे.
C.D. च्या वाक्याचा अर्थ :- अमेरिका दुसऱ्या कुठल्याही देशापेक्षा जास्त श्रीमंत आहे.
P.D. च्या वाक्याचा अर्थ :- दुसरा कोणताही देश अमेरिकेइतका श्रीमंत नाही.

● S.D. च्या वाक्यात कधीकधी of all असतं, जसे America is the richest of all countries. तेव्हा या वाक्याचे C.D. व P.D अगदी वरच्यासारखेच होईल. कारण of all मुळे वाक्याच्या अर्थात काही फरक पडत नाही.

आता पुढील वाक्य पहा :

America is one of the richest countries.

या वाक्याचा अर्थ आधीचे वाक्य (America is the richest country) पेक्षा वेगळा आहे. या one of असलेल्या वाक्याचा अर्थ आहे, ‘अमेरिका अत्यंत श्रीमंत देशांपैकी एक आहे’.

● लक्षात घ्या :- one of नंतर S.D. च्या विशेषणाचा अर्थ ‘सर्वात…’ ऐवजी ‘अत्यंत…..’ असा होतो. म्हणून इथे richest चा अर्थ ‘सर्वात श्रीमंत’ ऐवजी ‘अत्यंत श्रीमंत’ असा झाला.

तर one of असलेल्या या वाक्याचा अर्थ आधीच्या वाक्यापेक्षा वेगळा असल्यामुळे याचे CD व SD करताना पुढील नियमाकडे लक्ष द्यावे लागेल.

● नियम:-S.D. च्या वाक्यात one of असल्यास त्याचे C.D. करताना than most other किंवा than many other वापरावे. आणि P.D. च्या वाक्याची सुरुवात Very few पासून करावी. या नियमानुसार वरील वाक्याचे C.D. व P.D खालीलप्रमाणे होईल.

CD :- America is richer than most other countries.
अमेरिका दुसऱ्या बहुतांश देशांपेक्षा/अनेक देशांपेक्षा जास्त श्रीमंत आहे.

PD :- Very few countries are as rich as America.
Very few countries are so rich as America.
फारच थोडे देश अमेरिकेइतके श्रीमंत आहेत

English Grammar – Degree of comparison | English Grammar in Marathi

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा