MPSC Rajyaseva 2024 – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सुधारित जाहिरात

MPSC Rajyaseva 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 29 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना जाहीर केली होती आहे. तत्पर आता नवीन सुधारित जाहिरात ८ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे, या परीक्षेद्वारे विविध विभागांमध्ये 274 524 पदे भरण्यात येणार आहेत.

अधिसूचनेतील महत्त्वाच्या तारखा MPSC Rajyaseva Date

संबंधित परीक्षेकरीता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करु शकतात.

  • अर्ज सादर करण्याची सुरुवात: 05 जानेवारी 2024  09 मे 2024
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024 24 मे 2024
  • पूर्व परीक्षा: 28 एप्रिल 2024  06 जुलै 2024
  • मुख्य परीक्षा: 14 ते 16 डिसेंबर 2024

एकूण जाहीर जागा –

विभागसंवर्गजागा
सामान्य प्रशासन विभाग (राज्यसेवा)राज्य सेवा गट-अ व गट-ब४२४
मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब४८
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब४५

अर्ज करण्याची पात्रता – Eligibility Criteria

  • उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली असावी. (Any Graduate)

परीक्षा पद्धत – MPSC 2024 Rajyaseva Pattern

पूर्व परीक्षा दोन पेपरमध्ये घेतली जाईल. पेपर 1 मध्ये सामान्य अध्ययन आणि पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी असेल. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असेल आणि दोन्ही पेपर एकत्रितपणे 400 गुणांचे असतील.

MPSC राज्यसेवा 2024 साठी जुना अभ्यासक्रम डाऊनलोड करा

मुख्य परीक्षा चार पेपरमध्ये घेतली जाईल. पेपर 1 मध्ये मराठी भाषा आणि साहित्य, पेपर 2 मध्ये इंग्रजी भाषा आणि साहित्य, पेपर 3 मध्ये सामान्य अध्ययन आणि पेपर 4 मध्ये वैयक्तिक गुणवत्तेची चाचणी असेल. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असेल आणि चार पेपर एकत्रितपणे 800 गुणांचे असतील.

परीक्षेसाठी अर्ज कसा करावा? MPSC Application

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याचा शुल्क ₹544/- आहे.

नवीन सुधारित जाहिरात डाउनलोड करा (08 मे 2024)
जाहिरात डाऊनलोड करा MPSC 2024 Notification PDF
अर्ज करण्याची लिंकएमपीएससी ऑनलाइन

परीक्षाची तयारी कशी करावी? How To Apply For MPSC Rajyaseva

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

  • एका चांगल्या अभ्यासक्रमाची निवड करा.
  • नियमित अभ्यास करा.
  • विविध प्रकारच्या प्रश्नांची सराव करा.
  • आपल्या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रित करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा ही एक कठीण परीक्षा आहे, परंतु योग्य तयारी आणि मेहनतीने ती पार पाडणे शक्य आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा