पंचायत समिती माहिती : Panchayat Samiti in Marathi

पंचायत समिती माहिती (Panchayat Samiti in Marathi) : पंचायत समिती हा गटस्तरावर (तालुकास्तरावर) कार्यरत असणारा पंचायत राजचा घटक आहे.

• ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून पंचायत समितीस विशेष महत्त्व आहे.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.

• महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१, च्या कलम (५६) नुसार प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद केलेली आहे.पंचायत समितीची माहिती(Panchayat Samiti in Marathi) खालीलप्रमाणे आहे.

पंचायत समिती माहिती : Panchayat Samiti in Marathi

पंचायत समितीचा कार्यकाल : पंचायत समितीचा कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत ५ वर्षे असतो.दार ५ वर्षाने पंचायत समितीच्या निवडणूक होतात. परंतु राज्यशासनास पंचायत समितीचा कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार असतो.

निवडणूक पद्धती : पंचायत समितीची निवडणूक पद्धती हि प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धती असते.

रचना : अधिनियमाच्या कलम (५७) नुसार पंचायत समितीवर खालीलप्रमाणे सदस्यांची नियुक्ती केली जाते
संबंधित गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्षरीत्या निवडून गेलेले प्रतिनिधी.

गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या ही त्याच गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्य संख्येच्या दुप्पट असते कारण, दर २०,००० लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातो तर दर ४०,००० लोकसंख्येमागे एक सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जाते. म्हणजेच जिल्हा परिषदेच्या एका वॉर्डमध्ये पंचायत समितीचे दोन वॉर्डस् समाविष्ट असतात.

आरक्षण :१) महिलांकरिता (अनु. जाती-जमाती व मागास प्रवर्गासह) ५०% जागा राखीव असतात.
२) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी : २७% जागा राखीव असतात.
३) अनुसूचित जाती-जमातींसाठी गटातील एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात.

सभापती व उपसभापती : पंचायत समितीचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती म्हणून व दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेने पंचायत समितीच्या पहिल्याच सभेत केवळ सभापतीची निवड केली जाते.
यानंतरच्या दुसऱ्या सभेत उपसभापतींची निवड केली जाते.सभापती-उपसभापतींच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यास त्यांची निवड सभेच्या
चिठ्या टाकून केली जाते.

सभापती व उपसभापती कार्यकाल : पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल अडीच वर्षे इतका असतो.

पंचायत समिती सदस्य मानधन : सभापती याना दरमहा रु. १०,०००/- अधिक भत्ते,इतके मानधन भेटते .तर उपसभापती याना दरमहा रु. ८,०००/- अधिक भत्ते इतके मानधन भेटते.

राजीनामा : पंचायत समिती सदस्य व उपसभापती यांचा राजीनामा द्यायचा असल्यास ते आपला राजीनामा सभापतींकडे यांच्याकडे देतात.व सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात.

अविश्वास ठराव : निवडणूक झाल्यानंतर पहिले ६ महिने अविश्वास ठराव मांडता नाही येत.अधिनियमातील कलम ७२ नुसार पंचायत समितीच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा अधिकार असणाऱ्या सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्यांनी मागणी केल्यास सभापती-उपसभापती यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.
अविश्वास ठराव संमत होण्यासाठी जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने बोलाविलेल्या खास सभेत २/३ सदस्यांचे बहुमत आवश्यक असते. अन्यथा हा ठराव फेटाळला जातो. महिला पदाधिकाऱ्यांबाबत अविश्वास ठराव संमत होण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमत आवश्यक. अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास पुन्हा वर्षभर नवा अविश्वास ठराव मांडता येत नाही.

सभापतींची कार्ये :

१) पंचायत समितीच्या सभा बोलाविणे व त्यांचे अध्यक्षपद भूषविणे.
२) सभापतीस पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल, हिशेब व इतर आवश्यक कागदपत्रे मागविण्याचा अधिकार आहे.
३) पंचायत समिती वा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे.
४) पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार असतो.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा