महाराष्ट्रातील समाज सुधारक- अॅनी बेझंट (इ. स.१८४७ ते १९३३)

0
43
  • जन्म : १ ऑक्टोबर, १८४७.
  • मृत्यू : २० सप्टेंबर १९३३
  • पूर्ण नाव : अॅनी फ्रँक बेझंट.
  • वडील :विलीयम पेजवूड.
  • आई : एमिली
  • जन्मस्थान : लंडन (इंग्लंड).
  • शिक्षण : अॅनी बेझंट शिक्षण इंग्लंड आणि जर्मन ला झाले. इंग्रजी, जर्मनी आणि फ्रेंच भाषा अवगत.
  • विवाह : फ्रँक बेझंट सोबत (इ.स.१८६७ मध्ये)

अॅनी बेझंट कार्य

डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंड च्या विदुशी होत्या.

१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.

फ्रँक बेझंट हा खिश्चन धर्मावर गाढा विश्वास असणारा होता तर त्याच्या उलट श्रीमती अॅनी बेझंट या स्वतंत्र विचाराच्या व खिश्चन धर्मावर गाढ विश्वास-श्रद्धा नसणाऱ्या होत्या. त्यामुळे दोघांत तणाव वाढत गेला. परिणामी इ. स. १८७३ मध्ये अॅनी बेझंट घटस्फोट घेतला.

वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला.

१८९३ साली भारतात आलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीत रुजू होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.

मंडालेच्या तुरुंगातून टिळक सुटल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनीच केला. १९१६ च्या लखनौ अधिवेशनात टिळक परत काँग्रेसमध्ये आले.

पुढे काही काळानंतर त्यांची भेट अज्ञेयवादी विचारसरणीच्या चार्लस् ब्रेडला यांच्याशी झाली. अॅनी बेझंट चार्लस ब्रेडलामुळे खूपच प्रभावित झाल्या आणि ‘राष्ट्रीय असांप्रदायिक संस्थे’ च्या सदस्या बनल्या. याच काळात त्या ‘नॅशनल रिफॉर्मर’ या वृत्तपत्राच्या सहसंपादिका बनल्या.

मॅडम ब्लॅव्हेंटस्की आणि कर्नल ऑलकॉट यांनी न्यूयॉर्क येथे ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ ची स्थापना केली. श्रीमती अॅनी बेझंट इ. स. १८८९ मध्ये त्याच्या सदस्या बदल्या. ही सोसायटी सर्व धर्माचे समर्थन करीत होती.

इ.स. १८९३ मध्ये अनी बेझंटनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भाग घेतला, त्याच वर्षी त्या भारतात आल्या. त्यांनी हिंदू संस्कृत ग्रंथ, वेद, उपनिपदे यांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा जडली. संस्कारांनी आणि हृदयानी आपण भारतीय आहोत, असे त्यांना वाटू लागले.

इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू स्कूलची त्यांनी स्थापना केली.

इ.स. १९०७ मध्ये ऑलकॉटच्या मृत्यूनंतर अॅनी बेझंट ‘थिऑसॉफीकल सोसायटीच्या अध्यक्षा बनल्या.

इ. स. १९१४ मध्ये त्यांनी ‘द कॉमन व्हील’ व ‘न्यू इंडिया’ ही दोन वृत्तपत्रे आपल्या आदर्शाच्या प्रचाराकरिता सुरू केली.

इ. स. १९१६ मध्ये त्यांनी मद्रास येथे ‘ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळीद्वारे राष्ट्रीय आंदोलनाला विलक्षण गती दिली. होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे. यालाच ‘स्वशासन’ म्हणतात. भारतीय होमरूल चळवळीने स्वयंशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले.

इ. स. १९१७ मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अॅनी बेझंट यांनी अध्यक्षपदही भुलविले होते.

डॉ.एनी बेझंट यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे १९१७ च्या कोलकाता अधिवेशनाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या.

पहिल्या महायुद्धात इंग्रजांची अडचण हीच भारतासाठी सुवर्णसंधी आहे असा कानमंत्र त्यांनी भारतीयांना दिला.

भारतासाठी व भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार सुरु केला.

त्यावेळी त्यांचे प्रसिद्ध वाक्य पुढील होते,

“इंग्रजांकडे आम्ही आमचा हक्क मागतोय भीक नव्हे”

१९२२ साली त्यांनी बॅनर्स येथे हिंदू विद्यालयाची स्थापना केली.

भारतात त्यांनीच प्रथम बालवीर चळवळ सुरु केली.

संबंध भारतात त्यांनीच प्रथम होमरूल लीग स्थापना केली.

ग्रंथसंपदा

इंडियन आइडियल, इंडिया ए नेशन, हाऊ इंडिया ब्रॉट हर फ्रीडम , इन डिफेन्स ऑफ हिंदुइझम इत्यादी.

विशेषता

  • अॅनी बेझंट यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले.
  • राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा