IBPS मार्फ़त विविध बँक मध्ये PO/MT आणि SO च्या 6200+ जागांसाठी भरती

IBPS PO/SO Recruitment 2025: भारतीय बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. भारतीय बँकिंग कार्मचारी चयन मंडळ (IBPS) ने देशातील विविध बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजर (PO/MT) आणि स्पेशलायझ्ड ऑफिसर (SO) या पदांसाठी 6200+ जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

IBPS PO/MT आणि SO भरती 2025 :-

IBPS ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारतातील बँकांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया आयोजित करते. IBPS दरवर्षी PO/MT, क्लर्क, आरआरबी ऑफिसर आणि आरआरबी ऑफिस असिस्टंट यांसारख्या विविध पदांसाठी परीक्षा घेते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काय आहे PO/MT आणि SO?

  • PO/MT: प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजर हे बँकेचे प्रवेशस्तरीय अधिकारी असतात. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये ग्राहक सेवा, कर्ज देणे, बँकेचे उत्पादन विक्री करणे इत्यादींचा समावेश होतो.
  • SO: स्पेशलायझ्ड ऑफिसर हे विशिष्ट क्षेत्रात तज्ञ असतात. उदाहरणार्थ, IT, मार्केटिंग, लॉ इत्यादी.

पदाचे नाव – Probationary officer/ Management Trainee/ Specialist Officer – IT, Agri, HR,Rajsabha Adhikari, Marketing, Law

एकूण पदे : 5208+ 1007 [जागा वाढतील अनेक बँकांनी अजून संख्या टाकली नाही]

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] पदानुसार बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

शैक्षणिक पात्रता :

PostVacenciesQualification
Probationary Officers / Management Trainees XIV5208+कोणतेही पदवीधर/ A Degree (Graduation) in any discipline
IBPS SO 1007A Degree in IT – BE/B.Tech/MCA or Related / Agri/Law/MA/MBA/MMS etc..

वेतन : नियमानुसार सुरुवात जवळ 85,000 /-

निवड प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत

परीक्षा भाषा : इंग्लिश, हिंदी

परीक्षेचे स्वरूप:

IBPS PO/MT आणि SO परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते:

  • प्रारंभिक परीक्षा (Prelims): ही परीक्षा ऑनलाइन असते आणि यामध्ये सामान्य जागरूकता, संख्यात्मक क्षमता, तर्कशास्त्र आणि इंग्रजी भाषा या विषयांचे प्रश्न असतात.
  • मुख्य परीक्षा (Mains): ही परीक्षा देखील ऑनलाइन असते आणि यामध्ये प्रारंभिक परीक्षेचे विषय आणि बँकिंग जागरूकता या विषयांचे प्रश्न असतात.
  • Interview : दोन्ही परीक्षेत पात्र उमेदवारांचे Basic Interview घेतला जातो.

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 01 जुलै 2025 ते 21 जुलै 2025

IBPS PO/MT जाहिरात व अर्ज लिंक https://www.ibps.in/index.php/management-trainees-xv/
IBPS SO जाहिरात व अर्ज लिंक https://www.ibps.in/index.php/specialist-officers-xv/

IBPS अर्ज कसा करावा

1. IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर तुम्हाला ‘करिअर’ किंवा ‘भरती’ यासारखा एक विभाग सापडेल.

2. नवीन नोंदणी करा:

  • जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला एक नवीन खाते तयार करावे लागेल. यासाठी तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी, पासवर्ड इत्यादी माहिती भरावी लागेल.

3. अर्ज फॉर्म भरून टाका:

  • नवीन खाते तयार केल्यानंतर तुम्हाला अर्ज फॉर्म भरून टाकावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव (जर असल्यास), श्रेणी, अपंगत्व इत्यादी माहिती भरावी लागेल. सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरा.

4. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा:

  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइजचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. फोटो आणि स्वाक्षरीची स्पष्टता आणि आकार याची काळजी घ्या.

5. परीक्षा शुल्क भरा:

  • अर्ज फॉर्म भरून आणि आवश्यक दस्तऐवजे अपलोड केल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरावे लागेल. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून शुल्क भरू शकता.

6. अर्ज सबमिट करा:

  • सर्व माहिती भरून आणि शुल्क भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल. सबमिट करण्यापूर्वी एकदा सर्व माहिती पुन्हा तपासून घ्या.

7. अर्जाची प्रत प्रिंट करून ठेवा:

  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाची एक प्रत प्रिंट करून ठेवावी. भविष्यात याची गरज पडू शकते.

महत्वाची सूचना:

  • अर्ज करताना दिलेली सर्व माहिती अचूक असावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख गेल्यावर तुम्ही अर्ज करू शकणार नाही.
  • परीक्षा शुल्क एकदा भरल्यानंतर ते परत मिळणार नाही.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा