महाराष्ट्रातील समाज सुधारक- गोपाळ कृष्ण गोखले ( इ. स १८६६ ते १९१५ )

0
46
  • जन्म: ९ मे १८६६
  • मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५
  • पूर्ण नाव : गोपाळ कृष्ण गोखले
  • वडील : कृष्णराव
  • आई : सत्यभामा.
  • जन्मस्थान : कोतळूक (जि. रत्नागिरी, महाराष्ट्र)
  • शिक्षण : इ. स. १८८४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून बी.ए. (गणित) ची परीक्षा उत्तीर्ण
  • इ. स. १८८६ मध्ये कायद्याची पदवी मिळवली
  • विवाह : सावित्रीबाई सोबत.

कार्य

इ.स. १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ३५ रुपये पगारावर त्यानी शिक्षकाची नोकरी पत्करली.

इ.स. १८८६ मध्ये पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीयसदस्य बनले.

इ.स. १८८७ पासून फ्रुसन कॉलेजात इंग्रजी आणि इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. इंग्रजी भाषेवर त्यांचे अप्रतिम प्रभुत्व होते.

इ.स. १८८८ मध्ये ‘सुधारक’ या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाच्या संपादकाची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांभाळली.

इ.स. १८८९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश.

इ. स. १८९० सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली.

इ.स. १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ‘फेलो’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

इ.स. १८९७ मध्ये गोखले यांनी वेल्बी कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी इंग्लंडला भेट दिली. त्यानंतर विविध कारणांसाठी आणखी सहा वेळा ते इंग्लंडला गेले.

इ. स. १८९९ मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद म्हणून ते निवडून आले.

इ. स. १९०२ मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली.

इ. स. १९०५ मध्ये ‘भारत सेवक समाज’ (सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी) ही संस्था स्थापन केली. राष्ट्राच्या सेवेसाठी प्रामाणिक, निष्ठावंत व त्यागभावनेने कार्य करणारे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तयार करणे हा या संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होता.

इ. स. १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

इ.स. १९१२ मध्ये त्यांची भारतातील सनदी नोक-यांशी संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

इ.स. १९१२ मध्ये महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून ते दक्षिण आफ्रिकेला गेले.

दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रही चळवळीला साहाय्य करण्यासाठी निधी उभारण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला होता.

विशेषता

महात्मा गांधींनी गोपाळ कृष्ण गोखले यांना आजन्म राजकीय गुरू मानले.

मृत्यू

१९ फेब्रुवारी १९१५ रोजी त्यांचे निधन झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा