बँकिंग क्षेत्रात करिअर बनवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे! बँक ऑफ महाराष्ट्रने 2025-26 या वर्षासाठी 500 जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र बँक भरतीचा तपशील
- संस्था: बँक ऑफ महाराष्ट्र
- पदाचे नाव: जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)
- पदांची संख्या: 500
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाइट: bankofmaharashtra.in
हे पण बघा – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 6,589 क्लर्क पदांची महाभरती, ऑनलाईन अर्ज सुरू
पात्रता निकष
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री किंवा एकात्मिक दुहेरी डिग्री (Any Graduate) (किमान 60% गुणांसह, SC/ST/OBC/PWD साठी 55% गुण).
- चार्टर्ड अकाउंटंट (CA) उमेदवार देखील पात्र.
- किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा (31 जुलै 2025 नुसार):
- किमान वय: 22 वर्षे
- कमाल वय: 35 वर्षे
- सूट: SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे.
निवड प्रक्रिया:
- ऑनलाईन लेखी परीक्षा (150 गुण)
- मुलाखत (100 गुण)
- अंतिम निवड 75:25 गुणप्रमाणात (लेखी परीक्षा:मुलाखत).
- सामान्य/EWS साठी किमान 50% गुण, SC/ST/OBC/PWD साठी 45% गुण आवश्यक.
अर्ज शुल्क:
- सामान्य/EWS/OBC: ₹1180/-
- SC/ST/PWD: ₹118/-
- शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरावे लागेल.
वेतन आणि नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना ₹64,820/- ते ₹93,960/- मासिक वेतन मिळेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकते, त्यामुळे उमेदवारांनी यासाठी तयार असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र जाहिरात | डाउनलोड करा |
BOM अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा?
- बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्या.
- “Careers” किंवा “Recruitment” सेक्शनमध्ये जा.
- भरतीशी संबंधित लिंक निवडा आणि नोंदणी करा.
- अर्जामध्ये आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घेऊन सुरक्षित ठेवा