नकारार्थी वाक्ये – Negative Sentences Examples

◆ नकारार्थी वाक्ये – Negative Sentences Examples | English Grammar

● नकारार्थी वाक्यात ज्याप्रमाणे मराठीत नाही, नव्हता, नसेल, नको असे शब्द वापरले जातात त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये कोणते शब्द येतात व वाक्यात कोणत्या जागेवर येतात ते आपल्याला या प्रकरणात शिकायचं आहे.

● तुम्हाला माहीत आहे इंग्रजीमधे नकारार्थी वाक्यात प्रामुख्याने not हा शब्द वापरला जातो. पण no, never, nothing असे शब्दही नकारार्थी वाक्यात येतात. हे सर्वच शब्द वापरून आपल्याला वाक्ये करायची आहेत. सुरुवात आपण not पासून करू.

● not ची वाक्यातील सर्वसाधारण जागा लक्षात घेण्यासाठी दोन प्रमुख रचनांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. एक रचना विधानार्थी वाक्याची व दुसरी प्रश्नार्थी वाक्याची.

१) नकारार्थी विधानार्थी वाक्याची रचना :-

१) नकारार्थी विधानार्थी वाक्याची रचना :
कर्ता + साहाय्यकारी क्रियापद + not + क्रियापद ….

● या रचनेतून not ची विधानार्थी वाक्यातील जागा लक्षात येते. आणि रचनेत साहाय्यकारी क्रियापदाच्या खाली ‘एकच शब्द’ असं जे लिहिलेलं दिसत आहे त्याचा अर्थ साहाय्यकारी क्रियापदामधे एकापेक्षा जास्त शब्द असले (जसे, will be, will have, could have) तरी
त्या ठिकाणी साहाय्यकारी क्रियापदामधला पहिला एकच शब्द येईल. आणि मग not a not नंतर उरलेला शब्द येईल. म्हणजे वरील रचनेच्या वाक्यात will be वापरायचे असल्यास तुम्ही will not be म्हणाल, will be not नाही.

● टीप :- साहाय्यकारी क्रियापद व not तुम्ही स्वतंत्र शब्दाप्रमाणे वेगवेगळे वापरू शकता किंवा एकत्र करून वापरू शकता. दोन्ही प्रकारे इंग्रजीचे वाक्य बरोबर होईल. कुठल्याही साहाय्यकारी क्रियापदामधे not मिळवताना त्या साहाय्यकारी क्रियापदाला फक्त n’t जोडायचे असते. जसे.
is + not = isn’t, have + not = haven’t, should + not = shouldn’t. फल will, shall, am आणि can अपवाद आहेत.

आणखी एक :- मराठीचे नकारार्थी वाक्य इंग्रजीत करताना कोणते साहाय्यकारी पद येईल ते एखाद्या वेळेस कळत नसल्यास तुम्ही तात्पुरतं ते वाक्य होकारार्थी करून पाहू शकता. त्यावरून वाक्य कोणत्या काळाचे आहे किंवा कोणते साहाय्यकारी क्रियापद येईल ते पटकन् समजू शकते.

● उदाहरणार्थ, तो येणार नाही हे वाक्य होकारार्थी करून पाहिल्यास याचे होकारार्थी तो येईल असे होते, यावरून आपल्याला पटकन् समजतं की वाक्य साध्या भविष्यकाळाचं आहे. आणि साध्या भविष्यकाळात will हे साहाय्यकारी क्रियापद येते. मग तो येणार नाही हे वाक्य इंग्रजीमधे रचनेनुसार आपण पटकन् करू शकतो खालीलप्रमाणे :He will not come.

● उदाहरणे :

१) मी तिथे जाणार नाही. (या वाक्याचं होकारार्थी – मी तिथे जाईन’. म्हणजे वाक्य साध्या भविष्यकाळाचं. म्हणजे साहाय्यकारी क्रियापद will)
I will not go there.
२) मी तिथे गेलो नव्हतो. (होकारार्थी गेलो होतो’ – म्हणजे ‘पूर्ण भूतकाळ’ – म्हणजे had)
I had not go there.
• ३) मी तिथे जाऊ शकत नाही. (होकारार्थी जाऊ शकतो’; ‘शकतो’ म्हणजे can)
I cannot go there.
४) तू तिथे जायला नको. (होकारार्थी ‘जायला पाहिजे’ – म्हणजे should)
You should not go there. • ५) तू तिथे जायला नको होतं. (होकारार्थी जायला पाहिजे होत’ म्हणजे should have येईल. पण आपण आत्ताच वर शिकल्याप्रमाणे should have not येणार नाही – should not have येईल)
You should not have gone there.
६) तो अद्याप आलेला नाही. (होकारार्थी आलेला आहे. म्हणजे पूर्ण वर्तमानकाळ’ म्हणजे have किंवा has + क्रियापदाचे तिसरे रूप, सध्या कर्ता he असल्यामुळे has येईल) He has not come yet.
७) तो तिथे पोहोचलेला नसेल. (होकारार्थी ‘पोहोचलेला असेल’ म्हणजे ‘पूर्ण भविष्यकाळ’ म्हणजे will have + क्रियापदाचे तिसरे रूप)
He will not have reached there.
• ८) त्याला बरं वाटत नव्हतं. (होकारार्थी वाटत होतं’ म्हणजे ‘चालू भूतकाळ’ म्हणजे was / were + क्रियापदाला ing)
He was not feeling well.
• ९) मी तुला विचारत नाही आहे/नाहीये. (होकारार्थी ‘विचारत आहे’. म्हणजे चालू वर्तमानकाळ’. म्हणजे am /is / are + क्रियापदाला ing)
I am not asking you.
१०) तो इथे आला नव्हता. (होकारार्थी आला होता’ – म्हणजे ‘पूर्ण भूतकाळ’ – म्हणजे had + क्रियापदाचे तिसरे रूप)
He had not come here.
११) मी तिथे जाऊ शकणार नाही. (होकारार्थी जाऊ शकेल’ म्हणजे will be able to)
I will not be able to go there. (not च्या जागेकडे लक्ष द्या).
• १२) तो इथे येत नाही. (या वाक्याचे होकारार्थी ‘तो इथे येतो’)

● म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमानकाळाचं झालं. साध्या वर्तमानकाळाच्या प्रश्नार्थी वाक्यात do/does ही साहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात.
सध्या वर्तमानकाळाच्या नकारार्थी वाक्यात सुद्धा हीच साहाय्यकारी क्रियापदे (do, does) वापरली जातात. do, does चा फरकही आपण पाहिलेला आहेच. सध्या कर्ता he असल्यामुळे does येईल.
= He does not come here.
१३) मी तिथे जात नाही. (होकारार्थी मी तिथे जातो’. वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळच’. म्हणून पुन्हा do/does येईल. कर्ता I असल्यामुळे इथे do येईल.)
I do not go there.
१४) तो इथे आला नाही. (या वाक्याचे होकारार्थी ‘तो इथे आला’ असे होईल. म्हणजे वाक्य साध्या भूतकाळाचं झालं. साध्या भूतकाळात did हे साहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. आणि did च्या पुढे क्रियापदाचे पहिले रूप येते.)
He did not come here.

आणखी उदाहरणे:
१) मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही.
I cannot accept this responsibility.
२) ही संधी गमावणे तुम्हाला परवडू शकत नाही.
You cannot afford to miss this chance.
३) मी त्याला ओळखू शकलो नाही.
I could not recognize him.
४) मी उद्या तुझ्याकडे येऊ शकणार नाही.
I will not be able to come to you tomorrow.
५) तू वचन मोडायला नको होतं.
You shouldn’t have broken the promise.
६) त्याला इंग्रजीत बोलता येत नाही.
He cannot speak English.

● मराठीचे वाक्य इंग्रजीत करताना कधी अडचण आल्यास तुम्ही एखाद्या वेळेस असे करू शकता, ते मराठीचं वाक्य मराठीतच दुसऱ्या प्रकारे कसं म्हणता येईल ते पाहू शकता. जसं हेच वरचं वाक्य पहा त्याला इंग्रजीत बोलता येत नाही’. हे वाक्य मराठीतच दुसऱ्या प्रकारे असे म्हणता येईल :- ‘तो इंग्रजीत बोलू शकत नाही.’ आणि ‘शकत नाही चं होकारार्थी ‘शकतो’. आणि ‘शकतो’ म्हणजे can. म्हणून वरच्या सहाव्या वाक्यात can आलं.

७) त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येत नाही.
He cannot pronounce my name correctly.
८) मला माझा पेन कुठे सापडत नाहीये.
I can’t find my pen anywhere.
९) मला चश्म्याशिवाय बरोबर दिसत नाही.
I can’t see well without glasses.
१०) आम्हाला अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं.
We couldn’t see anything because of darkness.
११) तुम्ही लोकांना नेहमीच मूर्ख बनवू शकत नाही.
You can’t fool people all the time

२) नकारार्थी प्रश्नार्थी वाक्याची रचना

२) नकारार्थी प्रश्नार्थी वाक्याची रचना :

रचना A:- साहाय्यकारी क्रियापद + कर्ता + not + क्रियापद…?
● साहाय्यकारी क्रियापद +n’t + कर्ता + क्रियापद…?
(एकच शब्द) रचना B :- प्रश्नार्थी शब्द + साहाय्यकारी क्रियापद + कर्ता + not + क्रियापद…? प्रश्नार्थी शब्द + सा.क्रि.n’t + कर्ता + क्रियापद…..?
(एकच शब्द)

● इथे एकाच रचनेद्वारे प्रश्नार्थी वाक्यातील not ची जागा दाखवणं शक्य होतं. पण तुमच्या सोयीसाठी वर दोन रचना छापलेल्या आहेत. एक साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थी वाक्याची रचना व दुसरी प्रश्नार्थी शब्दापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थी वाक्याची रचना.
वरील A आणि B पैकी कोणती रचना कधी वापरायची ते आता पुन्हा सांगण्याची गरज नाही. कारण प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात साहाय्यकारी क्रियापदाने केव्हा होते आणि प्रश्नार्थी शब्दाने केव्हा ते आपण प्रश्नार्थी वाक्ये या प्रकरणात आधीच शिकलो.

उदाहरणे :

१) तू तिथे गेला नव्हता का?
हे वाक्य इंग्रजीत करताना वरील दोनपैकी रचना A वापरावी लागेल. या वाक्याचे होकारार्थी गेला होता का? असे होईल. यावरून वाक्याचा काळ समजतो. वाक्याचा काळ ‘पूर्ण भूतकाळ’ आहे. पूर्ण भूतकाळात इंग्रजीमधे साहाव्यकारी क्रियापद had आणि क्रियापदाचे तिसरे रूप येते. मग इंग्रजीचे वाक्य पहा :
Had you not gone there?
सा.क्रि.+ कर्ता + not + क्रियापद…?
Hadn’t you gone there?
सा.क्रि.n’t + कर्ता + क्रियापद…?
२) तू तिथे का गेला नव्हता?
हे वाक्य इंग्रजीत करताना वरील दोनपैकी रचना B वापरावी लागेल. वाक्याचा काळ वरचाच आहे. म्हणून साहाय्यकारी क्रियापद व क्रियापदाचे रूप वरचेच येईल.
Why had you not gone there?
प्रश्नार्थी शब्द + सा. क्रि. + कर्ता + not + क्रि…..?
why hadn’t you gone there?
प्रश्नार्थी शब्द + सा.क्रि.n’t + कर्ता + क्रि…..?

३) तुला असं वाटत नाही का?
या वाक्याचे होकारार्थी ‘वाटतं का?’ म्हणजे वाक्याचा काळ ‘साधा वर्तमानकाळ म्हणजे साहाय्यकारी क्रियापद do किंवा does येईल. सध्या वाक्यातील कर्ता you असल्यामुळे do येईल.
Do you not think so? / Don’t you think so?
• ४) तुला असं का वाटत नाही?
Why do you not think so?/Why don’t you think so?
• ५) तो इथे येत नाही का?
या वाक्याचे होकारार्थी येतो का?’ म्हणजे वाक्याचा काळ पुन्हा साधा वर्तमानकाळ म्हणून साहाय्यकारी क्रियापद do किंवा does येईल. इथे कर्ता he असल्यामुळे does येईल.
Does he not come here? / Doesn’t he come here?

६) तो इथे का येत नाही?
Why does he not come here? / Why doesn’t he come here?

७) तू तिथे का जात नाहीस?
Why do you not go there?/Why don’t you go there?

८) आपण हे का करू शकत नाही?
Why can’t we do this?

९) तो अद्याप आलेला नाही का?
Hasn’t he come yet?

१०) तू बॉसकडे तक्रार का केली नाही?
Why didn’t you complain to the boss?

११) या खिडक्या बरोबर का लागत नाहीत?
Why don’t these windows shut properly?

१२) तू एखादा जिम का लावत नाहीस?
Why don’t you join a gym?

१३) तू काल फोन का केला नाही?
Why didn’t you phone yesterday?

१४) तुला बरं वाटत नाहीये का?
Aren’t you feeling well?

१५) तू ही जुनी मासिके फेकून का देत नाहीस?
Why don’t you throw away these old magazines?

१६) त्याला बरं वाटत नव्हतं का?
Wasn’t he feeling well?

१७) तुला हे आवडत नाही का?
Don’t you like this?

१८) तुला हे आवडलं नाही का?
Didn’t you like this?

● मराठीच्या नकारार्थी वाक्यात जेव्हा क्रियापदासोबत ‘न’ हा शब्द येतो तेव्हा इंग्रजीच्या वाक्यात सुद्धा not हा शब्द खालीलप्रमाणे क्रियापदासोबतच येतो.
उदाहरणे :
१) मी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला.
I advised him not to go there.
२) मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेन.
I will try not to make this mistake again.
(‘करणे’ साठी शब्द do सुद्धा आहे. पण mistake सोबत करणे’ साठी make वापरतात.)
३) मी त्याला इथे न यायला सांगितलं.
I told him not to come here

● मराठीत हेच वाक्य आपण ‘मी त्याला इथे येऊ नको असं सांगितलं’ असेही म्हणू शकतो. अर्थ सारखाच असल्यामुळे हे वाक्यही इंग्रजीमधे असे म्हणता येईल.

४) मी त्याला धूम्रपान न करण्याचा सल्ला दिला.
I advised him not to smoke.
५) कोणालाही पैसे उसने न देण्याचं मी ठरवलं आहे.
I have decided not to lend money to anyone.
६) अतिशयोक्तीन करायला (= अतिशयोक्ती करू नको म्हणून) मी तुला हजारदा सांगितलंय.
I have told you a thousand times not to exaggerate.
७) त्याला आमंत्रण न देण्याची माझी योजना नव्हती. फक्त माझ्या लक्षात राहिलं नाही,
It wasn’t my intention not to invite him – I just did not remember.
८) त्याने मला त्याच्या पुस्तकांना हात न लावायला सांगितलं.
He told me not to touch his books.
९) तिथे पुन्हा कधीच न जाण्याची त्याने शपथ घेतली.
He took an oath never to go there again.
१०) एकच चूक पुन्हा पुन्हा न करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
I am trying not to make the same mistake again and again.

नकारार्थी वाक्ये – Negative Sentences Examples | English Grammar

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा