Adjectives in Marathi – विशेषण | English Grammar

Adjectives in Marathi – English Grammar notes in Marathi

१) साधारणपणे विशेषण नामापूर्वी वापरले जाते. जसे,
This car, my house, some books, either method, a brave man, a good book, the main point, an unhappy woman.

२) पण बरीच गुणविशेषणे ( गुणदर्शक विशेषणे) be, become, seem, appear, वगैरे सारख्या क्रियापदानंतर सुद्धा वापरली जाऊ शकतात. जसे, He became rich. He looked unhappy. You seem happy.

३) विशेषण नामाआधी वापरले किंवा क्रियापदानंतर वापरले तरी विशेषणाचा अर्थ साधारणपणे सारखाच असतो. जसे,
नामापूर्वी वापर :- He is a rich man. (rich = श्रीमंत)
क्रियापदानंतर वापर :- He became rich. (rich = श्रीमंत)

४) पण एखाद्या वेळेस विशेषणाची जागा बदलली तर विशेषणाचा अर्थ बदलू शकतो. जसे,
He is my old friend (old = जुना).
My friend is old (old = वृद्ध).
He is a small farmer (small = छोटा).
The farmer is small (small = शारीरिकदृष्ट्या लहान).

५) काही विशेषणे फक्त क्रियापदानंतर येतात (म्हणजे नामाआधी येत नाहीत). अशी काही विशेषणे:-upset (अस्वस्थ, चितित),alive (जिवंत), alone (एक्य),asleep (झोपलेला), ashamed (खजील), afraid (भ्यालेला, भीती वाटत असलेला), afloat
(तरंगत असलेला), alike (सारखा), awake (जागा असलेला), sorry (दीलगीर).

उदा. Guests are asleep. पाहुणे झोपलेले आहेत.
The man was alone. तो माणूस एकटा होता.
You are still alive. तू अद्याप जिवंत आहेस.

६) काही विशेषणे फक्त नामाआधीच येतात.
जसे, chief (प्रमुख), main (प्रमुख), principal (प्रमुख), utter (पूर्ण, पक्का), former (माजी), annual (वार्षिक),
initial (प्रारंभिक).
• उदा:- chief / principal characteristic, annual income, utter fool, former employer, initial information.

● क्रियापदाला -ing आणि -ed लावून तयार होणारा शब्द विशेषणाचे कार्य करू शकतो. खालील शब्दांच्या आधारे हा फरक स्पष्ट होईल :
१) confusing = गोंधळ उत्पन्न करणारा
confused = गोंधळलेला
२) annoying = चीड आणणारा
annoyed = चिडलेला
३) disappointing निराशाजनक
disappointed = निराश
४) amazing = आश्चर्यकारक
amazed = आश्चर्यचकित
५) boring = कंटाळवाणा
bored = कंटाळलेला
६) discouraging =हिम्मत खचविणारा
discouraged = हिम्मत खचलेला
७) encouraging = प्रेरणा देणारा
encouraged = प्रेरित
८) exhausting = पूर्ण दमवून टाकणारे
exhausted = पूर्ण दमलेला
९) frightening = भीतीदायक
frightened = भयभीत

● वरील उदाहरणांवरून -ing चा सर्वसाधारण अर्थ उत्पन्न करणारा/आणणारा व ed चा सर्वसाधारण अर्थ-लेला असा निघतो हे लक्षात येते.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा