भारतातील प्रमुख पिके माहिती : Bhartatil Pramukh Pike

भारतातील प्रमुख पिके माहिती : Bhartatil Pramukh Pike


भारतातील प्रमुख पिके माहिती : Bhartatil Pramukh Pike : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण देशातील सुमारे ६०.४% लोक या व्यवसायात गुंतलेले असून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी व अनुषंगिक क्षेत्राचा वाटा १७% आहे.

• निर्यातीत कृषीक्षेत्राचा वाटा : १३.५%

• देशात १९७० च्या दशकात (१९६५-७०) नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रयत्नांमुळे हरितक्रांती घडून आली.

१) तांदूळ (भात) : भारतातील प्रमुख खाद्य असल्याने देशातील एकूण पीकक्षेत्रापैकी भाताखाली सर्वाधिक क्षेत्र आहे.

  • हवामान : उष्ण व दमट, पाऊस : १५० ते २०० सें.मी. • देशात एकूण पिकाखालील जमिनीपैकी २२% क्षेत्र तांदळाखाली.
  • तांदुळ क्षेत्रानुसार राज्यांचा क्रम : १) उत्तर प्रदेश, २) प. बंगाल, ३) ओडिशा, ४) छत्तीसगढ, ५) आंध्र-तेलंगणा
  • तांदूळ उत्पादक राज्ये : १) प. बंगाल प्रथम (१५.८० टक्के), २) उत्तर प्रदेश, ३) पंजाब, ४) आंध्र प्रदेश, ५) ओडिशा ६) तामिळनाडू
  • दर हेक्टरी तांदूळ उत्पादन : देशात पंजाब प्रथम. • भारत दर हेक्टरी तांदूळ उत्पादन : ३७२१ किलो

२) गहू : लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनाचा विचार करता गहू हे तांदळानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पीक.थंड हवामान, रब्बी पिक, पाऊस : ५० ते ७५ सें.मी.

गव्हाखालील क्षेत्र : १) उत्तर प्रदेश (३१.९२%), २) मध्य प्रदेश (१८.५७%) ३) पंजाब (११.२७%), ४) राजस्थान (९.०१%)५) हरियाणा (८.०१%) • क्षेत्र व उत्पादनात उत्तर प्रदेश प्रथम

गहू उत्पादन : १) उत्तर प्रदेश (३३.६६%), २) पंजाब (१७.७६%), ३) मध्य प्रदेश (१४.५२%) ४) हरियाणा (१२.३०%) ५) राजस्थान (९.३०%):

  • दर हेक्टरी गहू उत्पादन राज्यांचा क्रम : १) पंजाब, २) हरियाणा, ३) राजस्थान, ४) उत्तर प्रदेश, ५) गुजरात
  • देशाच्या एकूण पिकक्षेत्रापैकी १५.६% क्षेत्र गव्हाखाली. • भारत दर हेक्टरी गहू उत्पादन : ३१७७ किलो
  • जागतिक गहू उत्पादनात देशांचा क्रम : १) चीन (प्रथम), २) भारत, ३) रशिया, ४) UK, ५) ऑस्ट्रेलिया

३) ज्वारी : खरीप व रब्बी पीक • एकूण पीकक्षेत्रापैकी : ११% क्षेत्रावर ज्वारी (६५% खरीप, ३५% रब्बी) ५० सें.मी. पाऊस, रेगूर मृदेत विशेष उत्पादन. भारत ज्वारी क्षेत्राबाबत जगात प्रथम व उत्पादनात दुसरा आहे.उत्पादन : देशात ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात : महाराष्ट्र प्रथम (क्षेत्र : ४०%, उत्पादन : ५७%) यानंतर कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश यांचा क्रम लागतो.

४) तेलबिया पिके : (भुईमूग, तीळ, करडई, जवस, मोहरी, सूर्यफुल, सोयाबीन) तेलबियांच्या उत्पादनात गुजरात प्रथम, त्यानंतर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. भुईमूग हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे.

५) ऊस : उसाचे मूलस्थान भारत असून देशातील एकूण पीक क्षेत्रापैकी २% क्षेत्र ऊसाखाली आहे .
हवामान : १५° सेंग्रे ते ४० सेंग्रे, पाऊस : १०० ते १५० सें.मी., सुपीक काळी मृदा.
ऊसाच्या क्षेत्र व उत्पादनात उत्तर प्रदेश प्रथम, महाराष्ट्र दुसरा. • दर हेक्टरी ऊस उत्पादन : तामिळनाडू प्रथम.

६) मसाल्याची पिके: (मिरची, वेलदोडे, हळद, मिरी, आले, लवंग इत्यादी) मसाल्यांच्या पिकासाठी हवामान उष्ण व दमट लागते .उत्पादनामध्ये : केरळ (प्रथम), त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र यांचा क्रम लागतो.निकोबारमध्ये नारळ, सुपारी ही नगदी पिके; मिरे, लवंग, जायफळ ही मसाला पिके घेतली जातात. तसेच सिक्कीम, दार्जिलिंग परिसरातील टेकड्यांवर वेलचीचे पीक घेतले जाते. वेलची या पिकास ‘मसाल्याच्या पदार्थांची राणी’ म्हटले जाते. वेलची या पिकास नंदनवनातील धान्य’ (Grains of Paradise) म्हटले जाते.

७) कापूस: कापसाचे मूल स्थान भारत असून लागवडी खालील क्षेत्राचा विचार करता भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे .उत्पादन : जागतिक उत्पादनाच्या ८.५% उत्पादन भारतात. (कापूस उत्पादनात देशात गुजरात प्रथम) सुती कापड उद्योग हा भारताचा सर्वांत प्राचीन उद्योग आहे. कापसास पांढरे सोने म्हणतात.कापसासाठी उत्पादनासाठी काळी व खोल रेगूर मृदा (Black Cotton Soil) पोषक असते. कापसाच्या प्रमुख जाती बुरी, लक्ष्मी, वरलक्ष्मी, देवराज, कंबोडिया आहेत.तसेच भारतातील कापसाच्या पारंपरिक जाती : गॉसिपियम अर्बोरियम व गॉसिपियम हर्बोसियम.अमेरिका, इजिप्त, वेस्ट इंडिज या देशांमधून गॉसिपियम हिरसुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या वर्गातील जातींचा भारतातील स्थानिक जातींशी संकर करण्याचे प्रयोग सुरू झाले.

महाराष्ट्रातील कापसाचे पारंपरिक वाण : लक्ष्मी, कल्याण, वागड; कर्नाटक : जयधर; तामिळनाडू : १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात देशात संकरित कापसावरील संशोधन सुरू झाले.उत्पादन : देशातील एकूण कापूस उत्पादक क्षेत्रापैकी ३३ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात.गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही कापूस उत्पादन कापूस क्षेत्र : १) महाराष्ट्र २) गुजरात ३) आंध्र प्रदेश ४) हरियाणा
कापूस उत्पादन : १) गुजरात २) महाराष्ट्र ३) आंध्र प्रदेश-तेलंगणा ४) हरियाणा
भारताचा कापसाखालील क्षेत्राबाबत जगात प्रथम क्रमांक, तर कापूस उत्पादनाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो.

८) ताग: हे प्रमुख तंतू पीक आहे.हे पीक जास्त पावसाच्या प्रदेशात घेतले जाते.त्यासाठी हवामान : २०° सें. पेक्षा अधिक तापमान, २०० सें.मी. पाऊस आवश्यक असतो. तागाचा उपयोग गोणपाट, गालिचे, दोरखंडे बनविण्यासाठी केला जातों .तागास ‘Golden Fibre’ म्हणतात.याचे उत्पादन गंगेच्या त्रिभूज प्रदेशात प. बंगाल या राज्यात सर्वाधिक घेतले जाते.याशिवाय ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथेही हे पीक घेतले जाते.

९) चहा: चहा उत्पादनात देशांचा क्रम : १) चीन (३६%), २) भारत (२२.५%), ३) केनिया (८%), ४) श्रीलंका भारतात चहा उत्पादन प्रामुख्याने आसाम, प. बंगाल, केरळ, तामिळनाडू या राज्यांत होते.आसाममधील ब्रह्मपुत्रा खोऱ्यात देशाच्या एकूण चहा उत्पादनापैकी ५५% उत्पादन होते. चहाची लागवड डोंगर उतारावर करतात.
‘हिरवे सोने’ म्हणून गणल्या जाणाऱ्या चहाच्या उत्पादनात भारत जगात अग्रेसर असून आसाममध्ये सर्वाधिक चहा पिकतो.आसाम चहा उत्पादनात भारतात आघाडीवर असून येथील उच्चप्रतीची चहापूड युरोप, अमेरिकेत निर्यात होते.दार्जिलिंग (प. बंगाल) या शहरात डोंगर उतारांवर उत्तम प्रतिचा चहा पिकतो.तामिळनाडूतील उदगमंडलम व केरळमधील मुन्नार येथे चहाचे मळे आहेत.

वैशिष्ट्ये:चहा पिकासाठी : चहा पिकासाठी हवामान उष्ण व दमट लागते.तसेच १५० सें.मी. पेक्षा जास्त पाऊस लागतो. दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, निलगिरी येथे चहाचे उत्पादन होते. ईशान्येकडे : आसाममधील ब्रह्मपुत्रा खोरे, सुरमा नदी खोरे पश्चिम बंगालमध्ये : दार्जिलिंग व जलपैगुडी
पंजाबमधील : होशियारपूर, हिमाचल प्रदेशात : कांगडा खोरे या प्रदेशात चहा उत्पादन होते.चहा निर्यातीत भारताचा वाटा १५% आहे. भारताची सर्वाधिक चहा निर्यात ब्रिटन या देशाला होते.

१०) कॉफी: कॉफीचे क्षेत्र भारतात कर्नाटक (७०%), केरळ (२०%) व तामिळनाडू (६%) या राज्यांत आहे.कॉफीसाठी आवश्यक हवामान उष्ण व आर्द्र हवा, १५ ते २८ सें. तापमान, १५० ते २०० सें.मी. पाऊस डोंगरउतारावरील लोहयुक्त, तांबडी, सेंद्रीय मृदा कॉफीसाठी पोषक असते. कर्नाटकातील चिकमंगळूर हे शहर ‘Land of Coffee’ म्हणून ओळखले जाते. कर्नाटकातील बाबा बुदान टेकड्यांवर कॉफीचे मळे आहेत.कर्नाटकात ‘अरेबिका’ व रोबस्टा’ या कॉफीचे उत्पादन अधिक होते.
कॉफी उत्पादनात भारटाचा जगात सातवा नंबर लागतो. तर आशियामध्ये व्हिएतनाम व इंडोनेशिया यांच्यानंतर तिसरा क्रमांक.

११) रबर: केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व त्रिपुरा या राज्यात प्रामुख्याने रबर हे पीक घेतले जाते.रबराचे वनस्पतीशास्त्रीय नाव हेविया ब्राझिलियान्सिस आहे.देशातील रबर लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ९२% क्षेत्र एकट्या केरळ राज्यात आहे.रबर टिकाऊ बनविण्यासाठी ‘व्हल्कनायझेशन’ ही प्रक्रिया केली जाते.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा