सांकेतिक लिपी माहिती : Code Language Information

सांकेतिक लिपी माहिती : Code Language Information

सांकेतिक लिपी : सांकेतिक लिपी विशिष्ट तत्त्वावर आधारित असते. त्यामुळे तिची उकल करताना त्यांतील शब्दांचा उलट-सुलट क्रम,शब्दांच्या किंवा अक्षरांच्या ऐवजी वापरलेले अंक किंवा चिन्हे या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. या घटकातील प्रश्नप्रकारांवरून सांकेतिक लिपीची फोड कशी प्रकारे करतात, हे आज आपण समजून घेणार आहोत.

सांकेतिक लिपी माहिती : Code Language Information

प्रश्न 1 : एका सांकेतिक लिपीत ‘किमयागार’ हा शब्द ‘मियगाराक’ असा लिहिला आहे, तर ‘काळवीट’ हा शब्द कसा लिहाल ?
(1) कळावटी
(2) टाकळीव
(3) ळाकवीट
(4) ळावटीक
स्पष्टीकरण : या सांकेतिक लिपीत पहिले अक्षर शेवटी लिहून दुसरे अक्षर पहिले व त्यानंतरची क्रमाने लिहिली आहेत. मात्र, मूळ अक्षरातील काना, मात्रा, वेलांटी तशाच ठेवल्या आहेत. त्यामुळे ‘क’ ची वेलांटी ‘म’ ला लावली. ‘य’ चा काना ‘ग’ ला व ‘ग’ चा काना ‘र’ ला लावला आहे. या सूत्रानुसार काळवीट या शब्दामध्येही ‘क’ चा काना ‘ळ’ ला आणि ‘व’ ची वेलांटी ‘ट’ ला लावली. त्यानुसार ‘काळवीट’ हा शब्द ‘ळावटीक’ असा लिहिला जाईल.
पर्याय क्र. (4) हे उत्तर

प्रश्न २ : एका सांकेतिक लिपीत ‘नारायण’ हा शब्द ‘णायारन’ असा लिहितात, तर ‘जीवनदाता’ हा शब्द कसा लिहाल?
(1) तीदनवाजा
(2) दीनवजाता
(3) तादानवजी
(4) तीदानवाज
स्पष्टीकरण : शब्द सांकेतिक रूपात लिहिताना अक्षरांचा क्रम उलट केला आहे. मात्र, काना, मात्रा, वेलांटी त्याच क्रमाने ठेवल्या आहेत;
त्यामुळे ‘तदनवज’ असा क्रम व ‘तीदनवाजा’ हे उत्तर.
पर्याय क्र. (1) हे उत्तर

प्रश्न ३ : संकेतानुसार ‘भागीरथी’ हा शब्द ‘बाखीयती’ असा लिहितात, तर ‘वाचनालय’ हा शब्द कसा लिहाल?
(1) लाछदारय
(2) शाछपावर
(3) लाधारम
(4) लाजधारम
स्पष्टीकरण : ही सांकेतिक लिपी ओळखण्यासाठी मराठी अक्षरमालेचा क्रम लक्षात असणे आवश्यक आहे. येथे मूळ शब्दातील प्रत्येक अक्षराच्या जागी अक्षरमालेतील त्या अक्षराच्या पूर्वीचे अक्षर लिहिले आहे. त्यानुसार ‘व’ च्या आधीचे अक्षर ‘ल’ तसेच ‘च’ च्या आधीचे अक्षर ‘ङ’ या पद्धतीने अक्षरे घेतली आहेत. काना-मात्रा-वेलांट्या मात्र मूळ शब्दाच्या क्रमानेच दिल्या आहेत.
पर्याय क्र. (3) हे उत्तर

प्रश्न ४ : एका सांकेतिक लिपीत ‘कापूस’ हा शब्द ‘खाफूह’ असा लिहितात, तर ‘चंदन’ हा शब्द कसा लिहाल?
(1)जधप
(2) छंधप
(3)जनध
(4) थध
स्पष्टीकरण : या लिपीत मूळ शब्दातील अक्षरांऐवजी अक्षरमालेतील त्यानंतर येणारी अक्षरे लिहिली आहेत. त्यानुसार ‘च’ च्या जागी ‘छ’; ‘द’ च्या जागी ‘ध’ आणि ‘न’ च्या ऐवजी ‘प’ अशी अक्षरे घेऊन ‘छंधप’ असा शब्द तयार होतो.
पर्याय क्र. (2) हे उत्तर

प्रश्न ५ : ‘सरबत’ हा शब्द ‘संटरंटबंटत’ असा लिहिला, तर ‘शेतकरी’ हा शब्द कसा लिहाल?
(1) शेटतटकटरी
(2) शेटतंटकटरींट
(3) शेटंतटंकटरी
(4) शेंटतंटकंटरी
स्पष्टीकरण : या सांकेतिक लिपीत दिलेल्या शब्दातील प्रत्येक अक्षरावर अनुस्वार देऊन प्रत्येक अक्षरानंतर ‘ट’ हे अक्षर लिहिले आहे. मात्र,
शेवटच्या अक्षरानंतर ‘ट’ हे अक्षर लिहिलेले नाही व शेवटच्या अक्षरावर अनुस्वार दिलेला नाही.
पर्याय क्र. (4) हे उत्तर

प्रश्न ६ : एका सांकेतिक लिपीत गंमत-गाव’ हा शब्द ‘चमतर्ग-चवगा’ असा लिहितात, तर त्या भाषेत ‘आनंद-भुवन’ हा शब्द कसा लिहाल?
(1) चंदनआ-चवनभु
(2) चनंदआ-चवनभु
(3) चानंदअ-चनवभु
(4) चानंदअ-चवनभु
स्पष्टीकरण : ही सांकेतिक लिपी ओळखताना आपण लहानपणी बोलण्यात ‘च’ ची भाषा वापरत होतो, ती आठवली असेल. या भाषेत पहिल्या अक्षराच्या जागी ‘च’ घालून उरलेली अक्षरे त्याच क्रमाने लिहावयाची व पहिले अक्षर शेवटी लिहावयाचे, असा नियम आहे. त्यानुसार ‘आनंद’ हा शब्द ‘चनंदआ’ असा तर ‘भुवन’ हा शब्द ‘चवनभु’ असा लिहिला जाईल.
पर्याय क्र. (2) हे उत्तर

प्रश्न ७ : एका सांकेतिक लिपीत ‘राजस्थान’ हा शब्द ‘नारजास्थ’ असा लिहितात, तर ‘गावदेवी’ हा शब्द कसा लिहाल ?
(1) वागवेदी
(2) वीगावदे
(3) वागदेवी
(4) वागवीदे
स्पष्टीकरण :
या सांकेतिक लिपीत अक्षरांचा 1 2 3 4 हा क्रम 412 3 असा केला आहे. परंतु काना, मात्रा, वेलांट्या पूर्वीच्याच क्रमाने ठेवल्या आहेत. त्यानुसार ‘गावदेवी’ हा शब्द 4 1 2 3 असा अक्षरांचा क्रम घेऊन व काना, मात्रा, वेलांट्या मात्र तशाच ठेवून ‘वागवेदी’ असा लिहिला जाईल.
पर्याय क्र. (1) हे उत्तर

प्रश्न ८ : एका सांकेतिक लिपीत ‘कमल’ हा शब्द KML असा लिहितात, तर ‘मदन’ हा शब्द कसा लिहाल?
(1) MGN
(2) MDN
(3) NDM
(4) MCN
स्पष्टीकरण : या लिपीत मराठी मूळाक्षरांच्या उच्चारांची इंग्रजी वर्णाक्षरे घेतली आहेत.
पर्याय क्र. (2) हे उत्तर

प्रश्न 9: एका सांकेतिक लिपीत ‘HELP’ हा शब्द ‘FCIN’ असा लिहितात, तर ‘LAMP’ हा शब्द कसा लिहाल?
(1) JYKN
(2) KZKO
(3) JXKO
(4) JZKO
स्पष्टीकरण : या लिपीत मूळ अक्षरांच्या जागी वर्णमालेतील त्यांच्या दोन क्रमांक आधीची अक्षरे लिहिली आहेत. त्यानुसार प्रत्येक अक्षरासाठी वर्णमालेत त्या अक्षराच्या दोन क्रमांक अगोदर येणारी अक्षरे घेऊन ‘LAMP’ हा शब्द ‘JYKN’ असा लिहिला जाईल, या ठिकाणी ‘A’ च्या दोन क्रमांकाच्या अगोदरचे अक्षर ‘Y’ येते, हे लक्षात घ्यावे.
पर्याय क्र. (1) हे उत्तर

प्रश्न १0 : COME=KIVP; STAND = GLFBY तर NAME= ?
(1) BVFP
(2) FBVP
(3) BFVP
(4) BPVF
स्पष्टीकरण : दिलेल्या शब्दांच्या संकेतावरून विशिष्ट वर्णाक्षरांसाठी कोणते अक्षर वापरले आहे, हे जाणून त्यानुसार ‘NAME’ ची प्रतिअक्षरे
योग्य क्रमाने लिहिली आहेत.पर्याय क्र. (3) हे उत्तर

प्रश्न ११ : एका सांकेतिक लिपीत STAND’ हा शब्द ‘FGNAQ’ असा लिहितात, तर त्याच पद्धतीने ‘TROLY’ हा शब्द कसा लिहाल?
(1) GSBYL
(२) GEBYL
(3) GBEYL
(४) GEBLY
स्पष्टीकरण : वर्णमालेतील 26 अक्षरे 13 च्या गटाने लिहून मूळ शब्दातील वर्णाक्षरांऐवजी त्या वर्णाक्षरांची ज्या वर्णाक्षरांशी जोडी जमली आहे ती वर्णाक्षरे घेऊन सांकेतिक लिपीतील शब्द लिहिले आहेत, हे विश्लेषणाने लक्षात येते. या तत्त्वानुसार ‘T’ ची जोडी ‘G’, ‘R’ ची ‘E’, ‘O’ ची ‘B’, ‘L’ ची ‘Y’, ‘Y’ ची ‘L’ हे लक्षात घेऊन ‘TROLY’ हा शब्द ‘GERYL असा लिहिला जाईल.
पर्याय क्र. (2) हे उत्तर

आपण वरती वाचली आहे सांकेतिक लिपी (Code Language Information) बद्दल माहिती:

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा