Collector Office Jalgaon : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे ६३ पदांची भरती

जळगाव, २८ सप्टेंबर २०२३: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६३ पदे भरली जाणार आहेत.

(१) लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी, जळगाव, (२) सक्षमप्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव (३) सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीयअधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ (४) सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर (५) सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा आणि (६) सक्षमप्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांचे कार्यालयातीलपुढील पदांवरमासिक मानधन तत्वावर कामकाज करण्याकामी केवळ तात्पुरत्या स्वरुपात ६ महिन्यांचे (प्रथम ३ महिनेव आवश्यकता असल्यास त्यापुढे ३ महिने) कालावधीसाठी पुढील अटी व शर्ती बंधनकारक ठेवून पात्रसेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे.

यासाठी दि. २९/०९/२०२३ रोजी सकाळी ९.४५ ते दि. १३/१०/२०२३ रोजी सायंकाळी ०६.१५(शासकीय सुटीचे दिवस वगळून) या कालावधीत इच्छुक व पात्र सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व उमेदवारांकडून समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

Jalgaon Collector Office Recruitment

पदाचे नाव : सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक/ Computer Operator, शिपाई.

एकूण जागा :

अ.क्र.पदनामआवश्यक संख्याप्रतिमाह मानधन
सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार०८रु.४०,०००/-
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक१५रु.२५,०००/-
संगणक चालक (Computer Operator)३०रु.१६,०००/-
शिपाई१०रु.१२,०००/-

वयोमर्यादा / Age Limit: १८ ते ६८

शैक्षणिक पात्रता :

पदनामशैक्षणिक अर्हता व अनुभव
सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदारसदर पदावर कमीत कमी ३ वर्ष काम केल्याचा अनुभव असणे | आवश्यक. मराठी व इंग्रजी लिहिता / वाचता येणे आवश्यक. संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण अगर सूट मिळालेली असणे आवश्यक
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखकसदर पदावर कमीत कमी ५ वर्ष काम केल्याचा अनुभव असणे | आवश्यक. मराठी व इंग्रजी लिहिता वाचता येणे आवश्यक. संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण अगर सूट मिळालेली असणे आवश्यक संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक. (टंकलेखन अट मंडळ अधिकारी पदाला लागू नाही)
संगणक चालक (Computer Operator)कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीणे असणे आवश्यक. संगणक अर्हता म्हणून MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण असलेबाबत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक,
मराठी व इंग्रजी लिहिता वाचता येणे आवश्यक. संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक
शिपाईउच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (HSC/ १२वी) उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी व इंग्रजी लिहिता वाचता येणे आवश्यक

अर्ज करण्याची कालावधी – 29-09-2023 ते 13-10-2023′

जाहिरात व अर्ज डाउनलोड करा (District Collector Office Recruitment Jalgaon) : येथे क्लिक करा

नवीन भरती उपडेट येथे बघा …

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा