Polytechnic Admission 2024 : दहावी नंतर डिप्लोमा प्रवेशाला सुरुवात, असा करा अर्ज

First Year Diploma Admission 2024 : तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवार २९ मे २०२४ पासून डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ जून २०२४ आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील ३९० पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवार, २९ मे २०२४ पासून विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. एकूण १ लाख ५ हजार जागांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै २०२४ रोजी जाहीर केली जाईल. प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात राबवली जाईल.

ज्यांना डिप्लोमा इन इंजिनियरिंग ला ऍडमिशन घायचे आहे त्यांनी वेळेत आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या, डिप्लोमा ऍडमिशन साठी लागणारी पात्रता, कागदपत्रे व वेळापत्रक खालीलप्रमाणे.

Polytechnic Admission Eligibility:

नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून SSC (दहावी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • 2024 मध्ये SSC परीक्षा देणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

Diploma Admission Documents List:

  • जात प्रमाणपत्र / Caste Certificate
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (३१ मार्च २०२५ पर्यंत वैध).*
  • राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र /Domicile Certificate
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र / EWS Certificate
  • दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार /PWD Certificate
  • अल्पसंख्यांकासाठी प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र
  • आधार क्रमांक व संलग्न बँक खाते
  • उत्पन्नाचा दाखला*

How To Apply/ अर्ज कसा करायचा :

  • डीटीई महाराष्ट्राची अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://poly24.dtemaharashtra.gov.in/diploma24/
  • “प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश २०२४” या लिंकवर क्लिक करा.
  • “नवीन नोंदणी” बटणावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि नोंदणी पूर्ण करा.
  • लॉगिन नाव आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉगिन करा.
  • अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि अंतिम पुष्टीकरण घ्या.

अर्ज करण्यापूर्वी इन्फॉर्मेशन ब्राऊचेर पूर्णपणे वाचून घ्या, अधिक माहिती साठी जवळच्या FC सेंटर ला भेट द्या….

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा