Forms of Verb | क्रियापदाची रूपे

● Forms of Verb | क्रियापदाची रूपे – English Grammar

Forms of Verb : इंग्रजीच्या वाक्यात तुम्हाला काळानुसार, गरजेनुसार क्रियापदाचे योग्य रूप वापरावे लागते. कोणत्या परिस्थितीत क्रियापदाचे कोणते रूप वापरतात ते माहीत असणं जितकं आवश्यक आहे तेवढंच क्रियापदाची रूपे बनवता येणं आवश्यक आहे. सर्वच प्रचलित क्रियापदांची रूपे माहीत असायला दुसरा पर्याय नाही. म्हणून पुढची माहिती तुम्हाला व्यवस्थित माहिती असली पाहिजे .

जवळपास कुठल्याही क्रियापदाची चार रूपे असतात. पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप, आणि चौथे रूप (चौथे रूप म्हणजे -ing रूप).

● क्रियापदाचे चौथे रूप बनवणे सर्वात सोपे आहे. -ing लावायचं आणि झालं चौथं रूप. जसे, go – going, read – reading. फक्त इतकंच की ing लावताना कधी स्पेलिंगमधे थोडा बदल होतो. जसे, क्रियापदाच्या शेवटी e असल्यास e काढून ing लावतात.
● उदा. come + ing = coming, write + ing = writing.

● अशाच प्रकारे क्रियापदामधे शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास त्या क्रियापदाला ing लावताना शेवटचे अक्षर दोनदा लिहितात. जसे, stop +ing = stopping, sit + ing sitting, run + ing = running. क्रियापदाच्या शेवटी -ie असल्यास ie चे y होते. जसे, lie + ing = lying, die +ing = dying.

आणखी एक लक्षात घ्या :क्रियापदाच्या शेवटी -y असल्यास ing लावताना y काढले जात नाही. फक्त ingलावतात. जसे, try + ing = trying. study. – ing = studying, worry + ing:worrying.

आता आपण क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून दुसरे व तिसरे रूप कसे बनवले जाते ते पाहू.

१) क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून दुसरे व तिसरे रूप बनवताना -ed हे प्रत्यय लावतात.
मग दुसरे व तिसरे रूप बनवणे काही कठीण नाही. पहा:start-started-started
wash-washed – washed
finish – finished – finished rain – rained – rained

● २) क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटी -e असल्यास दुसरे व तिसरे रूप करताना फक्त
-d लावतात. जसे,
like -liked – liked
change – changed – changed
tire – tired – tired
love – loved – loved

३) क्रियापदाच्या शेवटी -y असल्यास -y चे i करून ed लावतात. जसे,
try- tried – tried
cry – cried – cried
study – studied – studied carry – carried – carried
पण – पूर्वी स्वर (म्हणजे a, e,i,o, u) असल्यास सरळ ed लावतात. जसे,
play – played – played
obey – obeyed – obeyed

४) क्रियापदाच्या पहिल्या रूपात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर (लक्ष द्या – एक स्वर)
असल्यास दुसरे व तिसरे रूप करताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करून -ed लावतात. जसे,
stop – stopped – stopped rob-robbed-robbed
पण cook – cooked – cooked

हे तर झालं पहिल्या रूपापासून दुसरं आणि तिसरं रूप कसं बनवायचं. पण हे ‘पहिलं रूप’ म्हणजे काय?

क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. जसं तुम्हाला आवडणे’ साठी इंग्रजी शब्द कोणी विचारला तर तुम्ही like म्हणाल, liked किंवा liking म्हणणार नाही. असंच लिहिणे’ साठी इंग्रजी शब्द तुम्ही write म्हणाल – wrote, written किंवा writing म्हणणार नाही. like आणि write ही पहिली रूपे आहेत. तर तुम्हाला कळलं – क्रिया
दर्शवणारा मूळ शब्द म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप.
वर जे आपण पाहिले ते झाले नियम – आता काही अपवाद :इंग्रजीमधे जवळपास क्रियापदांची दुसरी आणि तिसरी रूपे नियमानुसारच बनतात.
ज्या क्रियापदांची दुसरी आणि तिसरी रूपे नियमानुसार होत नाहीत अशा क्रियापदांची यादी
खाली दिलेली आहे.

टीप :- पुढे क्रियापदाच्या फक्त पहिल्या रूपाचेच मराठी अर्थ दिलेले असल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाचा शब्दश: अर्थ कसा होतो ते काही उदाहरणांवरून पाहून घ्या :पहिले रूप
दुसरे रूप,तिसरे रूप अनुक्रमे दिलेली आहेत.
1) write – लिहिणे
wrote – लिहिले
written – लिहिलेले

2) teach – शिकवणे
taught – शिकवले
taught – शिकवलेले

3) forget – विसरणे
forgot – विसरला
forgotten – विसरलेला

4)go – जाणे
went – गेला
gone – गेलेला

5) change – बदलणे
changed – बदलले
changed – बदललेले

Forms of Verb | क्रियापदाची रूपे – English Grammar

1 thought on “Forms of Verb | क्रियापदाची रूपे”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा