Free Tablet Yojna Maharashtra 2023 : 10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व इंटरनेट

Free Tablet Yojna Maharashtra 2023 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत दहावी पास व अकरावी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या मागासवर्गीय, भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास विद्यार्थ्यांना सण २०२४ – २०२५ होणाऱ्या MH-CET/JEE/NEET या परीक्षांच्या पूर्व तयारी साठी मोफत टॅबलेट , 6 GB/ Day इंटरनेट व पुस्तके देण्यात येणार आहे .

Mahajyoti Free Tablet Yojna 2023 :

या योजनेच्या लाभासाठी पात्रता – Eligibility Criteria

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) किंवा विशेष मागास प्रवर्ग (SBC) यापैकी असावा/असावी.
  3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
  4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्याथ्र्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
  5. विद्याथ्यी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – Required Documents

  1. 9 वी ची गुणपत्रिका
  2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
  3. आधार कार्ड
  4. रहिवासी दाखला
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

अर्ज कसा करावाHow To Register

  1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for CET/JEE/NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
  2. अर्जासोबत वर नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कंन करुन अपलोड करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२३

1 thought on “Free Tablet Yojna Maharashtra 2023 : 10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व इंटरनेट”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा