WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post Office Bharti : भारतीय डाक विभागात 1899 पदांसाठी भरती

Post Office GDS Bharti 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये 30 हजार पदांसाठी मेगा भरती

भारतीय डाक विभागात क्रीडा (Sports) कोट्याअंतर्गत उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमॅन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी एकूण 1899 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक असलेले 10 नोव्हेंबर ते 09 डिसेंबर 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय डाक विभाग भरती

पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमॅन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

एकूण जागा : 1899

शैक्षणिक पात्रता :

पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट या पदांसाठी:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असावे.
  • संगणकावर काम करण्याचे ज्ञान असावे.

पोस्टमॅन / मेल गार्ड या पदांसाठी:

  • मान्यताप्राप्त बोर्डाची 12वीची उत्तीर्ण परीक्षा असावी.
  • 10वी किंवा त्यापुढील वर्गात संबंधित पोस्टल सर्कल किंवा विभागाच्या स्थानिक भाषेत एक विषय म्हणून उत्तीर्ण असावे.
  • संगणकावर काम करण्याचे ज्ञान असावे.
  • दोन–चाकी वाहन चालविण्यासाठी वैध परवाना असणे आवश्यक आहे (केवळ पोस्टमनच्या पदासाठी). बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्तींना परवाना ठेवण्यापासून सुट देण्यात आले आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी:

  • मान्यताप्राप्त बोर्डाची 10वी उत्तीर्ण असावी.

क्रीडा पात्रता: 

(i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

इंडिया पोस्ट पगार 2023

  • पोस्टल असिस्टंट लेवल 4 – रु. 25,500 – रु. 81,100)
  • सॉर्टिंग असिस्टंट लेवल 4 – रु. 25,500 – रु. 81,100)
  • पोस्टमॅन लेवल 3 – रु. 21,700 – रु. 69,100)
  • मेल गार्ड लेवल 3 – रु. 21,700 – रु. 69,100)
  • मल्टी टास्किंग स्टाफ लेवल 1 – रु. 18,000 – रु. 56,900)

वयोमर्यादा :

  • पोस्टल असिस्टंट – 18-27 वर्षे
  • सॉर्टिंग असिस्टंट – 18-27 वर्षे
  • पोस्टमॅन – 18-27 वर्षे
  • मेल गार्ड – 18-27 वर्षे
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18-25 वर्षे

इतर नियमानुसार सूट ….

अर्ज फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

अर्ज कसा करावा :

पात्र आणि इच्छुक उमेदवार “https://dopsportsrecruitment.in” येथे ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमॅन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ तसेच पोस्टल सर्कल्स या दोन्ही कॅडरसाठी प्राधान्याचा क्रम देऊन.

जाहिरात डाउनलोड करा येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लीक करा
नवीन भरती महासराव होम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here