लोकमान्य टिळक माहिती मराठी मध्ये MPSC Notes

लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव ‘बाळ गंगाधर टिळक’. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव.

  • जन्म : २२ जुलै १८५६
  • मृत्यू : १ऑगस्ट १९२०
  • पूर्ण नाव : बाळ ( केशव) गंगाधर टिळक
  • जन्मस्थान: चिखलगाव ,ता. दापोली ,जि. रत्नागिरी
  • वडील :गंगाधरपंत
  • आई : पार्वतीबाई
  • शिक्षण: इ. स. (७६ मध्ये बी. ए. (गणित) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण इ. स. १८७९ मध्ये एल. एल. बी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • विवाह: सत्यभामाबाई सोबत

अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरी. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नाव कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.

सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यानी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश

सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.

कार्य

इ. स. १८८० मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना.

इ.स १८८१ मध्ये जनजागूतीसाठी ‘केसरी’ हे मराठी व ‘मराठा’ हे इंग्रजी अशी वक्तपत्रे प्रसिद्ध करायला सुरुवात केली. आगरकर केसरीचे, तर टिळक मराठा चे संपादक बनले.

इ.म. १८८४ मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

इ.स. १८८५ साली पुणे येथे फग्र्युसन कॉलेज सुरू करण्यात आले.

इ.स. १८८५ साली राष्ट्रीय सभा स्थापन झाली होती. लोकमान्य टिळक तिच्यात सामील झाले.

यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी इ. स. १८८७ मध्ये केसरीच्या संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’ चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्राद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले.

इ.स. १८९३ मध्ये ‘ओरायन’ नामक पुस्तकाचे प्रकाशन.

लोकांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी ‘सार्वजनिक गणपती उत्सव’ आणि ‘शिवजयंती उत्सव’ सुरू केले.

इ.स. १८९५ मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.

इ. स १८९७ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप करून त्यांना दीड वर्षे सश्रम। कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

इ. स ११०३ मध्ये ‘दि आक्टिक होम इन द वेदाज’ नामक पुस्तकाचे प्रकार १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटातील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणाम मवाळ गटाने जहालाची कांग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली, जहालांचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होते.

इ.स. १९०८ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली.

मंडालेच्या तुरुंगात या महापुरुपाने निरनिराळे संदर्भग्रंथ मागवून

“गीतारहस्य’ हा अमर ग्रंथ लिहिला एवढे नव्हे तर जर्मन व फ्रेंच या दोन समृद्ध भाषांतील महत्वाचे ग्रंथ वाचता यावेत म्हणून त्या भाषांचाही अभ्यास केला

इ.स. १९१६ मध्ये त्यांनी डॉ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने ‘होमरूल लीग’ या संघटनेची स्थापना केली. भारतीय होमरूल चळवळीने स्थयंशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे. यालाच ‘स्वशासन’ म्हणतात. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच’ असे टिळकांनी ठामपणे सांगितले. होमरूल चळवळीमुळे राष्ट्रीय आंदोलन नवचैतन्य निर्माण झाले.

लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतु:सूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला.

हिंदी ही राष्ट्रभाषा असावी ही योपणा टिळकांनी प्रथमतः केली.

.

ग्रंथसंपदा

ओरायन (१८९३). दि आर्कटिक होम इन द वेदाज (१९०३), गीतारहस्य इत्यादी.

.

विशेषता

भारतीय असंतोषाचे जनक.

लाल-बाल-पाल या त्रिमूर्ति पैकी एक.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here