महाराष्ट्र भूषण पुरस्कार माहिती व यादी

Maharashtra Bhushan Award Information in Marathi : महाराष्ट्र भूषण हा राज्य शासन द्वारे देण्यात येणारा सर्योच्च नागरी पुरस्कार आहे, 1995 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली व महाराष्ट्र भूषण हा प्रथम 1996 मध्ये प्रदान करण्यात आला. सुरुवातीला साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जात असे. नंतर सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निकष : (Eligibility Criteria)

या पुरस्काराचे काही निकष आहेत जसे संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. तसेच सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वरुप : (Prize)

जानेवारी, २०२३ च्या निकषानुसार, पुरस्कार विजेत्याला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.

महाराष्ट्र भूषण यादी : List Of Maharashtra Bhushan Award

वर्षनावक्षेत्र
१९९६पु. ल. देशपांडेसाहित्य
१९९७लता मंगेशकरकला, संगीत
१९९९विजय भटकरविज्ञान
२०००सुनील गावसकरक्रीडा
२००१सचिन तेंडुलकरक्रीडा
२००२भीमसेन जोशीकला, संगीत
२००३अभय बंग आणि राणी बंगसमाजसेवा व आरोग्यसेवा
२००४बाबा आमटेसमाज सेवा
२००५रघुनाथ माशेलकरविज्ञान
२००६रतन टाटाउद्योग
२००७रा.कृ. पाटीलसमाजसेवा
२००८नानासाहेब धर्माधिकारीसमाजसेवा
२००८मंगेश पाडगावकरसाहित्य
२००९सुलोचना लाटकरकला, सिनेमा
२०१०जयंत नारळीकरविज्ञान
२०११अनिल काकोडकरविज्ञान
२०१५बाबासाहेब पुरंदरेसाहित्य
२०२१आशा भोसलेकला, संगीत
२०२२अप्पासाहेब धर्माधिकारीसमाजसेवा
महत्वाचे : इ.स. २०१२, २०१३, २०१४, व २०१६,२०१७,२०१८,२०१९,२०२० मध्ये हा पुरस्कार कोणालाही दिला नाही.

स्पर्धा परीक्षा मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वरती विचारले जाणारे प्रश्न :

1) महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भात खालील विधाने विचारा घ्या.

अ) महाराष्ट्र भूषण पुरस्कारांसाठी सुरुवात 1996 मध्ये झाली.
ब) महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.
क) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला.
ड) 2008 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी आणि मंगेश पाडगावकर यांना महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

1) अ, ब आणि ड
2) ब, क आणि ड
3) अ, क आणि ड
4) अ, ब, क आणि ड

उत्तर : २. ब, क आणि ड

3. आतापर्यंत (2022) महाराष्ट्र भूषण पुरस्कार किती माान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत ?

1) 20 
2) 19
3) 21
4) 18

उत्तर : 2 (19)

3) महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे ?

अ) जयंत नारळीकर
ब) अनिल काकोडकर
क) नानासाहेब धर्माधिकारी 
ड) सुलोचना लाटकर

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ आणि ब
2) फक्त अ,ब आणि क   
3) फक्त अ,ब आणि ड 
4) वरीलपैकी सर्व 

उत्तर : 4 वरीलपैकी सर्व

4) सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला :

  1. विजय भटकर
  2. सचिन तेंडुलकर
  3. पु. ल. देशपांडे
  4. लता मंगेशकर

उत्तर : 3 . पु. ल. देशपांडे

5. नुकताच (२०२२) चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला.

  1. आशा भोसले
  2. बाबासाहेब पुरंदरे
  3. अप्पासाहेब धर्माधिकारी
  4. नानासाहेब धर्माधिकारी

उत्तर : 3. अप्पासाहेब धर्माधिकारी

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा