मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १ :

0
243

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १ । Marathi Grammar Practice Paper 1 :


1) जगजननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता?

1) जग् + अननी
2 ) जगत् + जननी
3 ) जग् + जननी
4 ) जगज्ज + ननी

2) लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

1) सामान्य नाम
2 ) विशेषनाम
3 ) भाववाचक नाम
4 ) धातूसाधित नाम

3) चांदणी’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रुप शोधा.

1) चांदण्या
2 ) चांद
3 ) चांदणे
4 ) चांदणा

४) ‘कृष्ण’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप लिहा.

1) कृष्णा
2 ) रुक्मिणी
3 ) श्यामा
4 ) राधा

५) चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा.

1) अधिविशेषण
2 ) सार्वनामिक विशेषण
3 ) उत्तर विशेषण
4 ) विधीविशेषण

६) तुमच्या सागण्यावरुन आपण स्पर्धेत भाग घेणार. अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा.

१ ) द्वितीय पुरुषवाचक
२ ) आत्मवाचक
३ ) प्रथम पुरुषवाचक
४ ) तृतीय पुरुषवाचक

७ ) पुढीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते?

१ ) वासरे
२ ) हसरे
३ ) पाखरे
४ ) लेकरे

8) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

१ ) संबोधन दर्शक – अगा
२ ) शोकदर्शक – अगाई
३ ) विरोधदर्शक – उंह
४ ) समतिदर्शक – ओहो

9) दादाने आम्हा सर्वाना पेढे वाटले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

१ ) द्वितीया
२ ) तृतीया
३ ) सप्तमी
४ ) चतुर्थी

१०) मी माझे आरश्यात प्रतिबिंब पाहिले आहे. दिलेल्या वाक्याचा
काळ ओळखा.

१ ) अपूर्ण वर्तमानकाळ
२ ) पूर्ण वर्तमानकाळ
३ )साधा वर्तमानकाळ
४ )रीती भूतकाळ

११) पुढीलपैकी हस्व स्वर कोणता नाही?

१ ) ऊ
२ ) लू
३ ) ऋ
४ ) इ

१२) संधी नियमात न बसणारा शब्द निवडा.

१ ) दुर्जन
२ ) बहिरंग
३ ) निरंतर
४ ) नीरस

१३) ‘चंद्रकोर’ या शब्दाचे लिंग ओळखा.

१ ) पुल्लिंग
२ ) स्त्रीलिंग
३ ) नपुंसकलिंग
४ ) पुल्लिंग व स्त्रीलिंग

१४) संघर्ष करीत राहिलात तर यश नक्कीच तुमच्याकडे चालत येईल. (वाक्याचा प्रकार ओळखा.)

1) केवल वाक्य
2) संयुक्त वाक्य
3) मिश्र वाक्य
4) उद्गारार्थी वाक्य

१५) ‘सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे अमुचे तुझ्या पाया’ (या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा)

1) स्वार्थ
2) आज्ञार्थ
3) विध्यर्थ
4) संकेतार्थ

१६) रमाकांत’ हा सामासिक शब्दाचा समास ओळखा.

1) तत्पुरुष
2) बहुव्रोही
3) अव्ययीभाव
4)द्वद्व

१७) चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थाबातो त्यास … म्हणतात.

1) गण
2) मात्रा
3) यती
4) वृत्त

१८) ‘हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी’ (अलंकार ओळखा).

1) यमक
2) उत्प्रेक्षा
4) अनुप्रास
3) उपमा

१९) आपण यांना ओळखलंत का (या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल.)

1) पूर्ण विराम
2) अपूर्ण विराम
3) उद्गारचिन्ह
4) प्रश्नचिन्ह

२०) मुलांनी गावात प्रभात फेरी काढली. (दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा.)

1) कर्मणी
2) सकर्मक कर्तरी
3) अकर्मक कर्तरी
४) सकर्मक भावे

२१) शुद्ध शब्द ओळखा.

1) आग्रगण्य
2) अग्रगन्य
3) अगग्रण
४) अग्रगण्य

२२) शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. सत्तेच्या जोरावर गरिबांवर केलेला अन्याय –

1) सनातनी
2) लोकशाही
3) दडपशाही
४) दुराग्रही

२३) ) दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. सांत्वन करणे.

१) प्रेरणा देणे
2) कृपाशीर्वाद देणे
३ ) सन्मान देणे
४ ) दिलासा देणे

२४) अलंकारीक शब्दाचा योग्य पर्याय निवडा. दारिद्रय येणे.

1) पावसाळी छत्र्या
2) अक्काबाईचा फेरा
3) द्रौपदीची थाळी
४) म्हाताऱ्याची काठी

२५) कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

1) जलद
2) लगेच
3) पूर्वी
४) सांप्रत


Previous articleविधानपरिषद (Legislative Council) माहिती : VidhanParishad Information in Marathi
Next articleमराठी व्याकरण प्रश्नसंच २ :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here