MPSC आयोगातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभागात 378 पदांसाठी भरती

mpsc recruitment 2023
mpsc recruitment 2023

MPSC Professor Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उच्चशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या विविध संवर्गातील पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, एकूण 378 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. 20) पासून सुरू होत आहे.

एकूण जागा :

 • प्राध्यापक – ३२
 • सहयोगी प्राध्यापक – ४६
 • सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक – २१४
 • अधिव्याख्याता – ८६

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकोय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यपक, ग्रंथपाल, शिक्षण संचालक असे  महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट – अ, ब गटातील ३७८ पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येथ आहे, शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे,

शैक्षणिक पात्रता : Qualification

प्राध्यापक

 • मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पदवी प्राप्त केली असावी.
 • मान्यताप्राप्त प्रकाशितामधून किमान १० रिसर्च पेपर प्रकाशित असावे.
 • अध्यापनाचा किमान १० वर्षांचा अनुभव असावा.

सहयोगी प्राध्यापक

 • मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पदवी प्राप्त केली असावी.
 • मान्यताप्राप्त प्रकाशितामधून किमान ७ रिसर्च पेपर प्रकाशित असावे.
 • अध्यापनाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असावा.

सहाय्यक प्राध्यापक / ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

 • मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण असावी.
 • किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

अधिव्याख्याता

 • संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी घेऊन पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
 • बी. एड. उत्तीर्ण असावा.

कृपया पूर्ण पात्रता अधिकृत जाहिरात मध्ये बघा…

अर्ज शुल्क

 • प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी अर्जशुल्क ७१९ रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ४४९ रुपये.
 • सहाय्यक प्राध्यापक / ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक आणि अधिव्याख्याता या पदासाठी ३९४ रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी २९४ रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ९ नोव्हेंबर २०२३

अर्ज कसा करावा:

अर्ज करण्यासाठी उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण असावा…..

अर्ज करण्यापूर्वी तुम्ही MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तुम्ही तुमच्या पात्रतेची खात्री करावी आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत चुकवू नका.

अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

 1. MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 2. “ऑनलाइन अर्ज” वर क्लिक करा.
 3. आवश्यक माहिती भरा.
 4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 5. अर्ज शुल्क भरा.
 6. सबमिट करा.

प्राध्यापक पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना : येथे क्लिक करा.

सहयोगी प्राध्यापक पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना : येथे क्लिक करा.

सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या भरतीची अधिसूचना : येथे क्लिक करा.

अधिव्याख्याता पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना : येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज लिंकhttps://mpsconline.gov.in/candidate