म्हैसूर राज्य आणि इंग्रज-म्हैसूर युद्धे

◆ म्हैसूर राज्य (१७६१-१७९९)

हैदर अली (१७६१-८२)

• विजयनगर साम्राज्याचे पतन झाल्यावर १५६५ मध्ये म्हैसूर राज्याचे शासक, हिंदू वाडियार घराणे, स्वतंत्र झाले. हैदर अली म्हैसूर राज्याच्या सेवेत एक सैनिक म्हणून होता.

• पुढे दिंडीगलचा फौजदार म्हणून त्याने उत्तम काम केले. त्याच्या नियंत्रणाखालील सैनिकांना पाश्चिमात्य पद्धतीने प्रशिक्षण दिले. तसेच त्याने १७५५ मध्ये दिंडीगल येथे फ्रेंचांच्या मदतीने एक आधुनिक शस्त्रांचा कारखाना/शस्त्रागार (arsenal) उभारले.

• १७५९ मध्ये मराठ्यांनी म्हैसूरवर केलेल्या हल्ल्यादरम्यान हैदरने हैदरला राजधानी श्रीरंगपट्टणमचे संरक्षण यशस्वीपणे केल्याने म्हैसूर
राज्याचा पंतप्रधान नंजराजार याने हैदरला ‘फतेह हैदर बहादूर’ मद्रास ही पदवी बहाल केली. (म्हैसूरचा राजा चिक्क कृष्णराज हा होता. मात्र खरी सत्ता नंजराजार याच्याच हातात होती.)

• १७६१ मध्ये हैदर अलीने नंजराजार यास पदच्युत करून सत्ता हैदर आपल्या हाती घेतली, मात्र कृष्णराजाचा राजा म्हणून दर्जा मान्य केला.

• हैदर अलीने आजुबाजुचा बराच प्रदेश जिंकून घेतला-कूर्ग, मलबार, बेल्लरी, गुटी, कडप्पा इत्यादी. त्याने केलेल्या प्रशासकीय सुधारणांमुळे म्हैसूर ही एक महत्वाची भारतीय सत्ता बनली.

• पानिपतच्या युद्धानंतर माधव राव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी १७६४, १७६६ व पुढे १७७१ मध्ये म्हैसूरवर हल्ले करून हैदर अलीला हरविले. हैदरने काही प्रदेश देऊन मराठ्यांशी शांतता मिळविली.

• हैदर पहिले इंग्रज-म्हैसूर युद्ध यशस्वीपणे लढला. मात्र दुसऱ्या युद्धादरम्यान १७८२ मध्ये कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला. दुसरे युद्ध त्याला मुलगा टिपू सुलतान याने चालू ठेवले.

◆ पहिले इंग्रज-म्हैसूर युद्ध

● कारणे

• पहिल्या युद्धाची महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे होती:

  • दक्षिणेतून व अंतिमत: भारतातून इंग्रजांना हाकलून लावण्याची हैदरची महत्वाकांक्षा व इंग्रजांना हैदरच्या धोक्याची झालेली म्हैसूर जाणीव.
  • इंग्रजांविरूद्ध दक्षिणेतील भारतीय सत्तांची एकी घडवून आणण्याचा हेदरने प्रयत्न केला, मात्र तो सफल झाला नाही. याउलट हैदरविरुद्ध इंग्रजांनी निझाम व मराठ्यांसमवेत एकत्रिपक्षीय युती (Tripartite Alliance) निर्माण केली.
  • हैदरला मात्र ही युती फोडण्यास यश मिळाल्याने त्याने शस्त्रागार इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

महत्वाच्या घटना

• हैदरने हेदरला इंग्रजांविरूद्ध मोठे यश प्राप्त झाले व मार्च १७६९ पर्यंत तो मद्रासपासून ५ मैलाच्या अंतरापर्यंत येऊन ठेपला. • मद्रास सरकारने घाबरून हैदर बरोबर एप्रिल १७६९ मध्ये युद्धबंदीसाठी तह (defensive treaty) केला.

मद्रासचा तह (१७६९)

• हैदर अली आणि कंपनी व तिचे दोस्त राज्ये यांदरम्यान हा तह  करण्यात आला. त्याच्या तरतुदी पुढीलप्रमाणे होत्याः

  • परस्परांचे प्रदेश परत करणे, मात्र करूर प्रदेश हैदर अली स्वत:कडे ठेवील.
  • तिसऱ्या शक्तीकडून हल्ला झाल्यास हैदर व इंग्रज एकमेकांना मदत करतील. (defensive treaty)
  • हैदरने मद्रास सरकारच्या पकडलेल्या सर्व युद्धकैद्यांना मुक्त केले जाईल.
  • हैदर अली तंजावरच्या राज्यास (इंग्रजांचा दोस्त राजा) आपला मित्र व साथीदार समजेल.
  • मद्रास प्रेसिडन्सीचे व्यापारी अधिकार व इंग्रजांच्या वखारी त्यांना परत मिळतील.

दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध (१७८०-१७८४)

कारणे

• १७७१ मध्ये मराठ्यांनी हैदरवर हल्ला केल्यावर इंग्रजांनी हैदरला मदत करण्याचे नाकारले व अशा रीतीने मद्रास तहाच्या अटी मोडल्या.
• हैदरला फ्रेंच अधिक मदतकारी असल्याचे जाणवले. माहे या फ्रेंचांच्या बंदरामार्गे युद्धसाहित्य म्हैसूरमध्ये येणे सोपे आहे,असे त्याला वाटत होते.
• अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध सुरू झाल्यावर फ्रान्सने अमेरिकन वसाहतींना पाठिंबा जाहीर केल्याने वॉरन हेस्टिंगला हैदरबाबत शंका निर्माण झाली.
• इंग्रजांनी माहे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, जे हैदरसाठी प्रत्यक्ष आव्हान होते. हैदर माहे आपल्या प्रदेशात व संरक्षणाखाली असल्याचे मानत होता.

महत्वाच्या घटना

● हैदरने इंग्रजाविरूद्ध निझाम व मराठ्यांच्या समवेत संयुक्त आघाडी उभारली. १७८० मध्ये कर्नल बायलीचा पराभव करून कर्नाटकची राजधानी अरकॉट ताब्यात घेतली.

● मात्र इंग्रजांनी निझाम व मराठ्यांना हैदरपासून विभक्त करण्यात यश मिळवल्याने हैदरला इंग्रजांशी एकाकी लढावे लागले.नोव्हेंबर १७८१ मध्ये सर आयर कूट याने पोर्टो नोवो येथे हैदरचा पराभव केला. पुढील वर्षी हैदरने कर्नल ब्रेथवेटच्या नेतृत्वाखालील आर्मीचा पराभव केला.

● मात्र ७ डिसेंबर, १७८२ रोजी हैदरचा मृत्यू झाला. त्यानंतर टिपू सुलतानने युद्ध चालू ठेवले. मार्च, १७८४ मध्ये दोन्ही बाजूंनी युद्धबंदीचा ‘मैंगलोर तह’ केला.

मंगलोर तह (मार्च, १७८४)

• हा तह टिपू सुलतान व मद्रासचा गव्हर्नर लॉर्ड मॅकार्टने यांच्या दरम्यान झाला. त्याच्या तरतुदी पुढीलप्रमाणे:

• १)दोन्ही पक्षांनी परस्परांच्या शबूंना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे मदत करायची नाही, तसेच परस्परांच्या दोस्त राज्यांबरोबर युद्ध करायचे नाही. • २)१७७० मध्ये हैदर अलीने कंपनीला दिलेल्या व्यापारी सवलती पुनर्स्थापित करणे.
• ३)दोन्ही पक्षांनी परस्परांचे जिंकलेले प्रदेश परत करणे व भविष्यात टिपूने कर्नाटकवर कोणताही हक्क सांगू नये.
• ४)टिपूने सर्व युद्धकैद्यांना (एकूण १६८०) सोडण्याचे मान्य केले.

टिपू सुलतान (१७८२-१७९९)

• हैदरच्या मृत्यूनंतर टिपू सुलतानने दुसरे युद्ध १७८४ पर्यंत चालू ठेवले. त्याने तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध (१७९०-९२) व चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध ( १७९९) लढले. व चौथ्या युद्धात लढतांना टिपूचा मृत्यू झाला.

तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध
(१७९०-१७९२)

कारणे

• १)टिपूने विविध अंतर्गत सुधारणा करून आपली स्थिती मजबूत बनविली होती. इंग्रजांच्या साम्राज्यवादाचेही स्वरूप असेच होते की, ते प्रत्येक शांततेच्या तहाचा वापर पुढील हल्ल्यासाठी वेळ मिळविण्यासाठी (breathing time) करीत असत.
• २)टिपूने इंग्रजांच्या विरूद्ध मदतीसाठी तुर्कस्थानच्या राज्याकडे १७८४ व १७८५ मध्ये, तर १७८७ मध्ये फ्रान्सच्या राज्याकडे शिष्टमंडळे पाठविली.
• ३)टिपूच्या त्रावणकोरच्या राज्याशी निर्माण झालेल्या मतभेदामुळे हैदरचा टिपूने एप्रिल १७९० मध्ये त्रावणकोरवर हल्ला केला. युद्धासाठी सज्ज असलेल्या इंग्रजांनी त्रावणकोरची बाजू घेतली.
• ४)लॉर्ड कॉर्नवालिसने निझाम व मराठ्यांच्या मनातील टिपूविरोधीभावनांचा फायदा घेऊन १७९० मध्ये इंग्रज-निझाम-मराठे अशी त्रिपक्षीय युती केली.

महत्वाच्या घटनाः

● १७९० मध्ये टिपूने मेजर जनरल मिडो याचा पराभव केला. त्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिसने स्वत: कमांड आपल्या हाती घेऊन तो मोठे सैन्य घेऊन वेल्लोर, अंबूर, बंगलोर मार्गे श्रीरंगपट्टणमपर्यंत
येऊन पोहोचला.

● सुरुवातीच्या अपयशानंतर कॉर्नवॉलिसला निझाम व
राज्याबरोबर मराठ्यांच्या मदतीने फेब्रुवारी १७९२ मध्ये श्रीरंगपट्टणमला वेढा घालण्यात यश आले. टिपूने प्रखर प्रतिकार केला, मात्र युद्ध चालू ठेवण्यातली निष्फळता त्याच्या ध्यानात आली. त्यामुळे त्यांच्यात मार्च १७९२ मध्ये श्रीरंगपट्टणमचा तह करण्यात आला.

◆ चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध
(१७९९)

कारणे

• १)टिपूची आपल्या अपमानास्पद पराभवाचा व लादलेल्या तहाच्या अटींचा सूड घेण्याची प्रबळ इच्छा व स्वतःला पुन्हा प्रबळ बनविण्याची इच्छा

• २)टिपूचे फ्रान्सकडून तसेच अरेबिया, काबूल आणि तुर्कस्थानच्या मुस्लिम शासकांकडून मदत मिळविण्याचे प्रयत्न. त्याने या देशांकडे शिष्टमंडळे सुद्धा पाठविली. एप्रिल १७९८ मध्ये एक छोटी फ्रेंच तुकडी मंगलोरला पोहोचली.

• ३)१७९८ मध्ये लॉर्ड वेलस्लीचे आगमन: तो कठोर साम्राज्यवादी मतांचा होता. नेपोलियनच्या हल्ल्याचा बागुलबुवा उभा करून त्याने भारतातील प्रदेश घेण्याचा सपाटा लावला. टिपूसारख्या प्रबळ शत्रूला संपविणे यासाठी तो प्रयत्नशील होता.

महत्वाच्या घटना

• टिपूच्या विरूद्ध इंग्रजांच्या कारवाया मार्च १७९९ मध्ये सुरू झाल्या. प्रथम सेदासीर येथे व नंतर मालवेल्ली येथे टिपूचा पराभव झाला.

• टिपू श्रीरंगपट्टणमला मागे फिरला. ४ मे, १७९९ रोजी श्रीरंगपट्टणमचे संरक्षण करतांना शौर्याने लढत असतांना टिपूचा मृत्यू झाला. लॉर्ड वेलस्लीचा भाऊ ऑर्थर वेलस्ली यानेही या युद्धात भाग घेतला.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा