26 January Information in Marathi : 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?

26 January Information in Marathi

आपण प्रजासत्ताक दिन (26 January Information in Marathi) दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. याला आपण गणराज्य दिन असेही म्हणतो. पण तरी सुद्धा खूप कमी लोकाना माहिती आहे की, 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? बऱ्याच लोकाना आज ही प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन दिवसांमधला फरक जर विचारलं तर त्यांना तो ठळकपणे सांगता येत नाही.

आपण भारताचे नागरिक आहोत. आणि प्रत्येक भारतीयाला भारताचे नागरिक म्हणून प्रजासत्ताक दिन (Republic Day) का साजरा केला जातो ? हे माहिती असायला हवे.भारताला १५ ऑगस्ट 1९४७ रोजी स्वतंत्र मिळालं, पण स्वातंत्र्याला खरा आकार मिळाला तो २६ जानेवारी १९५० रोजी.याच दिवशी भारतात संविधान आणि लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने लागू झाल.

26 January Information in Marathi

26 January Information in Marathi : आपल्या देशावर कित्येक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले.आणि त्यांचे कायदे त्यांनी आपल्या देशामध्ये लादले . त्यावेळी त्यांच्या कायद्याचा जो कोणी विरोध करत असे , त्यांच्यावर ते अत्याचार करत . १३ एप्रिल १९१९ साली ज्यावेळेस जालीयनवाला बाग हत्याकांड झाले.त्या वेळेस अनेक क्रांतिकारी निर्माण झाले. जनरल डायर च्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी लहान मुले ,वृद्ध ,स्त्रिया अशा हजारो लोकाना मारून टाकले होते. या घटनेनंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची आग पेटली होती. आणि प्रत्येक जण स्वातंत्ऱ्यासाठी बलिदान द्यायला तयार होता.

२६ जानेवारी १९३० मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीनशांकडे पूर्ण स्वराज्याची मागणी केली . त्यावेळेस त्यांनी लाहोर मध्ये रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकावला. हा दिवस संपूर्ण भारतात स्वतंत्र दिनासारखा साजरा करण्यात आला.पण तरी सुद्धा ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध यामुळे भारतीयांना जास्त लढा द्यावा लागला. पण अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र मिळाले. म्हणून आपण १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करतो. भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा भारताकडे स्वतःचे संविधान नव्हते. भारत देश चालवण्यासाठी नियमाची गरज होती.

२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्यानंतर ४ नोवेंबर १९४७ रोजी या समितिनि विधानसभेसमोर आपला पहिला मसुदा मांडला. विधानसभेत २ वर्ष ११ महीने १८ दिवस अनेक सतरांमध्ये या संविधानवर चर्चा आणि सुधार होत राहीला. आणि शेवटी २६ नोवेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान तयार झाले.

पण ते अंमलात कधी पासून आणायचे यावर सुद्धा चर्चा झाली. आणि मग त्यांनी मिळून २६ जानेवारी ही तारीख ठरवली कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच दिवस रावी नदीवर तिरंगा फडकावला होता.

२४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्य यांनी मसुदा मान्य केला. आणि संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रति काढल्या. त्यानंतर दोन दिवसानी २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाची आंबलबाजवणी होऊन संविधान लागू झाले. आणि खऱ्या अर्थाने प्रजाच्या हातात सत्ता आली. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

कसा साजरा होता 26 January प्रजासत्ताक दिन ?

प्रजासत्ताक दिन, स्वतंत्रता दिन हे असे उत्सव आहेत की जे आपल्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाविषयी आपल्याला आठवण करून देतात. त्या नेत्यांनी, त्या स्वातंत्र्यसैनिकांनी त्या काळी ब्रिटीशांविरूध्द लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

भारतात 26 January प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. २६ जानेवारी या दिवशी नवी दिल्ली येथे राजपथ मार्गावरून एक मोठी परेड निघते जी भारताची संस्कृती आणि संरक्षण क्षमता दाखवून देते. त्यामध्ये भारताच्या विविध राज्याच्या संस्कृती यांचे नजारे बनवलेले असतात. भारतात विविध जाती जमातीचे लोक राहतात , तरीसुद्धा यातून एकतेची भावना जपली जाते.बरेच लोक या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भेट देतात व राष्ट्रीय उत्सवाचा आनंद घेतात.

याच दिवशी देशातल्या प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात ध्वजारोहन होते . शाळा व कार्यालयांमध्ये सद्धा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. शाळांना, सरकारी इमारतींना तोरणे- पताका लावले जातात.

शाळेतील पूर्ण विद्यार्थी सकाळी सकाळी गणवेशात तयार होऊन एकत्र जमतात. लहान-मोठी मुले प्रभात फेरीत भाग घेऊन भारत मातेचा जयघोष करतात . देशातल्या शाळा मध्ये विध्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. अनेक ठिकाणी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

नागरिक या दिवशी तिरंगी रंगाचे झेंडे, फुगे इत्यादींचा वापर करून घर व ऑफिस सुशोभित करतात. लोक एकमेकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देतात. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण दिसून येते. असा हा प्रजासत्ताक दिन दर वर्षीसाजरा केला जातो व त्यामुळे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम उजळून निघते.