Agniveer Bharti 2023 : अग्निवीर भरतीसाठी सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज सुरु

Agniveer Bharti 2023 : अग्निवीर भरती 2023 – 2024 साठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज सुरु.

भारतीय सैन्य दलामार्फत मार्फत महाराष्ट्रातील विविध ARO Unit द्वारे २०२३ – २०२४ करिता अर्ज मागवण्यात येत आहे. अग्निवीर भरती दोन टप्प्यामध्ये होणार असून सर्व प्रथम लेखी चाचणी व त्या नंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. अर्ज १६ फेब्रुवारी पासून ते १५ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन सादर करावा लागेल .

अग्निवीर भरती 2023 माहिती

पदे : जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समॅन

पात्रता :

  • अग्निवीर जनरल ड्युटी – विद्यार्थ्याने 45 टक्क्यांसह 10 वी पास असणं आवश्यक आहे. प्रत्येक विषयात कमीत कमी 35 टक्के गुण असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे लाइट मोटार व्हेईकल परवाना आहे, त्यानं प्राधान्य दिलं जाईल.
  • अग्निवीर टेक्निकल – फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि इंग्रजी विषयात 50 टक्के गुणांसह 12 वी पास आवश्यक आहे. प्रत्येक विषयात कमीत कमी 40 टक्के गुण आवश्यक आहेत.
  • अग्निवीर क्लर्क/स्टोअरकीपर – कमीत कमी 60 टक्के गुणांसह 12 वी पास असणं आवश्यक आहे. इंग्रजी आणि गणित/अकाउंट्स/बुक कीपिंगमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
  • अग्निवीर ट्रेड्समॅन – या पदासाठी उमेदवार कमीत कमी 8 वी ते 10 वी पास असणं आवश्यक आहे. सर्व विषयांमध्ये किमान 35 टक्के गुण आवश्यक आहे.

वयोमर्यादा : साडे 17 वर्षे ते 21 वर्षे  जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.

अर्ज फी : 250 /-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023

लेखी परीक्षा दिनांक : 17 एप्रिल 2023 पुढे

नोटिफिकेशन डाउनलोड करा :

महाराष्ट्र अग्निवीर भरती जाहिरात

ARO OfficeDistrictDownload Notification
ARO Aurangabad AURANGABAD, BULDANA, HINGOLI, JALGAON, JALNA, NANDED, PARBHANIAgniveer Aurangabad Download
ARO KolhapurKOLHAPUR, SATARA, SANGLI, RATNAGIRI & SINDHUDURG, NORTH GOA. SOUTH GOAAgniveer Kolhapur Download
ARO MumbaiMUMBAI, MUMBAI SUBURBAN, THANE, PALGHAR, RAIGAD, NASHIK, NANDURBAR & DHULEAgniveer Mumbai Download
ARO NagpurNAGPUR, AMRAVATI, AKOLA, YAVATMAL, WARDHA, WASHIM, BHANDARA, GADHCHIROLI, CHANDRAPUR AND GONDIYAAgniveer Nagpur Download
ARO PuneAHMEDNAGAR, BEED, LATUR, OSMANABAD, SOLAPUR & PUNEAgniveer Pune Download

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : https://joinindianarmy.nic.in/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा