Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभागात लवकरच मोठी भरती, नवीन GR बघा

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023: 15 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने आरोग्य भरती साठी एक शासन निर्णय जाहीर केला. आरोग्य विभाग भरती 2023 साठी निवड समिती नेमण्यात आली आहे. ही समिती TCS सोबत करार करणे, रिक्त पदांचा आढावा घेणे, आरोग्य भरतीची अधिसूचना तयार करणे ही कामे करेल. 

नवीन माहितीनुसार आता एप्रिल 2023 मध्ये आरोग्य विभागाची ची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यातील गट क व गट ड संवर्गातील जुन्या 4717 + नवीन 4938 अधिक अश्या 9500+ रिक्त पदे भरण्याकरिता जाहीरत निघणार आहे.

आरोग्य विभाग भरती 2020 नवीन GR 15 March 2023

आरोग्य विभागातील “गट-“क” आणि “गट-“ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळसेवेने भरण्याबाबतच्या 15 मार्च 2023 रोजी एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला.

आरोग्य विभागाची परीक्षा TCS Ion मार्फत घेण्यात येणार आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हा /प्रादेशिक/ राज्यस्तरिय पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवडसमित्यांची स्थापना करणे, परीक्षा स्वरुप जाहिरात पध्दती समान गुण मिळाल्यास अवलंबवयाची कार्यपध्दती निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या व निवडसूचीची कालमर्यादा, पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी व संनियंत्रण करणे यासाठी एक राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि जिल्हा निवड समितीची निवड करण्यात आली आहे.

ही समिती आरोग्य विभाग भरती 2023 पूर्ण करण्यासाठी जबाबदार असेल. 15 मार्च 2023 रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

  • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत गट- “क” व गट-“ड” संवर्गातील सरळसेवा पदभरती ही टी. सी. एस. आय. ओ. एन. (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यां कंपनीमार्फत करण्यात यावी.
  • शासन निर्णयानुसार विहित परीक्षा शुल्क (खुला प्रवर्ग रु. 1000 आणि मागास प्रवर्ग रु. 900) उमेदवारांकडून आकारण्यात येईल.
  • सदर पदभरती प्रक्रिसेसाठी आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांचेकडून टी.सी.एस.- आय.ओ.एन (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यांचेशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.

15 मार्च 2023 रोजी जाहीर झालेला शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आरोग्य भरती 2023 GR Download करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा