Arogya Vibhag Bharti Syllabus 2023 – आरोग्य विभाग गट क व गट ड अभ्यासक्रम

Maharashtra Health Department Syllabus 2023 PDF : राज्यात होणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभाग भरती (DHS) अंतर्गत 11 हजार पदे अधिक गट क आणि गट ड पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम आपण या लेखात बघणार आहोत.

आरोग्य विभाग भरती 2023 अभ्यासक्रम – DHS Syllabus in Marathi PDF

विभागाचे नावसार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र
पद संवर्ग गट व गट ड
एकूण जागा 10949
वयोमर्यादा 18 ते 38 

Aarogya Vibhag Bharti Group C Syllabus – गट क अभ्यासक्रम

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती मध्ये ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. परीक्षेमध्ये तांत्रिक विषय, मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे वेग वेगळे विषय असतात.

मराठी , इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यांचा अभ्यासक्रम शेवटी दिला आहे….

विषयएकूण प्रश्न गुणकालावधी
मराठी204002 तास
इंग्रजी
सामान्य ज्ञान
बौद्धिक चाचणी
तांत्रिक / व्यावसायिक विषय80160
एकूण100200
Arogya Vibhag Group C Syllabus
 1. गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
 2. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील.
 3. विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी ८० टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित २० टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
 4. वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण २० प्रश्नांकरिता ४० गुणांची व विषयाधारीत ८० प्रश्नांकरिता १६० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
 5. गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
 6. उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.

तांत्रिक विषय मध्ये ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या नुसार विवध विषयावरती प्रश्न विचारले जातील.

गट क पदे व तांत्रिक अभ्यासक्रम :

 • House & Linen Keeper / Store cum Linen keeper / गृहवस्त्रपाल,भांडार नि वस्त्रपाल
 • Laboratory Scientific Officer / प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
 • Laboratory Assistant / प्रयोगशाळा सहाय्यक
 • X-Ray Technician/ X-Ray Scientific Officer / क्ष-किरण तंत्रज्ञ / क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
 • Blood Bank Technician/ Blood Bank Scientific Officer / रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी
 • Pharmacy Officer / फार्मसी अधिकारी
 • ECG Technician / ईसीजी तंत्रज्ञ
 • Dental Mechanic / डेंटल मेकॅनिक
 • Dialysis Technician / डायलिसिस टेक्निशियन
 • Staff Nurse / स्टाफ नर्स
 • Staff Nurse Private / स्टाफ नर्स प्रायव्हेट
 • Telephone Operator / टेलिफोन ऑपरेटर
 • Driver / ड्रायव्हर
 • Tailor / टेलर
 • Plumber / प्लंबर
 • Carpenter / सुतार
 • Ophthalmic Officer / नेत्ररोग अधिकारी
 • Psychiatric Social Worker/Social Superintendent / सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक
 • Physiotherapist / फिजिओथेरपिस्ट
 • Occupational Therapist / ऑक्युपेशनल थेरपिस्ट
 • Non-Medical Assistant / गैर-वैद्यकीय सहाय्यक
 • Warden / वॉर्डन
 • Record Keeper / रेकॉर्ड कीपर
 • Supervisor / पर्यवेक्षक
 • Electrician / Transport / इलेक्ट्रीशियन / वाहतूक
 • Skilled Artizen / कुशल कलाकार
 • Senior Technical Assistant / वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
 • Junior Technical Assistant / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
 • Technician HEMR / HEMR तंत्रज्ञ
 • Statistical Investigator / सांख्यिकी तपासणीस
 • Foreman / फोरमन
 • Service Engineer / सेवा अभियंता
 • Senior Security Assistant / वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
 • Medical SocialWorker/Scial Superintendent / Medical / वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक / वैद्यकीय
 • Higher Grade Stenographer / उच्च श्रेणी लघुलेखक
 • Lower Grade Stenographer / निम्न श्रेणी लघुलेखक
 • Steno Typist / लघुलेखक
 • Health Inspector / आरोग्य निरीक्षक
 • Librarian / ग्रंथपाल
 • Electrician / इलेक्ट्रीशियन
 • Operation Theatre Assistant / ऑपरेशन थिएटर सहाय्यक
 • Mouldroom Technician/Radiography Technician / मोल्डरूम तंत्रज्ञ/रेडिओग्राफी तंत्रज्ञ
 • Multi-Purpose Health Worker / Male / बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी / पुरुष
 • Junior Oversear / कनिष्ठ पर्यवेक्षक

Aarogya Vibhag Bharti Group D Syllabus – गट ड अभ्यासक्रम

 1. गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
 2. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील
 3. गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
 4. अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी ५ प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकुण १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
 5. गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील
विषयप्रश्न संख्यागुण
मराठी2550
इंग्रजी2550
अंकगणित व बुद्धिमत्ता2550
सामान्यज्ञान2550
एकुण100200
Arogya Vibhag Group D Syallbus

सर्व विषयांचा अभ्यासक्रम शेवटी दिला आहे ….

गट ‘ड’ अंतर्गत भरण्यात येणारे पदे :

 • Peon / शिपाई
 • Room Attendant / कक्षसेवक
 • Out Patient Attendant / बाह्य रुग्णसेवक
 • Dental Assistant / दंत सहाय्यक
 • X-Ray Attendant / क्ष-किरण परिचर
 • Laboratory Attendant / प्रयोगशाळा परिचर
 • Blood Bank Attendant / रक्तपेढी परिचर
 • Part Time Attendant / पार्ट टाईम परिचर
 • Health Attendant / आरोग्य परिचर
 • Female Attendant / स्त्री परिचर पुरुष परिचर
 • Hospital Attendant / दवाखाना परिचर
 • Attendant / परिचर
 • Male Attendant / पुरुष सेवक
 • Nursing Orderly / नर्सिंग ऑर्डरली
 • Casualty Section Servants / अपघात विभाग सेवक
 • Pump Mechanics / पंप मॅकॅनिक
 • Cleaners / क्लीनर
 • Mazdoor / मजदूर
 • Aaya / आया
 • Helpers / मदतनीस
 • Tailors / शिंपी
 • Weavers / वेष्टक
 • Messengers / संदेश वाहक
 • Leather Workers / लेदर वर्कर
 • Assistsnt Nursing Obstetricians / शुश्रूषा प्रसविका
 • Akushal Karigar / अकुशल कारागीर

Aarogya Group C and D Official Syllabus PDF – > आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा …

सर्व विषयांचा अभ्यासक्रम

मराठी :

English :
 • Common Vocabulary – Synonyms, Synonyms, One Word Substitution
 • Sentence Structure – Para Jumbles, Error Detection
 • Grammar – Article, Sentence types, Voice, Speech, Tense, etc..
 • letter and e-mail writing
 • Use of Idioms and phrases & their meaning
 • comprehension of passage.

सामान्य ज्ञान :

 • चालू घडामोडी – पुरस्कार, क्रीडा , योजना, राजकीय, मंत्रिमंडळ, अर्थसंकल्प, अहवाल, निर्देशांक, महत्वाच्या संस्था etc
 • भूगोल – प्राकृतिक, नदी, खनिज संपत्ती, वन संपत्ती, मृदा, कृषी, दळणवळण, पर्यटन, लोकसंख्या, महत्वाचे सन, जगाचा भूगोल, पृथ्वीचा भूगोल, नृत्ये
 • इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – साम्राज्य, घराणे, उठाव, चळवळी, समाज सुधारक, संत, वृत्तपत्रे, संस्थापक etc..
 • अर्थशास्त्र – बँका, पंचवार्षिक योजना, संस्था त्यांचे अध्यक्ष
 • भारताची राज्यघटना – महत्वाची कलमे, समित्या, घटनादुरुस्ती
 • सामान्य विज्ञान
 • माहितीचा अधिकार अधिनियम 2005
 • माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित : (दहावी)

बुद्धिमत्ता

 • क्रम मालिका (Number Series)
 • अक्षर मलिका (Alphabetical Series)
 • वेगळा शब्द व अंक ओळखणे,
 • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
 • वाक्यावरून निष्कर्ष
 • वेन आकृती.
 • नातेसंबंध
 • दिशा
 • कालमापन
 • विसंगत घटक
 • सांकेतिक भाषा

अंकगणित

PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी Print चा Option वापरा….

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा