Auxiliary verbs in Marathi – सहाय्यकारी क्रियापदे

◆ Auxiliary verbs in Marathi – (सहाय्यकारी क्रियापदे) | English Grammar

साहाय्यकारी क्रियापदे

● साहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग तुम्हाला इंग्रजी बोलताना लिहिताना टाळता येणार नाही. त्यामुळे सर्व साहाय्यकारी क्रियापदांबद्दल व्यवस्थित माहिती घ्यायला आणि हळूहळू त्या माहितीचे सवयीत रूपांतर करायला पर्यायच नाही. या साहाय्यकारी क्रियापदांच्या सविस्तर अभ्यासाची सुरुवात आपण करत आहोत Can पासून.

CAN

● 1) CAN
Can या साहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग प्रामुख्याने योग्यता व्यक्त करण्यासाठी होतो. परत परवानगी देण्यासाठी/घेण्यासाठी व शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा Can चा उपयोग केला जाऊ शकतो.
Can या साहाय्यकारी क्रियापदाचा मराठीत सर्वसाधारण अर्थ शकतो, शकते, शकतात असा होतो. Can सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते. पुढील उदाहरणांवरून Can चा उपयोग अगदी स्पष्ट होईल :

● उदा :- १) तू जाऊ शकतोस.
You can go.
२) तू येऊ शकतोस.
You can come.
३) तू इथे बसू शकतोस.
You can sit here. ४) मी बोलू शकतो.
I can speak.
५) मी इंग्रजी बोलू शकतो.
I can speak English
६) मी ही पेटी उचलू शकतो.
I can lift this box.
७) मी हे गणित सोडवू शकतो.
I can solve this problem.
८) तू हे स्वत: करू शकतोस.
You can do this yourself.
९) तू मला या नंबरवर फोन करू शकतोस. You can telephone me on this number.
१०) तो घरी असू शकतो.
He can be at home
११) तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो.
He can come at any moment.
१२) तू या भिंतीवरून उडी मारू शकतोस का? can you jump over this wall?
१३) ही बातमी खरी असू शकते. This news can be true.
१४) ही बातमी खरी असू शकते का? Can this news be true?
१५) धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो. Smoking can cause cancer.
१६) तू पोहायला जाऊ शकतोस पण सातच्या आधी परत ये. You can go swimming but get back before seven.
१७) आपण हे एका दिवसात करू शकतो का? Can we do this in one day?
१८) मसाला कुटण्यासाठी तुम्ही खलबत्ता वापरू शकता. You can use a pestle and mortar to crush the spices.
१९) मी तुला कशी मदत करू शकतो? How can I help you?
२०) आपण या चुकीची पुनरावृत्ती कशी टाळू शकतो?How can we avoid the repetition
of this mistake?

◆ COULD

2) COULD
● Could सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते.
भूतकाळातील योग्यता व्यक्त करण्यासाठी Could वापरतात, जसे, १) शाळेत असताना मी अस्खलित इंग्रजी बोलू शकत होतो.
When I was at school I could speak English fluently
(इथे could च्या ठिकाणी was / were able to सुद्धा वापरता येईल :When I was at school, I was able to speak English fluently.)

२) दोन वर्षांच्या आधीपर्यंत मी चश्म्याशिवाय वाचू शकत होतो/मला चश्म्याशिवाय वाचता येत होतं.
I could read without glasses until two years ago.

आता पुढील वाक्य पहा :
पाच वर्षांच्या नियमित व्यायामानंतर काल मी शंभर किलो वजन उचलू शकलो. या वाक्यात भूतकाळात करू शकलेल्या एका विशिष्ट क्रियेबद्दल बोललेलं आहे. अशा वेळेस could वापरू नये – was able to/were able to वापरावे :After five years’ regular exercise, I was able to lift hundred kilos yesterday.

• पण पुढील वाक्य मात्र could वापरून करता येईल :
तरूण असताना मी शंभर किलोपेक्षा जास्त वजन उचलू शकत होतो.
When I was young, I could lift more than hundred kilos.

● मराठीत जेव्हा आपण शकला नाही, शकलो नाही, शकले नाही असं म्हणतो तेव्हा या ‘शकला, शकलो’ साठी could वापरता येईल.
१) तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही.
He could not answer my question.

● (कमी) शक्यता व्यक्त करण्यासाटी could चा उपयोग केला जाऊ शकतो:
१) तो घरी असू शकतो.
He could be at home.
२) काहीही घडू शकतं.
Anything could happen.

● Can चे अधिक नम्र रूप म्हणून (परवानगी घेण्यासाठी अगर विनंती करण्यासाठी) could वापरतात.
१) तू मला १०० रुपये उसने देऊ शकतोस का?
Could you lend me Rs. 100?
२) आम्ही आता जाऊ शकतो का?
Could we go now?
३) मी तुझी पुस्तके वापरू शकतो का?
Could I use your books?
(अशा आणखी उदाहरणांसाठी आज्ञार्थी वाक्ये हे प्रकरण पहा.)

एखाद्याने काय करायला पाहिजे ते (विशेषतः रागाने) सांगण्यासाठी Could वापरले जाऊ शकते:
१) थोडं आनंदी दिसण्याचा तू प्रयत्न तर करू शकतोस.
You could try to look a little happier.
२) तू महिन्यात एकदा तरी स्नान करू शकतोस.
You could take a bath at least once a month.

COULD HAVE

3) COULD HAVE
शकला असता या अर्थाने could have चा उपयोग केला जातो. could have सोबत क्रियापदाचे तिसरे रूप येते.

उदाहरणे :१) तू मला तुझी अडचण का सांगितली नाही? मी तुला मदत करू शकलो असतो.
Why didn’t you tell me your problem? I could have helped you.

केलेला असू शकत नाही असा अर्थ व्यक्त करण्यासाठी can’t have किंवा couldn’t have वापरले जाऊ शकते:. उदा :- १) त्याने हे स्वत: केलेलं असू शकत नाही.
He couldn’t have done this himself.
२) रामः– मला वाटतं तो बसने गेलाय.
शाम:- नाही, तो बसने गेलेला असू शकत नाही – बसेस आज संपावर आहेत.
Ram:- I think he has gone by bus.
Sham :- No, he can’t have gone by bus – buses are on strike today,
३) त्याने तो महागडा पेन विकत घेतलेला असू शकत नाही. त्याने तो चोरला असणार आहे.
He can’t have bought that expensive pen. He must have stolen it.

WILL BE ABLE TO

4) WILL BE ABLE TO
● कर्ता एखादी क्रिया करण्यास योग्य होईल (= करू शकेल) असा अर्थ व्यक्त करण्यासाठी will be able to वापरतात. will be able to सोबत क्रियापदाचे पहिले रूप
येते.
उदाहरणे :
१) तू लवकरच इंग्रजीमधे बोलू शकशील.
You will be able to speak English very soon. २) बाळ काही दिवसांत चांगलं चालायला लागेल (= म्हणजे चालण्यास योग्य होईल/चालू शकेल).
The baby will be able to walk well in a few days.
३) तो इंग्रजीत केव्हा बोलू शकेल?
When will he be able to speak English?
४) तो हे करू शकेल का?
Will he be able to do this?
(वरील दोन प्रश्नार्थी वाक्यांत Will be able to कशा प्रकारे वापरलं गेलं तिकडे लक्ष द्या).

MAY

● 5) MAY
May सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते.

शक्यता व्यक्त करण्यासाठी May वापरतात. जसे,
१) त्याला तुझा पत्ता माहीत असू शकतो/माहीत असण्याची शक्यता आहे/कदाचित माहीत
असेल.
He may know your address.
२) ही चांगली कल्पना असू शकते पण व्यावहारिक नाही.
It may be a good idea but it is not practical.

३) परवानगी देण्यासाठी/घेण्यासाठी सुद्धा may चा उपयोग करतात. जसे,
१) मी आत येऊ का?
May I come in?
२) मी पोहायला जाऊ का आई?
May I go swimming, Mom? ?

परवानगी व्यक्त करण्यासाठी तसं May हे साहाय्यकारी क्रियापद तर आहेच पण बोलण्यात बऱ्याचदा परवानगी घेण्यासाठी व देण्यासाठी can चा उपयोग केला जातो. मात्र औपचारिक सूचनेमधे सहसा can पेक्षा may वापरतात. जसे:
१) दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या हॉलमध्ये जाण्याची परवानगी नाही.
Children under 10 may not go in this hall.
२) वाचक एका वेळेस एकच पुस्तक नेऊ शकतात.
Readers may borrow only one book at one time.

परवानगी घेण्यासाठी may च्या ठिकाणी might सुद्धा वापरता येईल, जसे,
१) मी तुझी सायकल नेऊ का?
Might I take your bicycle?
२) मी एक प्रश्न विचारू का?
Might I ask a question?
(might च्या उपयोगातून बोलणाऱ्याचा थोडा संकोच व्यक्त होतो.)

● (औपचारिक इंग्रजीमधे) may चा उपयोग पुढीलप्रमाणे इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. तेव्हा वाक्याची रचना सहसा May + कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप…! अशी होते.

उदाहरणे :१) परमेश्वर तुला मदत करो!
May God help you!
२) परमेश्वर तुझे संरक्षण करो!
aslidyoman
May God protect you!

● May चा उपयोग जेव्हा शक्यता व्यक्त करण्यासाठी होतो तेव्हा प्रश्नार्थी वाक्याच्या
सुरुवातीला may सहसा वापरत नाहीत. जसे,
तो घरी असण्याची शक्यता आहे का?

● हे वाक्य May he be at home? असे म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा may ऐवजी be
likely to किंवा do you think वापरून बोलतात. जसे, Is he likely to be at home? किंवा Do you think he will be at home?
पण प्रश्नार्थी वाक्यात may पुढे वापरणे शक्य आहे. जसे,
१) तो काय करण्याची शक्यता आहे? What may he do?
२) तो केव्हा येण्याची शक्यता आहे?
When may he come?
तसं इथे सुद्धा may पेक्षा do you think किंवा be likely to च जास्त वापरतात :
1) What do you think he will do? 2) When is he likely to come?

MIGHT

● 6) MIGHT
(कमी) शक्यता व्यक्त करण्यासाठी might वापरतात. might सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते.
१) तो कदाचित भुकेलेला असेल.
He might be hungry.
२) त्याला याबद्दल काही माहिती असू शकते.
He might have some knowledge about this.
३) मला वेळ मिळाला तर मी तिथे जाऊ शकतो.
I might go there if I get time.
४) तो इथे येणं शक्य आहे.
He might come here

MAY HAVE / MIGHT HAVE

7) MAY HAVE / MIGHT HAVE
एखादी क्रिया झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी may have/might
have वापरतात. सोबत क्रियापदाचे तिसरे रूप येते.

● उदाहरणे :१) मला वाटतं त्याने हे केलं असावं.
I think he might have done this.
२) मी कदाचित चुकलो असेन.
I may have been wrong.
३) तो तिथे आतापर्यंत पोहोचला असण्याची शक्यता आहे/पोहोचलेला असू शकतो.
He might have reached there by now.४) त्याने तुझा पत्ता विसरलेला असण्याची शक्यता आहे.
He might have forgotten your address.
५) माझी पिशवी कोणी चोरली असेल?
Who might have stolen my bag?

SHOULD

● 8) SHOULD
● एखादी क्रिया करायला पाहिजे किंवा करायला हवी असा अर्थ व्यक्त करण्यासाठी should वापरतात. should सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते.
● उदाहरणे :
१) मला वाटतं मी आता तुझा निरोप घ्यायला पाहिजे.
I think I should take your leave now.
२) आपण आता निघायला पाहिजे.
We should leave now.
३) तू हे स्वतः करू शकायला पाहिजे. You should be able to do this
yourself. cortoimy
४) तू आता थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे. You should take some rest now.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा