डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती । Dr. Babasaheb Ambdekar Information in Marathi

babasaheb ambedkar information in marathi

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi : डॉ बाबासाहेबभीमराव आंबेडकर यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी :

जन्म :१४ एप्रील १८९१
मृत्यू  :०६ डिसेंबर १९५६
पूर्ण नाव :भीमराव रामजी सकपाळ-आंबेडकर
वडील :रामजी मालोजी सकपाळ
आई :भीमाबाई सपकाळ
पत्नी :  रमाबाई आंबेडकर
जन्मस्थान :महू

डॉ बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) बालपण , शिक्षण

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रील १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील इंदौर शहरावळील “महु’ या गावी झाली. बाबासाहेबांचे पुर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ-आंबेडकर असे होते.
 • बाबासाहेबांचे वडीलांचे पुर्ण नाव रामजी मालोजी सकपाळ व आईचे नाव “भीमाबाई “असे होते.
 • बाबासाहेबांचे बडील हे सैन्यामध्ये “सुभेदार” होते. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील “आंबावडे” हे होते. आंबेडकारांचे आवडते शिक्षक आंबेवडेकर यांच्या नावावरून आंबेडकरांचे आडनाव “सकपाळ’ हुन”आंबेडकर” असे झाले.
 • नोव्हेंबर १८९६ मध्ये आंबेडकरांच्या वडीलांनी आंबेडकरांना वयाच्या ०५ व्या वर्षी सर्वप्रथम “कॅम्प स्कुल, सातारा” येथे प्रवेश घेतला.
 • १९०७ मध्ये मुंबई येथील “एल्फिस्टन हायस्कुल” मधुन आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 • एल्फिस्टन हायस्कुलमध्ये प्रवेश घेणारे ते “पहीले अस्पृश्य विद्यार्थी” होते. पुढे सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना केळुसकर या शिक्षकाच्या मदतीने २५ रुपयांची शिक्षवृत्ती सुरु केली. त्यातुनच आंबेडकरांनी एल्फिस्टन हायस्कुलमध्ये प्रवेश केला…एप्रील १९०८ मध्ये बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकरांच्या रामु उर्फ “रमाबाई” यांच्याशीझाला.
 • १९१३ मध्ये इंग्रजी व पशियन हे विषय घेवुन बाबासाहेब एल्फिस्टन कॉलेज मधुन बी. ए. उत्तीण झाले.
 • जानेवारी १९१३ मध्ये बडोदा संस्थानमध्ये आंबेडकरांनी काहीकाळ नोकरी केली.
 • २ फेब्रुवारी १९१३ रोजी आंबेडकरांचे वडीलांचा मृत्यु झाला.
 • १९१३ मध्ये बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने आबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील “कोलंबिया” विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये प्रवेश केला.
 • १९१५ मध्ये “प्राचीन भारतातील व्यापार” (Trade in Ancient India) हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठामध्ये सादर करुन आंबेडकरांनी M.A. ची पदवी संपादन केली.
 • १९१५ मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये दाखल केलेल्या “द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिकल अॅन्ड अॅनलिटीकल स्टडी” था प्रबंधादल १९१७ मध्ये आंबेडकरांना Ph.D. ही पदवी मिळाली.
 • १९१६ मध्ये आंबेडकरांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला. दरम्यान शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने आंबेडकर भारतात परत आले. याच वर्षी नोव्हेंबर १९१६ मध्ये जर्मनीतील “ग्रेज इन” विद्यापीठात बोरस्टरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला व याच कॉलेज मधुन १९२३ साली आंबेडकर यांना “बॅरिस्टर’ ही पदवी मिळाली.
 • बॅरिस्टर पदवीचा अभ्यासपुर्ण करण्याकरीता ०८ वर्षे एवढा कालावधी लागत असे परंतु हा अभ्यासक्रम आंबेडकरांनी ०२ वर्ष व काहींमहीन्यातच पूर्ण केला.
 • १९१७ मध्ये भारतात परत आल्यावर आंबेडकरांनी बडोदा संस्थान मध्ये “मिलिटरी सेक्रेटरी’ या पदावर नोकरी करण्यास सुरुवात केली.
 • परंतु तेथे अस्पृश्यतेबडल काही बाईट अनुभव आल्याने त्यांनी ती नोकरी सोडुन दिली व आंबेडकर हे मुंबई येथे येवुन मुंबईमधील “बर्स कॉलेज” मध्ये अर्थशास्त्र, बँकिंग ब कायदा हा विषय शिकवु लागले.
 • १९१८ मध्ये मुंबई मधील “सिडनेहेम कॉमर्स कॉलेज मध्ये आंबेडकर हंगामी प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. या कॉलेजमध्ये आंबेडकर अर्थशास्त्र हा विषय शिकवत होते.
 • १९१९ मध्ये ब्रिटीश शासनाने मताधिकाराची चौकशी करण्याकरीता नेमलेल्या “साऊथ ब्युरो कमिशन” पुढे डॉ. आंबेडकरांनी साक्ष दिली.
 • जानेवारी १९२० मध्ये राजर्षी शाहु महाराज यांच्या सहाय्यामुळे आंबेडकरांनी “मुकनायक” हे पाक्षीक सुरु केले.
 • मुकनायक या वृत्तपत्राचे प्रकाशक डॉ. आंबेडकर हे होते तर संपादक “देवराम विष्णु नाईक” हे होते व या पाक्षीकाच्या शिर्षक स्थानी “संत तुकाराम महाराजांची वचने’ होती.
 • (बहिष्कृत भारत – १९२७ या बृन्पत्रचे शिर्षक स्थानी सल ज्ञानेश्वराची वचन होती। 0 सप्टेंबर १९२० मध्ये आंबेडकर पुढील शिक्षणाकरीता इंग्लंड करीता रवाना झाले.
 • डॉ. आंबेडकर यांना इंग्लंड येथे जाण्याकरीता राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक साहाय्य केले.
 • १९२१ मध्ये इंग्लंड मधील लंडन विद्यापीठाची M.S.C. ही पदवी त्याना प्राप्त झाली

बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल महत्वाचे :- ( Important )

 • १९२२ मध्ये “पॉब्लेम ऑफ रुपी’ हा अर्थशास्त्रावरील महत्वपूर्ण ग्रंथ लिहील्यामुळे लंडन विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांना D.S.C. ही पदवी बहाल केली.
 • १९२४ मध्ये भारतामध्ये परतल्यावर आंबेडकरांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकीली केली.
 • या पुढील काळामध्ये अस्पृश्यता निवारण हे आंबेडकरांनी आपले जिवीतकार्य मानले.
 • २० ते २१ मार्च १९२० या कालावधीत कोल्हापुर संस्थान मधील “माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या परीषदेचे डॉ. बाबासाहेब हे अध्यक्ष होते. या परीषदेमध्येच आंबेडकरानी पहीले भाषण केले. या परीषदेचे प्रमुख पाहुणे राजर्षी शाहु महाराजांनी “डॉ. आंबेडकरांच्या रुपाने तूमहाला मोठा दलित नेता मिळाला आहे.” असे गौरव उद्गार काढले.
 • २० जुलै १९२४ रोजी आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांमध्ये नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती करणे या उद्देशाने “बहिष्कृत हितकारणी सभा” या संस्थेची स्थापना केली. या कालावधील डॉ. आंबेडकरांनी “बहिष्कृत मेळा” हे वृत्तपत्र सुरु केले. या सभेचे बीदवाक्य “शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा” हे होते.
 • १९२५ मध्ये आबेडकरांनी अस्पृश्य मुलांसाठी “पहीले मोफत वस्तीगृह” काढले.
 • महत्वाचे :- सन १९२६ ते १९३६ दरम्यान डॉ. आंबेडकर हे ब्रिटीश शासनाच्या मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते.
 • १९ ते २० मार्च १९२७ या कालावधील रायगड जिल्हयातील “महाड‘ येथे बहिष्कृत हितकारणी सभेचे पहीले अधिवेशन डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
 • २० मार्च १९२७ रोजी आंबेडकरांनी अनुयायांसह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन अस्पृश्यतेविरद्ध पहिला सत्याग्रह केला. हा सत्याग्रह म्हणजे आंबेडकरांचा “अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला लढा” होय. याच काळामध्ये आंबेडकरांनी
 • “आंबेडकर सेवा दल” ची स्थापना केली. पुढे या संस्थेचे नाब “समता सैनिक दल” असे करण्यात आले.
 • महाडच्या सत्याग्रह नंबर ०३ एप्रिल १९२७ रोजी डॉ.आंबेडकारांनी “बहिष्कृत भारत” हे पाक्षीक सुरु केली.
 • या पाक्षीकाच्या शिर्षक स्थानी संत ज्ञानेश्वर यांची वचने होती. याच पाक्षीकातुन पुनश्च हरिओम हा प्रसिद्ध अग्रलेख डॉ.आंबेडकरांनी लिहीला. । बहिष्कृत भारत हा ग्रंथ वि. रा. शिंदे यांनी लिहीला) (मूकनायक- १९२० या वृतपशाचे शि्षक स्थानी सं गुकाराम महाराजांची बचने होती)
 • १९२७ मध्ये आबेडकरानी “समता संघ” ची स्थापना केली. या संघामार्फत १९२८ मध्ये “समता व १९३० मध्ये “जनता” ही वृत्तपत्रे सुरु केली.
 • १९५६ मध्ये “जनता” या वृत्तपत्राचे नामकरण “प्रबुद्ध भारत“असे करण्यात आले.
 • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “भारतभुषण प्रिंटींग प्रेस’ या नावाने “मुद्रणालय” सुरु केले.
 • याच कालावधील डॉ पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती येथील “अंबा माता देवी मंदिर” प्रवेश सत्याग्रहास डॉ.आंबेडकर यांनी पाठीबा दिला होता.
 • डॉ.आबेडकर हे १९२७ मध्ये सोलापूर येथील जिल्हा वतनदार महार परीषद च्या ०२ च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
 • २५ डिसेंबर १९२७ रोजी रायगड मधील महाड येथे आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा व विषमतेचा पुरस्कार करणा-या “मनुस्मृती’ या हिंदु अथांचे “दहन” केले. सदरचे दहन हे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण सहकान्याच्या हस्ते केले.
 • २३ ऑक्टोबर १९२८ रोजी डॉ. आंबेडकरांनी पुणे येथे “सायमन कमिशन” समोर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणुन साक्ष दिली व वयात आलेल्या सर्व स्त्री, पुरुषांना मताधिकार मिळावा अशी मागणी केली.
 • १९३० मध्ये ब्रिटीश सरकारने नेमलेल्या स्टार्ट कमिटीवर सभासद म्हणुन आंबेडकरांची नेमणुक करण्यात आली होती.
 • देशामध्ये अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंदी होती. मंदिर प्रवेश करुन मंदिर भ्रष्ट होत नाही किंवा मुर्ती अपवित्र होत नाही हे सिद्ध आंबेडकरांना सिद्ध करायचे होते. त्या अनुशंगाने १९२९ मध्ये पुण्यातील “पर्वती” येथील मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणुन डॉ आंबेडकरांनी (एस. एम. जोशी यांच्या मदतीने) पहिला सत्याग्रह केला…
 • ०२ मार्च १९३० रोजी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील “काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह” आंबेडकरांनी केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ.आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांच्याकडे दिले. पुढे १९३५ मध्ये हे काळाराम मंदीर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले.
 • सन १९३० ते १९३२ दरम्यान मध्ये इंग्लंड येथे भरविण्यात आलेल्या तीनही गोलमेज परीषदेस अस्पृश्यांचे प्रतिनीधी म्हणुन डॉ. बाबासाहेब आबेडकर उपस्थित होते. यावेळी आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघांची व दलितांना ” प्रोटेस्ट ” चा दर्जा मिळावा अशी मागणी ब्रिटीश शासनकडे केली होती, गोलमेज परीषदेमध्ये आंबेडकरांनी केली. त्याअनुशंगाने रॅमसेमेकडॉनल्ड यांनी १९३२ मध्ये जाहीर केलेल्या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ ठेवण्यात आले होते. ब्रिटीश शासनाचा अस्पृश्यांना हिंदु मधुन अलग करण्याचा ब्रिटीश सरकारचा डाव लक्षात घेवुन………
 • २० सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी यांनी पुणे येथील येरवडा जेल मध्ये प्राणतिक उपोषण सुरु केले.
 • २४ सप्टेबर १९३२ रोजी गांधीजींचे प्राण वाचविण्याकरीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींसह पुणे येथील येरवडा तुरुंगामध्ये महत्वपुर्ण करार केला. या करारान्वये दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्याऐवजी १४८ राखीव जागांचा संयुक्त मतदार संघ देण्याची अट आबेडकरांनी मान्य केली. याच करारास “पुणे करार” किंवा “येरवडा करार” किंवा “ऐक्य करार” असे म्हणतात.

डॉ.आंबेडकारांची ग्रंथ संपदा :

१.रानडे. गांधी अॅन्ड जीना – १९४३

२.हॉट काँग्रेस एंड गांधी हव डन टु द अनटचेबलस्-१९४५

३. दि अनटचेबल्स – १९४६

४. थॉट्स ऑन पाकिस्तान – १९४८

५. द प्रॉब्लेम ऑफ रूपी

६. हु वेअर शुद्राज

७. कास्ट इन इंडिया

८. बुद्ध अन्ड हिज धम्पाजू (मरणोतर प्रकाशित-१९५७)

९. रिडल्स इन हिंदुजम

१०. कास्ट इन इंडिया-प्रबंध

११. द राईज एण्ड फॉल ऑफ हिंदु वूमेन

१२. हु आर दे अन्ड व्हाय दे बिकम अनटचेबल्स

१३.एनिहिलेशन ऑफ कास्ट

आंबेडकरांना मिळालेले बहुमान :

 • ०५ जानेवारी १९५२ रोजी अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांना न्युयॉर्क येथे खास समारंभामध्ये L.L.D. ही पदवी बहाल केली.
 • १९५३ मध्ये हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने L.L.D. ही पदवी बहाल केली.
 • “आंबेडकर व फुले हे एका अर्थाने द्वंद्व समास आहेत” असे उद्गार डॉ. भालचंद्र फडके यांनी काढले.
 • १४ एप्रील १९९० रोजी आबेडकरांच्या जन्मशताब्दी दिनानिमीत्त भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च बहुमान “भारतरत्न” ने सन्मानित केले तसेच १९९०-१९९१ हे आबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष भारतामध्ये “सामाजिक न्याय वर्ष’ म्हणुन साजरे करण्यात आले.
 • १९९१ मध्ये डॉ आंबेडकर यांच्या स्मरणार्थ ” चवदार तळे सत्याग्रह” वित्र असलेले पोस्ट तिकीट प्रकाशित करण्यात आले.
 • २००७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्य नावाने चेन्नई येथे “विधी विद्यापीठ’ सुरु करण्यात आले आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य – Babasaheb Ambedkar Works in Marathi

 • इ. स. १९२० मध्ये ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र त्यांनी सुरू करून अस्पृश्यांच्या सामाजिक व राजकीय लढ्याचा प्रारंभ केला.
 • इ.स. १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदे मध्ये त्यांनी सहभाग घेतला.
 • इ.स. १९२४ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ ची स्थापना केली.
 • दलितांमध्ये जागृती घडवून आणणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते..
 • इ. स. १९२७ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ या नावाचे पाक्षिक सुरू केले.
 • इ.स. १९२७ मध्ये महाड येथे चवदार पाण्याचा सत्याग्रह केला आणि महाड यथाल तळे अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठा त्याना खुल करून दिल..
 • इ. स. १९२७ मध्ये जातिसंस्थेला मान्यता देणाऱ्या ‘मनुस्मृती’ चे त्यांनी दहन केले.
 • इ.स. १९२८ मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.
 • इ.स. १९३० मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देन्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला.
 • इ. स. १९३० ते १९३२ च्या दरम्यान इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदाना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी त्या अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. इ. स. १९३२ मध्ये झलक पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी ‘जातीय निवाडा’ जाहीर करून आंबेडकराची वरील मागणी मान्य केली.
 • जातीय निवाड्यास महात्मा गांधींचा विरोध होता. स्वतंत्र मतदार संघाच्या निर्मितीमुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे जातीय निवाड्यातील या तरतुदीच्या विरोधार गांधीजींनी येरवडा (पुणे) तुरुंगात प्राणांतिक उपोषण आरंभिले. त्यानुसार महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात २५ डिसेंबर १९३२ रोजी करार झाला. हा करार ‘पुणे करार’ या नावाने ओळखला जातो. या करारान्वये डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला व अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात राखीव जागा असाव्यात, असे उभयपक्षी मान्य करण्यात आले.
 • इ.स. १९३५ मध्ये डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचन म्हणून नियुक्ती झाली.
 • इ. स. १९३५ मध्येच डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता मान्य करण्याच्या हिंदू धर्माचा त्याग केला.
 • इ.स. १९३६ मध्ये सामाजिक सुधारणांसाठी राजकीय आधार असावा यासाठी त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला.
 • इ. स १९४२ मध्ये ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’ या नावाचा पक्ष स्थापन केला.
 • इ.स. १९४२ ते १९४६ पर्यंतच्या काळात त्यांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात ‘मजूरमंत्री’ म्हणून कार्य केले.
 • इ. स. १९४६ मध्ये ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली.

तुम्ही वाचली आहे Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar information in Marathi.

Similar Posts