BE ,HAVE Use in Marathi

● BE आणि HAVE

Be आणि Have हे इंग्रजीतील खूप उपयोगाचे शब्द आहेत. हे शब्द साहाय्यकारी क्रियापदही आहेत व मुख्य क्रियापद सुद्धा. Be आणि Have हे शब्द आपण आत्तापर्यंत साहाय्यकारी क्रियापद म्हणून भरपूर वाक्यांमधे वापरलेले आहेत.

● Be चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग

Be चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग
Be चा मराठीत अर्थ असणे असा होतो.

Be ची रूपे लक्षात घेण्यासाठी पुढील वाक्ये पहा:
१) मी आनंदी आहे. = I am happy.
२) तो आनंदी आहे .= He is happy
३) आम्ही आनंदी आहोत. = We are happy.
४) ती आनंदी होती. = She was happy.
५) ते आनंदी होते. = They were happy.
६) मी आनंदी असेन. = I will be happy.

• वरील इंग्रजीच्या वाक्यांत ठळक छापलेले शब्द be ची रूपे आहेत. यांचे मराठी अर्थ सुद्धा ठळक केलेले आहेत.

ज्याप्रमाणे इंग्रजीत am/is / are, was / were, will be ही be ची रूपे आहेत तसं मराठीत आहे, होता, असेल ही असणे ची रूपे आहेत.

Be चा अर्थ होणे असा पण होतो. म्हणून I was happy चा अर्थ मी आनंदी झालो, I will be happy चा अर्थ मी आनंदी होईन असाही होऊ शकतो.

Be चा उपयोग साहाय्यकारी क्रियापदासोबत सुद्धा होतो. जसे,

१) You should be happy. .
तू आनंदी व्हायला/असायला पाहिजे,
२) He may be at home.
तो घरी असू शकतो.
3) You should have been happy. .
तू आनंदी व्हायला पाहिजे होतं.
(have नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येते. म्हणून या वाक्यात be चे तिसरे रूप been आले)
४) God must be one. .
परमेश्वर एकच असायला पाहिजे.
५) He can be late.
त्याला उशीर होऊ शकतो.

BE ,HAVE Use in Marathi

● आता पुढची वाक्ये पहा:
तो थकलेला आहे / तो तहानलेला आहे / माझं पोट भरलेलं आहे.

दिसायला या वाक्यांच्या शेवटी सुद्धा ‘लं आहे’ दिसत आहे पण आधीच्या वाक्यांप्रमाणे ही वाक्ये क्रिया केली आहे’ असा अर्थ व्यक्त करत नाहीत. या वाक्यांमधे ज्या शब्दांच्या शेवटी ‘ दिसत आहे ते शब्द (म्हणजे ‘थकलेला, तहानलेला, आणि भरलेला’) विशेषण आहेत.
अशा वेळेस ‘आहे’ साठी इंग्रजीमधे be ची am, is, are ही वर्तमानकाळाची रूपे येतील. मग वरची वाक्ये इंग्रजीत कशी होतील पहा:

• तो थकलेला आहे.
He is tired.
• तो तहानलेला आहे.
He is thirsty.
• माझं पोट भरलेलं आहे.
My stomach is full.

● याचप्रमाणे मी लिहिलं होतं/वाचलं होतं/आलो होतो/गेलो होतो’ या वाक्यांमध्ये क्रिया केली होती असा अर्थ आहे. म्हणून ही वाक्ये पूर्ण भूतकाळाची आहेत. इंग्रजीमधे ही वाक्ये । had written / I had read / I had come / I had gone अशी होतील. आता खालच्या वाक्यांमधे पण दिसायला शेवटी ‘लं होतं’ दिसत असलं तरी त्यांचा वेगळेपणा अगदी स्पष्ट आहे.अशा वेळेस होता’ साठी be ची was / were ही भूतकाळाची रूपे येतील. पहा: तो थकलेला होता.
He was tired. .
तो तहानलेला होता.
He was thirsty.
त्याचं पोट भरलेलं होतं.
His stomach was full

Be चा अर्थ होणे असा असल्यामुळे was / were चा अर्थ झालो/झाला असाही होतो असं आपण आधीच पाहिलं. याचीच आणखी उदाहरणे पहा:

१) मी आश्चर्यचकित झालो.
I was surprised. .
२) मी प्रोत्साहित झालो.
I was encouraged.
३) तो भयभीत झाला.
He was frightened.
४) तो आम्हाला भेटून आनंदित झाला.
He was pleased to meet us.
२) ते ही बातमी ऐकून अत्यानंदित झाले.
They were overjoyed to hear this news.

Be चा उपयोग जाऊन येणे आणि येऊन जाणे या अर्थाने सुद्धा करता येतो.
उदा: I have been to market.
मी बाजारात जाऊन आलो आहे.
The doctor has just been here.
डॉक्टर साहेब आत्ताच इथे येऊन गेले आहेत.

जाणे/भेट देणे या अर्थाने सुद्धा be वापरले जाऊ शकते.
उदा. Have you ever been to France? ?
तू फ्रान्सला कधी गेलेला आहेस का/भेट दिली आहे का?

● HAVE चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग

HAVE चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग
मुख्य क्रियापद म्हणून have चा उपयोग बऱ्याच वेगवेगळ्या अर्थाने होतो. त्यापैकी have चा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे जवळ असणे. कुठलीही गोष्ट आपल्या जवळ आहे असे म्हणण्यासाठी आपण have वापरतो.

● पण मराठीत जवळ आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळेस जवळ हा शब्द येतोच असे नाही. जसं मराठीत माझ्याजवळ अनुभव आहे. हे वाक्य आपण माझ्याकडे अनुभव आहे किंवा मला अनुभव आहे असेही म्हणू शकतो. म्हणून वर आपण have चा अर्थ जवळ असणे असा पाहिलेला असला तरी have चे अर्थकडे असणे/ला असणे/चा असणे/मधे असणे असेही निघतात ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

have चे आणखी दुसरे अर्थ आपण पुरेशा उदाहरणांच्या साहाय्याने पुढे पाहणारच आहोत. त्याआधी have च्या ‘जवळ असणे’ या अर्थाबद्दल एक माहिती:-

या अर्थाने have च्या ठिकाणी इंग्रजीमधे have got सुद्धा वापरतात. जसे,
१) मला तीन भाऊ आहेत.
I have three brothers / I have got three brothers.

२) त्याला अनुभव आहे.
He has experience / He has got experience.

३) माझ्याकडे कार होती.
I had a car.
(इथे – म्हणजे भूतकाळात had got वापरले जात नाही.)

• पण भूतकाळाच्या प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्यात had got वापरणे शक्य आहे.
जसे, Had you got a car? | got a car.
• उदाहरणे :
१) मला खूप मित्र आहेत.
I have (got) many friends.
२) मला खूप मित्र होते.
I had many friends.
३) माझ्याजवळ पन्नास रुपये आहेत. I have (got) fifty rupees.
४) त्यांना एक मुलगा आहे, बारा वर्षांचा. They have got) one son, aged 12.
५) त्याचे लांब केस आहेत.
He has (got) long hair.
६) त्याचं मुंबईत हॉटेल आहे.
He has (got) a hotel in Mumbai.
७) कारला चार चाकं असतात.
A car has four wheels.
८) आमच्या शाळेला आज सुट्टी आहे.
Our school has a holiday today.
९) या पुस्तकात चारशेपेक्षा जास्त पानं आहेत .
This book has more than four hundred pages.

• have च्या अशा वाक्यांचे प्रश्नार्थी आणि नकारार्थी खालीलप्रमाणे do/ does ही साहाय्यकारी क्रियापदे वापरून किंवा न वापरता केले जाऊ शकते.