भारतातील वन्य प्राणीविषयी माहिती : Bhartatil Vanya Pranichi Mahiti

भारतातील वन्य प्राणीविषयी माहिती : Bhartatil Vanya Pranichi Mahiti

भारतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ,पक्षी आढळून येतात.त्यांच्याविषयी आपण आज माहिती बगणार आहोत.त्याचबरोबर विविध राज्याचे राज्यपक्षी आणि राज्यप्राणी यांची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत.

प्राणीजातींचे आसाम हे आश्रयस्थान आहे.भारतीय पक्ष्यांच्या सर्वाधिक जाती आसाममध्ये आढळतात.

पंजाबचा राज्यपक्षी हा बाझ (गरूड) आहे ,तशेच पंजाबचा राज्यप्राणी काळवीट (ब्लॅकबॅक) हा आहे.

आसामचा राज्यपक्षी हा पांढऱ्या पंखांचे कश्त बदक आहे.

बिलीगीरी रांगा ही मुक्त मैदाने असून भारतातील जंगली हत्तींचे हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे वसतिस्थान आहे.

पूर्व घाट हे आशियाई हत्तींचे जगातील सर्वात मोठे निवासस्थान आहे.

हिमालयात ‘याक’ हा प्राणी दूध व मांसोत्पादनासाठी तसेच ओझी वाहण्यासाठी पाळला जातो. याक चे दूध गुलाबी रंगाचे असते.

हिमालयात पूर्वेकडे मॅगपाय व गाणारी कस्तुरी हे प्रमुख पक्षी आढळतात.

राजस्थानमधील मेंढीच्या जाती : चोकला, मारवाडी, मालपुरी, पुंगल आहेत ,तर शेळीच्या जाती : लोही या आहेत.

‘चोकला’ या संकरित मेंढीपासून सर्वोत्तम प्रतीची लोकर मिळते.

राजस्थानमधील सुरतगढ व बिकानेर येथे ‘मेरिनो’ या मेंढीची पैदासकेंद्रे आहेत.

राजस्थानच्या वाळवंटी मैदानात सुमारे १४० जातीच्या निवासी व स्थलांतरित पक्षांचा अधिवास आहे.

भारतीय रानकोंबडा हा राजस्थान वाळवंटातील निवासी पक्षी असून येथेच त्याची पैदास होते.

राजस्थानच्या मैदानातील अन्य पक्षी : खरुची, गिधाड, गरूड, बहिरी ससाणा, मोर.

राजस्थानच्या वाळवंटातील प्राणी : लाल कोल्हा, जंगली मांजर, उंट उंटाच्या जाती : बिकानेरी व जैसलमेरी.

राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात कांकरेज, नागौरी, थरपारकर, राठी या बैलांच्या उत्तम जाती आढळतात.

गंगेच्या त्रिभूज प्रदेशात खंड्या, गरूड, सुतारपक्षी आढळतात.सुंदरबनात ‘चितळ’ मोठ्या संख्येने आढळतात.

गंगा त्रिभूज प्रदेशातील मासे नदीतील डॉल्फीन व समुद्री डॉल्फीन आहे.

भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध काझीरंगा या आसाममधील राष्ट्रीय उद्यानास जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

आसाम खोऱ्यातील प्राणीजीवन : सोनेरी लंगूर, कश्त बदक, बंगाल तणमोर, पिग्मी हॉग या धोक्यात असलेल्या प्राणिजातीचे आसाम हे आश्रयस्थान आहे.

जगात सर्वाधिक पानम्हशी आसाममध्ये आढळतात.आसाममध्ये ऑर्कीड पक्षी प्रसिद्ध आहे.

वाघ, हत्ती व गिबन हे आसाममधील अन्य प्राणी आहेत.वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी आढळणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.

द्वीपकल्पातील मध्यवर्ती उच्चभूमीतील प्राणीजीवन :प्राणी : आशियाई हत्ती, चार शिंगी सांबर, रानटी कुत्रा, चिंकारा. पक्षी : सारंग, धनेश (इंडिनय ग्रे हॉर्नबील).

दख्खन पठारावरील जंगलातील शेकरू’ खारीचे अस्तित्व धोक्यात आले असून ती महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे.

ट्यूना, शार्क, कोळंबी, कालवे हे लक्षद्वीप किनाऱ्यावरील मासे आहेत.

ट्यूना या माशाचे लोणचे चविष्ट असून त्याची निर्यात केली जाते.

प. बंगालमधील सुंदरबनात वाघ आढळतात. लक्षद्वीप हा स्वतंत्र परिस्थितिकी प्रदेश असून तेथे जिवंत प्रवाळे, तलवार मासे, डॉल्फीन मासे आढळता.

प. बंगाल व आसाममध्ये एकशिंगी गेंडा आढळतो.सौराष्ट्रातील जुनागड-गीरच्या जंगलात सिंह आढळतात.

उंट हा प्राणी पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा काळात स्वत:चे सुमारे २७ टक्के वजन कमी करतो आणि पाणी प्यायल्यानंतर दहा मिनीटात पुन्हा तितकेच वजन वाढवू शकतो!

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा