Bipin Chandra Pal Info Marathi – बिपीनचंद्र पाल मराठी माहिती

Bipin Chandra Pal Full Information in Marathi. बिपीनचंद्र रामचंद्र पाल यांनी आपले संपूर्ण जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलं होतं. देशाला स्वतंत्र  मिळवून देण्यासाठी त्यांनी देशातील जनतेच्या मनात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी करण्याची महत्वाची भूमिका बजावली.

  • जन्म :७ नोव्हेंबर १८५८.
  • मृत्यू : २० मे १९३२
  • पूर्ण नाव : बिपीनचंद्र रामचंद्र पाल.
  • वडील :रामचंद्र
  • जन्मस्थान : सिल्हेट जवळ खेडेगावात
  • शिक्षण:  मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर समाजसुधारणांकडे वाटचाल.
  • विवाह : दोन वेळा पहिली पत्नी वारल्यानंतर विधवेशी पुनर्विवाह

बिपीनचंद्र रामचंद्र पाल. : (७ नोव्हेंबर १८५८–२० मे १९३२ )

स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळेला त्यांनी अनेक प्रभावशाली नेत्यानं सोबत काम केलं होतं.

भारताच्या इतिहासातील एक महान क्रांतिकारक तसचं, ‘क्रांतिकारी विचारांचे जनक’ म्हणून बिपिनचंद्र पाल यांचे नाव घेतले जाते.

ते राष्ट्रीय नेत्याबारोर एक शूरवीर क्रांतिकारी आणि इतिहासातील प्रसिद्ध असणाऱ्या त्रिमुर्तींपैकी “लाल-बाल-पाल” मधील एक होतं. ही त्रिमूर्ती म्हणजेच लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या राष्ट्रीय नेत्यांच्या जोडी होय.

लोकमान्य टिळक, लाला लजपतराय जहाल नेत्यांनी समवेत त्यांनी या फाळणीस तीव्र विरोध केला. देशभर जागृती केली.

ब्रिटिश सरकारविरुद्ध सर्व देशभर आंदोलन सुरू झाले. यातूनच भारतीय राजकारणात लाल- बाल – पाल ही त्रिमूर्ती उदयास आली.

इ. स.१९०७ च्या ऑक्टोबर महिन्यात अरविंद घोषांविरुद्ध जो राजद्रोहाचा खटला चालला होता, त्यात न्यायालयाने बिपीनचंद्रांना साक्षीकरिता बोलावीले असता त्यांनी स्वाभिमानपूर्वक नकार दिला.

तेव्हा न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून त्यांना सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली तसेच याच वर्षी ‘वंदे मातरम्’ च्या संपादनाचे कार्य त्यांनी केले.

“स्वदेशी आंदोलनात” त्यांनी भागच नाही घेतला तर,  संपूर्ण देशभर ते पसरविण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

या आंदोलना दरम्यान त्यांनी देशातील नागरिकांना फक्त देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूच वापरायचा संदेश दिला.

तसेच, इंग्लंडमध्ये उत्पादित मालाचा त्यांनी बहिष्कार केला होता.

बिपिनचंद्र पाल यांनी मॅनचेस्टरच्या गिरण्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या कपड्यांचा पूर्णपणे बहिष्कार करून औद्योगिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या ठिकाणी संप करून इंग्रज सरकारची झोप उडवून टाकली होती.

कार्य

वयाच्या १६ व्या वर्षी बिपीनचंद्रांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला. इ. स. १८७६ मध्ये शिवनाथ शास्त्रीनी पाल यांना ब्राह्मो समाजाची दीक्षा दिली. मूर्तीपूजा न मानणान्या ब्राह्मो समाजाचे अनुयायी होणे म्हणजे अर्धे खिश्चन होणे, असे जुन्या विचारांचे लोक समजत. ही सर्व माहिती रामचंद्र पाल यांना कळली, ते चिडले.त्यांनी मुलाशी संबंध तोडले. ब्राह्मो समाजाचे काम ते अत्यंत निष्ठेने करीत असत.

कटक, म्हैसूर व सिल्हेट या ठिकाणी त्यांनी शिक्षकाची नोकरी केली होती.

भारतीय समाजाची प्रगती शिक्षणामुळे होईल, असे त्यांचे मत होते.

इ. स. १८८० मध्ये बिपीनचंद्रांनी सिल्हेट या ठिकाणी ‘परिदर्शक’ या नावाचे बंगाली वृत्तपत्र प्रकाशित केले. तसेच कलकत्ता येथे आल्यावर त्यांना तेथील ‘बंगाल पब्लिक ओपिनियन’ च्या संपादक मंडळात घेण्यात आले.

इ. स. १८८७ मध्ये बिपीनचंद्रांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनात ला पहिल्यांदा भाग घेतला. ‘शस्त्र बंदी कायद्याविरुद्ध’ त्या ठिकाणी भापण उत्तेजनापूर्ण आणि प्रेरक ठरले.

इ. स. १८८७-८८ मध्ये त्यांनी लाहोरच्या ‘ट्रिब्यून’ चे संपादन केले.

इ.स. १९०० मध्ये बिपिनचंद्र पाल पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे असलेल्या भारतीयांसाठी ‘स्वराज्य’ नावाचे मासिक त्यांनी काढले.

इ.स. १९०१ ला इंग्लंडहून आल्यानंतर कलकत्त्याहून ते ‘न्यू इंडिया नावाचे इंग्रजी साप्ताहिक चालवू लागले.

इ. स.१९०५ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

बिपीनचंद्र पाल विविध वृत्तपत्रांतून जहाल लेख लिहीत असत. त्यांच्या ब्रिटिशविरोधी लेखनामुळे सरकार त्यांना हद्दपार करण्याच्या विचारात होते पण त्याना १९०८ ते १९११ पर्यंत स्वतःच हदपारी पत्करली व ते इंग्लंड मध्य जाऊन राहिले

इ. स. १९१६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या होमरूल लीग शिष्टमंडळाबरावरत विलायतेस गेले होते.

जेव्हा भारतीय राजकारणाची सुत्र म. गांधींच्या हाती आली. त्या वेळेपासून बिपिनचंद्रांचा भारतीय राजकारणाशी संबंध हळूहळू कमी होत गेला. त्यांनी १९२१ मध्ये काँग्रेसचा त्याग केलाविशेषता.

ग्रंथसंपदा

भारतीय राष्ट्रवाद.

विशेषता

लाल-बाल-पाल या त्रिमूर्ति पैकी एक.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा