गटविकास अधिकारी मराठी माहिती : BDO(Block Development Officer) Information in Marathi

गटविकास अधिकारी मराठी माहिती : BDO(Block Development Officer) Information in Marathi

गटविकास अधिकारी मराठी माहिती : गटविकास अधिकारी (Block Development Officer) हा शासनाच्या ग्रामविकास खात्याचा अधिकारी असून त्याच्यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे (CEO) असते. गटविकास अधिकारी हा राज्यशासन व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांमधील दुवा आहे.

• याशिवाय गटविकास अधिकारी पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा तसेच पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

• गटविकास अधिकारी (Block Development Officer) यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) होते.तशेच त्यांची नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते.

•गटविकास अधिकारी (Block Development Officer) हा  वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.त्यामुळे पंचायत समितीच्या वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करतो.

• महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम (९७) नुसार प्रत्येक पंचायत समितीसाठी BDO ची तरतूद आहे.

गटविकास अधिकाऱ्यांची(Block Development Officer) कार्ये


• तो पंचायत समितीचा सचिव असल्याने सर्व कागदपत्रे त्याच्या ताब्यात असतात. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी या नात्याने विकासकामांची अंमलबजावणी करणे.

• गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या सभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहितो.

• पंचायत समितीच्या अनुदानांमधून रकमा काढणे व त्यांचे वाटप करणे.

• विकास कार्याव्यतिरिक्त शासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीसाठी मालमत्ता ताब्यात घेणे वा पंचायत
समितीच्या मालमत्तेची विक्री करणे.

• विस्तार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे. पंचायत समितीच्या कार्याचा अहवाल वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास कळविणे.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा