इंग्रज -फ्रेंच संघर्ष

इंग्रज -फ्रेंच संघर्ष : या मध्ये आपण इंग्रज -फ्रेंच संघर्ष या बद्दल तशेच त्या मध्ये झालेले 3 कर्नाटक युद्धे आणि त्याचे कारण व परिणाम बगणार आहोत.

◆ इंग्रज -फ्रेंच संघर्ष

इंग्रज -फ्रेंच संघर्ष : १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी पोर्तुगीज व डचांना व्यापारी स्पर्धेत मागे टाकले. मात्र भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात अटीतटीची स्पर्धा निर्माण झाली.

● दक्षिण भारतात पूर्व किनाऱ्यावरील मद्रास हे इंग्रजांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते, तर त्याच्या नजीक असलेले पाँडिचेरी हे फ्रेंचांचे केंद्र होते. हा सर्व प्रदेश कर्नाटक राज्याच्या (राजधानी अरकॉट) हद्दीत होता व त्यावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता इंग्रजांनी होती.

●१८ व्या शतकाच्या मध्यावर फ्रेंच व इंग्रज यांना कर्नाटक व कर्नाटकचा हैद्राबादचा निझाम यांच्या अंतर्गत राजकीय भांडणात हस्तक्षेप करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या. या हस्तक्षेपाचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते: नवाबपद/निझामपद मिळवण्यास उत्सुक
असणाऱ्या स्पर्धकाला फ्रेंचांनी लष्करी मदतीचे आश्वासन दिले. त्यामुळे नवाबपदाच्या/निझामपदाच्या खऱ्या दावेदाराला इंग्रजांनी मदतीचे आश्वासन दिले. स्पर्धकाला आश्वासन देऊन या राज्यांच्या राजकारणात प्रवेश मिळवण्याची खरी कल्पना
फ्रेंच गव्हर्नर डुप्ले (Dupleix) याची होती व त्याचा प्रत्यक्ष वापर ही त्याने प्रथम केला. पुढे ब्रिटिशांना या पद्धतीचा खूप वापर केला.

● या स्पर्धेतून सन १७४४ ते १७६३ दरम्यान इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. ही युद्धे कर्नाटक युद्धे’ (Carnatic Wars) म्हणून ओळखली जातात. अर्थात, यांपैकी पहिले व तिसरे युद्ध इंग्रज व फ्रेंचांमधील युरोपातील युद्धाचा भारतातील विस्तार
होता. (इंग्लंड व फ्रान्स हे युरोपच्या इतिहासात परस्परांचे जुने वैरी होते. युरोपात या दोन देशांत युद्ध सुरू झाले की त्याचे पडसाद भारतातही पडायचे व युरोपात युद्धबंदी झाली की भारतातही होत असे.)

पहिले कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)

कारण:

● युरोपात इंग्लंड व फ्रान्स यांच्यादरम्यान ‘ऑस्ट्रीयन वारसा हक मक्तेदारी युद्ध’ (Austrian War of Succession) सुरू झाल्यामुळे निर्माण भारतातही इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध सुरू झाले.

महत्त्वाच्या घटनाः

● १७४५ मध्ये ब्रिटिश नौदलाने फ्रेंचाची जहाजे ताब्यात घेतली.त्यामुळे फ्रेंच गर्व्हनर डुप्ले याने १७४६ मध्ये इंग्रजांचे मद्रास जिंकून घेतले.

● इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबाकडे फ्रेंचांविरुद्ध मद्रास मुक्त करण्यासाठी मदतीची मागणी केली.

● कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याने फ्रेंचांना दिलेला आदेश न मानल्यामुळे १७४८ मध्ये अन्वरूद्दीनचे सैन्य व फ्रेंच यांमध्ये प्रसिद्ध सेंट थोमची लढाई’ (Battle of St.Thome) झाली.या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे कॅ.पॅराडाईस याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्यात केवळ ९३० सैनिक होते, तर महफूज खान याच्या नेतृत्वाखालील नवाबाच्या सैन्यात १०,००० सैनिक होते. तरीही फ्रेंचांनी नवाबाच्या सैन्याचा दारूण पराभव केला.

● युरोपात ऑस्ट्रीयन वारसाहक्क युद्ध संपताच भारतातील युद्धही थांबले. अंक्स ला शापेल तहा’द्वारे (Treaty ofAix-LaChapelle) फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास परत केले. मात्र युद्धात फ्रेंचांचे वर्चस्व सिद्ध झाले.

दुसरे कर्नाटक युद्ध(१७४९-१७५४)

युद्धाचे कारणः

● डुप्लेची महत्वकांक्षा आणि हैद्राबाद व कर्नाटक राज्यातील वारसाहक्काच्या विवादामुळे (disputed succession) प्राप्त झालेली संधी, ही या युद्धाची महत्वाची कारणे सांगता येतील.

● सन १७४८ मध्ये निजाम-उल-मुल्कच्या निधनानंतर
हैद्राबादच्या वारसापदासाठी त्याचा मुलगा नासीरजंग व त्याच्या मुलीचा मुलगा मुजफ्फरजंग यांच्यात कलह सुरू झाला.त्याच वेळी कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याची गादी आपणास मिळावी म्हणून चंदासाहेबदेखील प्रयत्नशील होता.

● या विवादांचा फायदा ड्युप्लेने करून घेतला. त्याने मुजफ्फरजंगव व चंदासाहेब यांची बाजू घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले. त्यामुळे इंग्रजांनी देखील नासिरजंगला निझामपद मिळवून देण्याची व अन्वरूद्दीनचे कर्नाटकचे नवाबपद सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. यातूनच इंग्रज व फ्रेंचांचे
दुसरे कर्नाटक युद्ध घडून आले.

महत्वाच्या घटनाः

● या युद्धात फ्रेंचांना सुरुवातीला यश मिळत गेले. ऑगस्ट १७४९ मध्ये अंबूरच्या लढाईत अन्वरूद्दीन मारला गेला व १७५० मध्ये नासीरजंग मारला गेला. फ्रेंचांच्या मदतीने मुजफ्फरजंग निझाम बनला. हैद्राबादच्या दरबारात फ्रेंचांचे हितसंबंध जपण्यासाठी जनरल बस्सी (General Bussy) याच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवण्यात आले.

● मात्र हा विजय अल्पकाळच ठरला. अन्वरूद्दीनचा मुहम्मद अली याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात शरण घेतली होती . त्याला पकडण्यासाठी चंदा साहेब व फ्रेंच यांच्या सैन्यांनी त्रिचनापल्लीला वेढा घातला.

● हा वेढा ढिला करण्याच्या उद्देशाने रॉबर्ट क्लाईव्हने कर्नाटकच्या राजधानीवर म्हणजे अरकॉटवर हल्ला करण्याची युक्ती केली. त्यानुसार क्लाईव्हने ऑगस्ट १७५१ मध्ये केवळ २१० सैनिकांच्या साहाय्याने अरकॉट जिंकून घेतले. आपल्या राजधानीचे संरक्षण करण्यासाठी चंदासाहेबने त्रिचनापल्लीहून ४००० सैनिक अरकॉटकडे पाठविले. मात्र ते अरकॉट पुन्हा
प्राप्त करू शकले नाही. पुढे जून १७५२ मध्ये त्रिचनापल्ली येथून फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. चंदासाहेब तंजावरला पळून गेला, मात्र तंजावरच्या राज्याने चंदासाहेबचा खून घडवून आणला.

तिसरे कर्नाटक युद्ध (१७५८-१७६३)

युद्धाचे कारणः

● युरोपात १७५६ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात सुरू झालेल्या ‘सप्तवार्षिक युद्ध’ (Seven Year’s War) चा प्रभाव पडून भारतातही इंग्रज व फ्रेंच कंपन्यांमध्ये युद्ध सुरू झाले.

महत्वाच्या घटना:

● एप्रिल १७५८ मध्ये फ्रेंच सरकारने काऊंट लाली (Count De Lally) यास भारतात गव्हर्नर म्हणून पाठविले. त्याआधी इंग्रजांनी १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबाला हरवून बंगालवर कब्जा मिळविला होता. तसेच क्लाईव्ह व वॉटसन यांनी मार्च १७५७ मध्ये फ्रेंचांचे चंद्रनगर ताब्यात घेतले होते.
कर्नाटकच्या

● लालीने हैद्राबादहून बसी यास मदतीसाठी बोलावून घेतले, ही त्याची मोठी चूक झाली. त्यामुळे हैद्राबाद दरबारातील फ्रेंचांचा प्रभाव कमी झाला.

● १७५९ मध्ये डी’ॲके याच्या नेतृत्वाखालील नौदलाचा तीन नौसैनिक युद्धांमध्ये पोकॉक याच्या
नेतृत्वाखालील इंग्रजांच्या नौसेनेने पराभव केला. त्यामुळे डी’ॲके फ्रान्सला परतला.

● २२ जून, १७६० रोजी इंग्रज व फ्रेंच यांमध्ये निर्णायक ‘वॉन्दीवॉशची लढाई (Battle of Wandiwash) झाली. त्यामध्ये इंग्रज जनरल सर आयर कूट याने काऊंट लालीचा पराभव केला. वॉन्दीवॉश हा कर्नाटक राज्यातील एक किल्ला होता.

● मार्च, १७६० मध्ये हैद्राबाद येथे निझामाच्या राज्याचे संरक्षक म्हणून फ्रेंचाच्या जागी इंग्रजांची वर्णी लागली. १७६१ मध्ये इंग्रजांनी पाँडिचेरी ताब्यात घेतली. तसेच फ्रेंचांनी आपल्या बहुतेक वसाहती इंग्रजांना गमावल्या.

● १७६३ मध्ये युरोपात (पॅरिसचा तह होऊन सप्तवार्षिक युद्ध थांबल्यानंतर भारतातील तिसरे कर्नाटक युद्ध थांबले. फ्रेंचांना त्यांच्या वसाहती परत मिळाल्या, मात्र त्यांच्या तटबंद्या त्यांना पाडाव्या लागल्या.

कर्नाटक युद्धांचे परिणाम

● वॉन्दीवॉशची लढाई निर्णायक ठरली. फ्रेंचांची व्यापारी व लष्करी शक्ती खंडित झाली. बंगाल, हैद्राबादवरील फ्रेंचांचे वर्चस्व संपुष्टात आले. निझाम इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आला.

● भारतातील फ्रेंचांचे व्यापारी शक्ती म्हणून महत्व संपुष्टात आले. त्यामुळे एकट्या इंग्रजांना भारतात व्यापारवाढ व साम्राज्यविस्ताराचा मार्ग मोकळा झाला. १७६९ मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात आली. त्यांनतर फ्रेंचांचे भारतातील अस्तित्व नाममात्र व राजकीय स्पर्धेतून पूर्णपणे वगळले गेले. फ्रेंचांकडे केवळ पाँडिचेरी, चंद्रनगर, कारिकल,
माहे, यानम या वसाहती राहिल्या. (या वसाहती फ्रेंचांनी १९५४ पर्यंत धारण केल्या, १९५६ साली त्या सार्वभौम भारतात समाविष्ट करण्यात आल्या.)
समाविष्ट करण्यात आल्या.)