ग्रामपंचायत सचिव (ग्रामसेवक) बद्दल संपूर्ण माहिती : Gramsevak Information in Marathi

ग्रामपंचायत सचिव (ग्रामसेवक) बद्दल संपूर्ण माहिती : Gramsevak Information in Marathi

ग्रामपंचायत सचिव (ग्रामसेवक) बद्दल संपूर्ण माहिती (Gramsevak Information in Marathi): ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा नोकर नसून तो चिटणीस म्हणून काम पाहतो.

ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते.

ग्रामसेवक हा ग्रामपंयातीचा सचिव असतो.तसेच शासकीयदृष्ट्या ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग-३ मधील सेवक आहे.

ग्रामपंचायत सचिव (ग्रामसेवक) बद्दल संपूर्ण माहिती : Gramsevak Information in Marathi

ग्रामसेवक निवड


निवड : ग्रामसेवक नेमणुक मुख्ये कार्यकारी अधिकारी जि. प. करतात.त्याची बदली करण्याचा अधिकार जि.प. लाच आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे तसेच ग्रामसेवकाची बदली वा बढती तसेच निलंबनाबाबतचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास असतात.

ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून न देता ते जिल्हा निधीतून दिले जाते.

ग्रामसेवकांची सुधारित वेतनश्रेणी (ऑगस्ट २०१४) : ५२००-२०,२०० + ग्रेड वेतन २४०० रुपये

ग्रामसेवकाची कार्ये

  • ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे.
  • गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद ठेवणे.
  • पाणीपट्टी, घरपट्टी इत्यादी करांची वसूली करणे.
  • ग्रामपंचायतीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
  • ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहिणे.
  • विस्तार अधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून ग्रामसेवक गावात इतर योजनांची माहिती देतो व अंमलबजावणी करतो.
  • ग्रामपंचायत हद्दीतील जमिन, रस्ते, इमारती, पडसर जागा, व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे व ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.
  • ग्रामपंचायत ही नियमांची व कायद्यांची उलंघन करणारी कृती करीत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकरी / गट विकास अधिकारी यांना विहीत मुदतीत सादर करणे.
  • ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचा-यांवर नियंत्रण व त्यांकची आस्थाणपना विषयक बाबी उदा. सेवापुस्तकक, वैयक्तीाक नस्या्या परिपूर्ण ठेवणे,भविष्य् निर्वाह निधी, बोनस इ. शासनाच्याा आदेशानुसार व नियमानुसार देणे.